Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Bike insurance policy: बाइक इन्शुरन्स पॉलिसी का आवश्यक आहे?

Bike insurance policy

भारतात दूचाकीची (टू व्हीलर) मोठ्या प्रमाणात खरेदी होते. रस्त्यावर देखील दूचाकींचे लक्षणीय प्रमाण दिसते. आपघातांमध्ये दूचाकींची संख्या जास्त असल्याचे दिसून येते. यादृष्टीने बाइक इन्शुरन्स पॉलिसीविषयी जाणून घेणे महत्वाचे ठरते.

 भारतात दूचाकीची (टू व्हीलर) मोठ्या प्रमाणात खरेदी होते. रस्त्यावर देखील दूचाकींचे लक्षणीय प्रमाण दिसते. आपघातांमध्ये दूचाकींची संख्या जास्त असल्याचे दिसून येते. यादृष्टीने बाइक इन्शुरन्स पॉलिसीविषयी जाणून घेणे महत्वाचे ठरते. 
बाइक इन्शुरन्स, बाईक इन्शुरन्स पॉलिसीचे प्रकार, त्याची वैशिष्ट्ये आणि फायदे या सगळ्याचा विचार करणे आवश्यक आहे. आपापल्या आवश्यकतेप्रमाणे याची निवड करणे गरजेचे असते.

बाईक विमा म्हणजे काय? (What is bike insurance policy)

दूचाकीचा मालक आणि विमा कंपनी यांच्यात बाइक विमा एक करार असतो. एखाद्या अपघातानंतर किवा चोरीसारख्या घटनांचे नुकसान यात कवर होते. बाइक विमा पॉलिसीमध्ये सर्व प्रकारच्या दूचाकींचा समावेश होतो. यामध्ये मोटारसायकल, स्कूटर, मोपेड बाइक, इलेक्ट्रिक बाइक अशा सर्वांचा समावेश होतो. भारतात प्रत्येक दूचाकी मालकाने किमान थर्ड पार्टी बाइक विमा पॉलिसी खरेदी करणे अनिवार्य आहे. 2002 मध्ये याबाबतचा कायदा करण्यात आला आहे.

बाइक विमा का आवश्यक आहे? 

कायद्याप्रमाणे किमान थर्ड पार्टी इन्शुरन्स तर आवश्यक आहेच. पण त्यापालिकडेही बाइक इन्शुरन्सचा विचार केला जातो. आर्थिक दृष्टीने टू व्हीलर या भारतात लोकप्रिय आहेत. परवडणाऱ्या किमतीत त्या उपलब्ध होत असतात. भारतात अपघातांची संख्या जास्त आहे. यामध्ये दूचाकींचे प्रमाणही जास्त आहे. अचानक होणाऱ्या आपघाताचे इतर परिणामही असतातच पण, याव्यतिरिक्त  आर्थिक प्रश्न देखील समोर उभे राहतात. यादृष्टीनेही बाइक इन्शुरन्स महत्वाचा ठरतो.

भारतात थर्ड पार्टी बाइक विमा पॉलिसी अनिवार्य असल्याने याबाबत तुमच्याकडे विचारणा होऊ शकते. जर अशी पॉलिसी नसेल तर दंड केला जाऊ शकतो. यामुळे किमान थर्ड पार्टी बाइक इन्शुरन्स घेणे आवश्यक ठरते. याचबरोबर आपली आर्थिक क्षमता व गरजा लक्षात घेऊन अधिकचा विचार करता येतो. यामुळे जास्तीचे कवर मिळते.

चोरीसारख्या घटनेमधील नुकसानही कवर होणे गरजेचे 

पॉलिसीमध्ये टू व्हीलर चोरीसारखे कवर असेल तर तेही महत्वाचे ठरते. यामुळे बाइक चोरीला गेल्यास तसा विमा कंपनीकडे क्लेम करून हा खर्च भरून काढता येतो. भारतात टू व्हीलर चोरीस जाण्याचे प्रमाणही मोठे असल्याचे दिसून येते. 

बाइक विमा पॉलिसी घेताना अशा अनेक बाबींचा विचार करणे आवश्यक आहे. आपल्या गरजा नेमक्या काय आहेत ते समजून घेणे आवश्यक आहे. कायद्यामुळे आर्थिक दंडापासून संरक्षण की अधिकचे कवर हवे आहे, त्याचा सारासार विचार करून याबाबतचा निर्णय घेणे योग्य ठरते.