Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय?

शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय?

काय असतो शेअर होल्डिंग पॅटर्न (Share Holding Pattern) आणि तुम्हाला का असावी ह्याबद्दल माहिती

एनएसई (NSE) आणि बीएसई (BSE) अशा दोन्ही एक्सचेंजमध्ये मिळून जवळपास 6 हजारांहून अधिक कंपन्यांमधून मोजक्या कंपन्यांचे समभाग निवडताना गोंधळ उडणे स्वाभाविक असते.  NIFTY-50 इंडेक्समध्ये ज्या कंपन्या समाविष्ट आहेत त्यांमध्ये गुंतवणूक करणे हा सोपासुलभ मार्ग आहे; पण त्यातील असो वा अन्य कोणत्याही कंपनीचे समभाग खरेदी करायचे असतील तर शेअर होल्डिंग पॅटर्न तपासून पहा. हा शब्द आजही नवीन गुंतवणुकदारांत फारसा लोकप्रिय नाही. परंतु त्याचे महत्त्व मोठे आहे.

प्रत्येक कंपनीच्या शेअरचे होल्डिंग पॅटर्न असतात. याचाच अर्थ असा की एखाद्या कंपनीच्या शेअर्समध्ये कोणकोणत्या श्रेणीतील किती शेअर आहेत, याची माहिती देणार्‍यास शेअर पॅटर्न असे म्हणतात.

कोणत्याही कंपनीत वेगवेगळे समभागधारक असतात. त्यात प्रमोटरशिवाय सार्वजनिक जनता, परदेशातील संस्थानिहाय गुंतवणूक (एफआयआय), म्युच्युअल फंड, घरगुती संस्थागत गुंतवणूकदार (त्यात विमा कंपनी, बँक आदी), एनआरआय (अनिवासी भारतीय) आदींचा समावेश होतो.

सर्वसाधारणपणे ज्या कंपनीत एखाद्या प्रमोटर्सचे समभाग अधिक असतील, त्यास मजबूत कंपनी मानली जाते. यामागचे कारण म्हणजे कंपनीच्या प्रमोटरचा वाटा अधिक असल्याने ते त्यांच्या विकासाबाबत अधिक सक्रिय आणि गंभीर असतात, असे गृहित धरले जाते.

ज्या कंपनीतील शेअरमध्ये जनतेचा वाटा कमी असतो, अशा कंपनीचे बाजारात कमी शेअर असतात. त्यामुळे बाजारात अशा शेअरच्या मागणीत थोडीशी जरी वाढ झाली तरी लागलीच भाव वाढण्याची शक्यता असते.

याचप्रकारे एफआयआय (Foreign Institutional Investors), वित्तीय संस्था आणि म्युच्युअल फंडचा समभाग अधिक असणार्‍या कंपन्यांना देखील गुंतवणूक योग्य मानले जाते. कारण त्या कंपनीचे फंडामेंटल किंवा आर्थिक स्थिती मजबूत असल्यानेच विविध संस्थांनी त्यामध्ये गुंतवणूक केल्याचे गृहित धरले जाते. तथापि, विदेशी संस्थागत गुंतवणूकदार किंवा देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार हे सतत चांगला नफा मिळवून देणार्‍या कंपन्यांच्या शोधात असतात. त्यामुळे त्यांचा हिस्सा कमी-जास्त होत असतो. याचा परिणाम शेअर्सच्या भावावर होतो. त्यामुळे प्रमोटर्सचा हिस्सा अधिक असणारे समभाग निवडण्याला प्राधान्य द्यावे.

उदाहरणादाखल आपण टाटा कॉफी लिमिटेड या शेअरचा विचार करु. सद्यस्थितीत याचा शेअर होल्डिंग पॅटर्न पाहिल्यास त्यामध्ये 57.48 टक्के प्रमोटर्सचा हिस्सा आहे; तर FII’s हिस्सा 0.29 टक्के, डीआयआय (Domestic Institutional Investors) आणि म्युचुअल फंडसचा 4.86 टक्के आणि इतरांचा 37.37 टक्के हिस्सा आहे. त्यामुळे हा शेअर गुंतवणुकीसाठी निवडावयाच्या यादीमध्ये घेता येऊ शकतो.