Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Annuity Deposit: अ‍ॅन्युईटी डिपॉझिट स्कीम काय आहे? या स्कीममध्ये कोण गुंतवणूक करू शकतं?

SBI Annuity Deposit Scheme

Image Source : www.digitalmarketingforasia.com

SBI Annuity Deposit Scheme: स्टेट बँकेच्या अ‍ॅन्युईटी डिपॉझिट स्कीमद्वारे गुंतवणूकदार 3 वर्षांपासून 10 वर्षापर्यंत गुंतवणूक करून त्यातून नियमित उत्पन्न मिळवू शकतो. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ.

Annuity Deposit: स्टेट बँक ऑफ इंडियाद्वारे अ‍ॅन्युईटी डिपॉझिट स्कीम राबवली जाते. या स्कीममध्ये गुंतवणूकदार एकत्रित रक्कम बँकेमध्ये गुंतवतो आणि त्या बदल्यात बँक गुंतवणूकदाराला एका ठराविक कालावधीनुसार प्रत्येक महिन्याला त्यातून ईएमआयप्रमाणे किमान रक्कम उपलब्ध करून देते.

बऱ्याचदा नोकरदार वर्ग नोकरीतून निवृत्त झाला की, त्याला कंपनीकडून काही पैसे मिळतात. त्यामध्ये ग्रॅच्युईटी, पीएफ याचा समावेश असतो. पण निवृत्त झाल्यानंतर या पेन्शनधारकांना प्रत्येक महिन्याला मिळणाऱ्या नियमित उत्पन्नाची चिंता असते. अशा निवृत्तधारकांसाठी एसबीआयची Annuity Deposit Scheme फायदेशीर ठरू शकते. या योजनेत गुंतवणूकदार एकरकमी पैसे भरून त्यावर मिळणाऱ्या व्याजातून प्रत्येक महिन्याला नियमित उत्पन्न मिळवू शकतो.

एसबीआय अ_ॅन्युईटी डिपॉझिट स्कीम व्याजदर

अ‍ॅन्युईटी डिपॉझिट स्कीमचा कालावधी

एसबीआयच्या अ‍ॅन्युईटी डिपॉझिट स्कीमनुसार (SBI Annuity Deposit Scheme) गुंतवणूकदार यामध्ये 3 वर्षांपासून ते 10 वर्षांच्या मुदतीमध्ये गुंतवणूक करू शकतो. यामध्ये गुंतवणूकदाराला 36, 60, 84, आणि 120 महिन्यांसाठी पैसे गुंतवता येतात. तसेच गुंतवणूकदाराला यामध्ये त्याने जेवढा कालावधी निवडला आहे. तेवढी गुंतवणूक करावी लागते. त्या कालावधीपर्यंत गुंतवणूकदाराला प्रत्येक महिन्याला किमान 1 हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. यामध्ये कमाल गुंतवणूक कितीही रुपयांची करू शकतो. या योजनेमध्ये किमान 25 हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागते.

अ‍ॅन्युईटी डिपॉझिट स्कीमचा व्याजदर जाणून घ्या

अ‍ॅन्युईटी डिपॉझिट स्कीम ही एक नियमित मासिक उत्पन्न मिळवून देणारी योजना आहे. त्यामुळे खात्यात उपलब्ध असलेल्या रकमेवर आधारित व्याज दिले जाते. बचत खात्यापेक्षा अ‍ॅन्युईटी डिपॉझिट स्कीमवर अधिक व्याज दिले जाते. सर्वसाधारण ग्राहक आणि ज्येष्ठ नागरिक यांना वेगवेगळे व्याजदर दिले जाते. जसे की, 1 ते 2 वर्षांच्या कालावधीसाठी सर्वसाधारण नागरिकांना 5 टक्के व्याज दिले जाते. ज्येष्ठ नागरिकांना 5.50 टक्के व्याज दिले जाते. यामध्ये योजनेत पैसे गुंतवताना जो व्याजदर दिला जातो. तो कालावधी संपेपर्यंत तेवढाच दिला जातो.

अ‍ॅन्युईटी डिपॉझिट स्कीमवर टीडीएस लागू

अ‍ॅन्युईटी डिपॉझिट स्कीममध्ये गुंतवलेल्या रकमेवर आणि त्यावर मिळणाऱ्या व्याजावर इन्कम टॅक्स कायद्यानुसार टीडीएस लागू होतो. हो टीडीएस कापून गुंतवणूकदाराला अ‍ॅन्युईटीची रक्कम दिली जाते. योजनेचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी त्यातून रक्कम काढता येते. पण आपत्कालीन परिस्थितीत या योजनेतून जास्तीत जास्त 15 लाखापर्यंतची रक्कम काढता येते. त्यावरील रक्कम योजनेमध्ये कालावधी पूर्ण होईपर्यंत लॉक इन राहते. मुदत ठेवींमधील गुंतवणुकीवर ज्याप्रमाणे बँका मुदतीपूर्वी पैसे काढले तर दंड आकारतात. त्याप्रमाणे या स्कीममधील रक्कम लॉक इन राहते.