Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Protect Demat Account: डी-मॅट खाते सुरक्षित ठेवण्यासाठी काय काळजी घ्याल?

protect demat account

भांडवली बाजारात शेअर्स खरेदी-विक्री, बाँड्स, म्युच्युअल फंड्स आणि इतरही प्रकारे गुतंवणूक करण्यासाठी डिमॅट खात्याचा वापर होतो. बनावट डिमॅट खाते सुरू करण्याचे प्रमाणही वाढले आहे. तुमचे सर्व शेअर्स आणि गुंतवणूक सर्टिफिकेट्स डिजिटल पद्धतीने साठवून ठेवण्यात आलेले असतात. मात्र, जर काही फसवणूक झाली तर तुमचे संपूर्ण खातेही रिकामे होऊ शकते.

भांडवली बाजारात शेअर्स खरेदी-विक्री, बाँड्स, म्युच्युअल फंड्स आणि इतरही प्रकारे गुतंवणूक करण्यासाठी डिमॅट खात्याचा वापर होतो. विविध ब्रोकर्स फर्मचे आणि बँकांचे डिमॅट अॅप तुम्ही वापरत असाल. मात्र हे अॅप सुरक्षित वापरण्याची जबाबदारी देखील तुमची आहे. अन्यथा या अॅप्सद्वारेही तुमची फसवणूक होऊ शकते. मागील काही वर्षात आयपीओ फ्रॉड्सही समोर आले आहेत. त्यामुळे सेबीने काही ब्रोकर्सला डीमॅट सेवा बंद करण्याचे आदेशही दिले होते.

बनावट डिमॅट खाते ओपन करण्याचे प्रमाणही वाढले आहे. तुमचे सर्व शेअर्स आणि गुंतवणूक सर्टिफिकेट्स डिजिटल पद्धतीने साठवून ठेवण्यात आलेले असतात. मात्र, जर काही फसवणूक झाली तर तुमचे संपूर्ण खातेही रिकामे होऊ शकते. फसवणुकीचे प्रकार रोखण्यासाठी बँका आणि ब्रोकर्स फर्म विविध तंत्रज्ञान आणत आहेत. मात्र, तरीही पूर्णपणे फसवणुकीचे प्रकार बंद झालेले नाही. अशा परिस्थितीत तुमचे डिमॅट खाते सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत. खालील काही टिप्सचा वापर करून तुम्ही तुमचे खाते अधिक सुरक्षित ठेवू शकता.

डिमॅट खात्यांबद्दल माहिती विसरू नका -

अनेक जण एकापेक्षा जास्त ब्रोकर्स फर्म किंवा बँकाकडे डिमॅट खाते सुरू करतात. मात्र, ही सर्व खाती वापरली जातीलच असे नाही. त्यातील काही खाती तशीच पडून राहतात. त्यामुळे त्याचा पासवर्ड आयडी लॉगइन आयडी विसरुन जाता. असे न करता जर तुम्ही एखादे खाते वापरत नसाल तर त्यावरील सर्व व्यवहार पूर्ण करुन खाते बंद करु शकता. अनेक जण परदेशात वास्तव्यास जातात. तेव्हा डिमॅट खात्याबाबत पूर्ण विसरून जातात. त्यामुळे तुमचे खाते तसेच चालू राहते. डिमॅट खात्याला बँक खातेही संलग्न असल्याने तुमची माहिती किंवा आर्थिक घोटाळा होण्याची शक्यता वाढते.

लॉन-इन माहिती सुरक्षित ठेवा -

डिमॅट खाते अॅक्सेस करण्यासाठीचा तुमचा लॉगइन आयडी आणि पारवर्ज सुरक्षित ठेवा. इमेल, नोटपॅड किंवा ऑनलाईन सेव्ह करुन ठेवण्याचे टाळा. कारण जर तुमचे सोशल मीडिया खाते किंवा जीमेल हॅक झाले तर अशा परिस्थितीत तुमची सगळी माहिती चोरी होऊ शकते. फक्त अंकातील पासवर्ड जसे की, तुमची जन्मतारीख किंवा नाव आडनाव याचा पासवर्डमध्ये समावेश न करता अवघड कोणालाही ब्रेक करता येणार नाही, असा पासवर्ड सेट करून ठेवा.

डिमॅट खात्याचे स्टेटमेंट अप-टू-डेट ठेवा

तुम्ही जो मोबाईल क्रमांक किंवा मेल आयडी अकाऊंट सुरू करण्यासाठी वापरला होता, तोच रेग्युलर वापरात ठेवा. त्याद्वारे तुम्हाला खात्याबद्दलची माहिती मेलवर किंवा मेजेसद्वारे मिळत जाईल. डिमॅट खात्याद्वारे ग्राहकांना मेलद्वारे स्टेटमेंट पाठवण्यात येते. मात्र, जर तुम्ही वारंवार मोबाईल नंबर आणि मेल आयडी बदलत असाल तर तुम्हाला अपडेट मिळणार नाहीत.

अधिकृत ब्रोकरेज फर्ममध्येच खाते उघडा

मागील काही वर्षात आरबीआयने नियमांचे पालन केले नाही म्हणून काही ब्रोकर्स फर्मला सेवा बंद करण्याचे आदेश दिले होते. जर तुम्ही अधिकृत फर्ममध्ये डिमॅड खाते उघडले नाही तर तुमची गुंतवणुकीला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अधिकृत आणि नामांकित ब्रोकर फर्ममध्येच तुमचे खाते खोला.

पावर ऑफ अटर्नी

ज्या ब्रोकर्स फर्मला तुम्ही पॉवर ऑफ अर्टर्नीची परवानगी दिलेली असते ते तुमच्या खात्याचा अॅक्सेस घेऊ शकतात. त्यामुळे यासंबंधीची कागदपत्रे व्यवस्थित वाचून निर्णय घ्या. पॉवर ऑफ अटर्नीचा वापर जेवढा कमीत कमी ब्रोकर फर्मला असेल तेवढे तुमचे खाते जास्त सुरक्षित राहील. तुमच्या खात्याती फंडसंबंधित व्यवहार करण्याची परवानगी ब्रोकरला असेल तर कोणकोणत्या गोष्टींसाठी आहे, हे तपासून घ्या. अन्यथा यातून फसवणूक होण्याची शक्यता आहे.

डेबिट इन्स्ट्रक्शन स्लिप

डिमॅट खात्याशी संबंधित डेबिट इन्स्ट्रक्शन स्लिप ही तुमच्या बँक खात्याच्या चेक बुकसारखी असते. या द्वारे तुम्ही तुमच्या खात्यातील व्यवहार ट्रॅक करू शकता. डिमॅट खात्यातील शेअर्सचे व्यवहार करण्यापूर्वी तुम्ही (DIS) वर सही केलेली आहे की नाही, याची खात्री करा. DIS बुकलेट व्यवस्थित सांभाळू ठेवा. अन्यथा तुमचे खात्याशी संबंधित फसवणूक होण्याची शक्यता वाढते.