Add-on credit card: क्रेडिट कार्डद्वारे तुम्ही बजेट शॉपिंग आणि विविध बिल पेमेंट करू शकता. सोबतच डिस्काउंट, कॅशबक आणि रिवॉर्ड्सच्या ऑफर्स मिळवू शकता. नियमित बिल पेमेंट केल्यास क्रेडिट स्कोअर वाढण्यासही मदत होते. हाच बजेट शॉपिंगचा आनंद तुम्ही तुमच्या कुटुंबियांनाही देऊ शकता. तुमच्या मूळ (प्रायमरी) क्रेडिट कार्डवर अतिरिक्त (अॅड-ऑन) क्रेडिट कार्ड घेऊ शकता. हे कार्ड तुम्ही पत्नी, मुले, आई-वडील, भाऊ अशा जवळच्या कुटुंबियांना देऊ शकता.
कुटुंबियांसाठी मिळेल अॅड-ऑन कार्ड
क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट कसे केले जाते. बिल कसे भरावे भरतात, ऑफर्स, डिस्काउंटचा फायदा कसा घ्यायचा या गोष्टी तुमच्या कुटुंबातील सदस्यांना शिकवण्यासाठी अॅड-ऑन क्रेडिट कार्ड फायद्याचे ठरेल. (What is add on credit card) तसेच खर्चावर नियंत्रण ठेवून आर्थिक शिस्त लावण्यासाठी अॅडऑन कार्ड मदत करू शकते. मूळ क्रेडिट कार्डद्वारेच अॅड-ऑन कार्डचे पेमेंट करावे लागते.
18 वर्षांवरील कुटुंबातील सदस्यांच्या नावे तुम्ही अॅडऑन कार्ड घेऊ शकता. एका मूळ कार्डावर जास्तीत जास्त 3 ते 5 क्रेडिट कार्ड मिळू शकतात. ऑनलाइन बँकिंगद्वारे घरी बसल्या तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता.
क्रेडिट लिमिट किती?
अॅड ऑन क्रेडिट कार्ड आणि मूळ क्रेडिट कार्डमध्ये सहसा एकूण लिमिट विभागण्यात येते. किती लिमिट मिळेल हा निर्णय बँक ठरवते. तसेच Add-on कार्डद्वारे केलेली शॉपिंग, बिल पेमेंट्सचे रिवॉर्ड मूळ कार्डावर जमा होतील. अतिरिक्त कार्डद्वारे तुम्ही जास्त रिवॉर्ड कमवू शकता. तसेच जास्त रिवॉर्ड मिळण्याचे माइलस्टोनही लवकर पूर्ण होतील. कुटुंबातील सदस्यांना क्रेडिट कार्ड कसे वापरायचे. बिल पेमेंट कसे करायचे या गोष्टींची माहिती मिळेल.
अॅड ऑन कार्ड घेताना कोणत्या गोष्टी ध्यानात घ्याव्यात?
लेट पेमेंटचा दंड, अतिरिक्त शुल्क मूळ कार्डवरच लागू होईल.
कुटुंबियांना कार्ड वापरायला देताना खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. (What is add on credit card) अन्यथा दरमहा, वायफळ खर्चही वाढू शकतो.
एका मूळ कार्डवर 3 ते 5 कार्ड मिळू शकतात.
ऑनलाइन अर्ज करता येईल.
अॅड ऑन कार्डचे बिल मूळ कार्डासोबत अॅड होईल.
अॅड ऑन कार्डधारकाचा क्रेडिट स्कोअर वाढण्यास मदत होत नाही. मात्र, लेट पेमेंट केल्यास मूळ कार्ड धारकाचा क्रेडिट स्कोअर खाली येऊ शकतो.
डिस्काउंट, ऑफर्स, कॅशबॅक Add-on कार्डवर मिळता येईल.