Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Movie Star Salaries: हिंदी चित्रपट vs मराठी चित्रपटांमधील कलाकारांना किती मानधन मिळते?

Movie stars salaries

Image Source : https://www.freepik.com/ (Representative Image)

मराठी आणि हिंदी चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये मोठा फरक पाहायला मिळतो. याचाच परिणाम या चित्रपटसृष्टीमध्ये काम करणाऱ्या कलाकारांच्या मानधनावर देखील दिसून येतो.

जगात सर्वाधिक चित्रपट निर्मिती करणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे. दरवर्षी मराठी, हिंदीपासून ते तेलगू, कन्नड, तमिळ, मल्याळम, भोजपूरीसह विविध भाषांमधील शेकडो चित्रपट रिलीज होतात. मात्र, या चित्रपटांच्या कमाईमध्ये मोठा फरक पाहायला मिळतो. हिंदी चित्रपटाच्या तुलनेत इतर भाषेतील चित्रपटांचा कमाईचा आकडा खूप कमी आहे. 

बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये फरक असल्याने हिंदी चित्रपट व मराठी चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांच्या मानधनात देखील मोठी तफावत दिसून येते. हिंदी चित्रपट, सीरिजमधील कलाकारांची कमाई  मराठी कलाकारांच्या कमाई कितीतरी पटींनी अधिक आहे. 
हिंदी चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या कलाकारांच्या तुलनेत मराठी कलाकारांची कमाई किती आहे? त्याविषयी जाणून घेऊयात.

हिंदी चित्रपटात काम करणाऱ्या कलाकारांची कमाई

हिंदी चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या प्रचंड मोठी असल्याने, बॉक्स ऑफिसवरील कमाई देखील सहज 200 ते 300 कोटी रुपये असते. याशिवाय मर्चेंडायझिंग, डिस्ट्रिब्यूशन, स्ट्रिमिंग राइट्स याद्वारेही कमाई होते. त्यामुळे या कलाकारांचे मानधन कोट्यावधी रुपये असते.
सलमान खान, अमिताभ बच्चन, अमिर खान, शाहरूख खान सारखे कलाकार एका चित्रपटासाठी 50 कोटी ते 100 कोटी रुपये मानधन घेतात. 

याशिवाय, चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केलेल्या कमाईतील काही हिस्सा देखील त्यांना मिळतो. तसेच, सर्वसाधारणपणे इतर कलाकार एका चित्रपटासाठी 15 ते 20 कोटी रुपये मानधन घेतात. आलिया भट्ट, क्रिती सेनॉन, दीपिका पादुकोन या अभिनेत्रींचे मानधन देखील 15 ते 25 कोटी रुपये आहे.

मराठी चित्रपटात काम करणाऱ्या कालाकारांची सरासरी कमाई

एकीकडे हिंदी चित्रपट बॉक्स ऑफिसवर 500-1000 कोटी रुपयांची कमाई करत आहेत. तर दुसरीकडे मराठी चित्रपटांना 50-100 कोटींचा आकडा गाठणे देखील शक्य होत नाही. यामागचे प्रमुख कारण म्हणजे हिंदी भाषिक प्रेक्षकांची संख्या. मराठी प्रेक्षकांच्या तुलनेत हिंदी प्रेक्षकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे हिंदी चित्रपटांचे बॉक्स ऑफिसवरील कलेक्शन देखील जास्त असते व याचा परिणाम त्यांच्या मानधनावर दिसून येतो.

गेल्याकाही वर्षात मराठी चित्रपटांची चर्चा आंतरराष्ट्रीय पातळीवर होत आहे. अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सावात देखील दखल घेण्यात आली आहे. परंतु, काही अपवाद सोडता बॉक्स ऑफिसवर हे चित्रपट अपयशी ठरताना दिसतात. सैराट, वेड, बाईपण भारी देवा, नटसम्राट सारख्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.

लोकमत टाइम्सच्या रिपोर्टनुसार, स्वप्निल जोशी, अमृता खानविलकर, अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी हे मराठी चित्रपट सृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणारे कलाकार आहेत. हे कलाकार एका चित्रपटासाठी 12 लाख रुपयांपासून ते 20 लाख रुपयांपर्यंत मानधन घेतात.

अनेक कलाकार आता टीव्ही सीरियल्समध्ये काम करताना देखील दिसतात. सीरियल्समध्ये काम करणारे कलाकार एका एपिसोडसाठी 40 हजार रुपयांपासून ते 70 हजार रुपये मानधन घेतात. तर ज्युनिअर कलाकारांचे मानधन एका एपिसोडसाठी 10 हजार रुपये ते 20 हजार रुपयांपर्यंत असते.