Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

What is Demat Account and its Advantages: डीमॅट खाते म्हणजे काय व या खात्याचे फायदे काय आहेत?

What is Demat Account and its Advantages

What are the Advantages of Demat: डीमॅट खाते हा शब्द शेयर मार्केटसंबंधीत आहे. जसे आपले बॅंकेत खाते असते, तसेच शेअर्सची गुतंवणूक करण्यासाठी 'डीमॅट खाते' असते. या खात्याचे नक्की काय फायदे आहेत, हे सविस्तरपणे अधिक जाणून घेवुयात.

Demat Account Benefits: शेअर्स खरेदी-विक्री करण्यासाठी डीमॅट खात्याचा उपयोग केला जातो. डिमॅटचा फुलफॉर्म ‘Demat Dematerialize’ असा आहे. आपण जसे बॅंकेत पैसे ठेवतो, तसे गुंतवणूकदार डिमॅट खात्यात शेअर्स ठेवतात. हे खाते बॅंक खात्याप्रमाणेच असते. या खात्याचे काय फायदे आहेत, हे पुढीलप्रमाण समजावून घेवुयात.

ज्या खात्यात शेअर्स, बॉंड्स, डिबेंचर्स, सरकारी रोखे आदी, कागदी स्वरूपात, शेअर्स सटिर्फिकेट्स न ठेवता 'डिमॅट' (डिमटेरियलाइजेशन) करून इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डच्या स्वरूपात ठेवता येतात, त्या खात्याला ‘डीमॅट खाते’ (Demat Account) असे म्हणतात. या खात्याची नोंद सीडीएसएल म्हणजेच सेंट्रल डिपॉझिटरी सव्हिर्सेस लिमिटेड यांच्याकडे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डच्या स्वरूपात असते. 

चोरीची शक्यता नाही (There is No Possibility of Theft)

कारण डिमॅट खाते हे पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असल्यामुळे या खात्यातून चोरी होण्यची शक्यता बिलकुलच नसते. पूर्वी शेअर्स प्रमाणपत्रांची चोरी होत होती, आता मात्र हे प्रमाणपत्रे पूर्वीप्रमाणे नसतात. तसेच हे खाते पूर्णपणे ऑनलाईन असल्यामुळे ते हमखास सुरक्षित असते. हे खाते आपण जगातील कोणत्याही कोपऱ्यातून चालवू शकता.  

वेळेची कमी (Short of Time)

पूर्वी शेअर्स खरेदी-विक्री करताना खूप वेळ लागत होता. तसेच ही प्रक्रिया खूप मोठीदेखील होती. डीमॅट खाते आल्यापासून हा वेळ कमी झाला आहे. जिथे तास लागत होतो, तिथे ही कामे मिनिटात होतात. त्यामुळे आता शेअर्सची खरेदी-विक्री ही मिनिटात होते.

आता किती ही शेअर्सची विक्री शक्य (Many Shares can be Sold)

पूर्वी विषम संख्यते शेअर्स  विकले जात नव्हते. त्याची विक्री फक्त सम संख्येतच होत होती. कारण त्याप्रकारचा नियमच तसा होता. आता मात्रा डिमॅट अकाउंट  आल्यापासून तुम्ही  किती ही व कोणत्याही म्हणजेच सम व विषम संख्येत शेअर्सची विक्री करू शकता. 

घरबसल्या शेअर्सव्दारे कमाई (Earnings through Shares at Home)

डिमॅट खात्यामुळे पैशांची बचत करता येते. हे खाते ऑनलाईन असल्याने घरबसल्या ओपन करता येते व चालवताही येते ते ही झिरो पैशांमध्ये. यासाठी पूर्वी जो प्रमाणपत्र, नोंदणी कागदपत्रे, यांचा ताळमेळ बनवण्यात थोडा खर्च व वेळ जायचा, तो या ऑनलाईन प्रोसेसमध्ये जात नाही.