Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Co-Working Space म्हणजे काय? याचे फायदे काय आहेत?

What is Co-Working Space

Co-Working Space: को-वर्गिंग स्पेस हा काही जणांसाठी बिझनेस आहे आणि बऱ्याच स्टार्टअपसाठी हक्काचे ठिकाण बनले आहे. भरमसाठ पैसे खर्च करून स्वत:चे सुरू करण्याऐवजी नवीन स्टार्टअप्स को-वर्किंग स्पेसचा वापर करण्याला प्राधान्य देत आहेत. चला तर या को-वर्किंग स्पेसचे फायदे काय-काय आहेत, ते जाणून घेऊ.

Co-Working Space: तुम्हाला तुमच्या बिझनेस पार्टनरसोबत एका महत्त्वाच्या प्रोजेक्टवर चर्चा करायची आहे. पण ही चर्चा तुम्हाला टिपिकली ऑफिस मिटिंग रुममध्ये बसून करायची नाही. यासाठी तुम्हाला थोडेसे कूल टाईप वातावरण हवे आहे. पण म्हणून तुम्ही दिवसभर एखाद्या कॅफेहाऊसमध्ये बसून मिटिंग करू शकत नाही. अशावेळी को-वर्किंग स्पेस हा पर्याय खूप फायद्याचा ठरू शकतो. यामुळे मार्केटमध्ये खूप नवीन ट्रेण्ड आले आहेत आणि विशेष म्हणजे लोकांना ते आवडत आहेत. तर आज आपण Co-Working Space या नवीन ट्रेण्डबद्दल जाणून घेणार आहोत.

को-वर्किंग म्हणजे काय? | What is Co-Working?

Co-Working Space आणि त्याच्या फायद्यांबद्दल जाणून घेण्यापूर्वी को-वर्किंग म्हणजे काय? ही टर्म कधीपासून वापरण्यास सुरूवात झाली. याबाबत जाणून घेऊ. को-वर्किंग ही एकत्रित काम करण्यासाठी वापरली जाणारी एक संकल्पना आहे. यामध्ये वेगवेगळ्या टीममधील आणि कंपन्यांमधील कर्मचारी एकाच ठिकाणाहून काम करतात. त्याला को-वर्किंग म्हटले जाते. को-वर्किंगचा सुरूवात सर्वप्रथम 2000  या वर्षात झाली आणि याची सुरूवात फ्री-लान्सर्स, वेब डेव्हलपर्स, नवीन स्टार्टअप्स यांच्याकडून होऊ लागली. घरातून, बिझनेस सेंटर्स किंवा कॉफीशॉपमधून काम करणाऱ्यांना को-वर्किंग स्पेसची गरज भासू लागली आणि त्यातूनच ही संकल्पना पुढे विकसित झाली. जगभरातून या को-वर्किंग कल्चरला मान्यता मिळू लागल्याने भारतातही याची प्रसार झपाट्याने झाला. सध्या वैयक्तिक फ्री-लान्सरपासून अनेक कॉर्पोरेट कंपन्यांचे कर्मचारी अशा Co-Working Spaces मधून आपले काम करत आहेत.

को-वर्किंग स्पेस म्हणजे काय? | What is Co-Working Space?

को-वर्गिंग स्पेस हा काही जणांसाठी बिझनेस आहे आणि बऱ्याच स्टार्टअपसाठी हक्काचे ठिकाण बनले आहे. Co-Working Space ही अशी एक जागा आहे; जिथे लोकांना आपल्या प्रोजेक्टवर काम करण्यासाठी जागा आणि त्याच्याशी संबंधित काही बेसिक सुविधा मिळतात. त्यांना जर घरातून काम करण्यास किंवा कॉफी शॉपमध्ये बसून मिटिंग अटेंड करण्याचा कंटाळा आला आहे. त्यांच्यासाठी हा एक खूप चांगला पर्याय आहे आणि तो लोकांना आवडत देखील आहे. को-वर्किंग स्पेसमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या आणि कर्मचारी एकत्रित बसून काम करतात.

को-वर्किंग स्पेसची मेंबरशीप घेऊन तुम्ही संपूर्ण दिवस तिथे बसून काम करू शकता. सलग 10 दिवस किंवा 15 दिवस तुम्ही तिथे बसून काम करू शकता. जर तुम्हाला एका दिवसासाठीच को-वर्किंग स्पेस हवी आहे. तर ती सुद्धा इथे मिळते. त्याचबरोबर तुम्हाला एखादी सेपरेट केबिन हवी असेल, मिटिंग करण्यासाठी अजून थोडी मोठी जागा, प्रेझेन्टेशन दाखवण्याची सुविधा हवी असेल तर ती देखील तुम्हाला जास्तीचे पैसे भरून मिळू शकते. अशी को-वर्किंग स्पेसेस महानगरांमध्ये बऱ्याच ठिकाणी सुरू झाली आहेत. त्यातून तुम्ही तुमच्या बजेटनुसार आणि सुविधांनुसार निवड करून वापर करू शकता.

Co-Working Spacesचे फायदे

फ्री नेटवर्किंगची संधी

को-वर्किंग स्पेसचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे नेटवर्किंग. इथे तुमच्यासारखीच अनेक लोक आपापली कामे करण्यासाठी येतात. त्यामुळेच त्याला को-वर्किंग स्पेस म्हणतात. इथे येणारा प्रत्येक माणूस हा वेगळ्या क्षेत्रातला आणि वेगळ्या प्रकारचे काम करणारा असू शकतो. यातून तुमची एकाचवेळी अनेक लोकांशी जोडले जाण्यास मदत होऊ शकते.

स्वस्तात ऑफिस सेटअप

तुम्ही स्टार्टअप्स सुरू करत आहात आणि त्याच्यासाठी ऑफिस सुरू करण्याचा विचार करत आहात. तर ऑफिस सुरू करण्याचा पुनर्विचार करा. कारण त्या नवीन ऑफिस उभारण्यात पैसे खर्च करण्यापेक्षा को-वर्किंग स्पेसचा वापर करून तु्म्ही कितीतरी रुपयांची बचत करू शकता. तसेच ऑफिस सेटअप करण्यासाठी पैशांबरोबर वेळही खूप खर्च करावा लागतो.

टिपीकल ऑफिस वातावरणापेक्षा वेगळे

को-वर्किंग स्पेसमधील वातावरण खूप भन्नाट असते. कारण मुळात तिथे येणारी माणसे अत्यंत उत्साही आणि मेहनती असतात. त्याचा परिणाम नक्कीच तिथल्या वातावरणावर आणि काम करणाऱ्यांवर होतो. या वातावरणामुळे इतरांना उत्साहाने आणि मेहनतीने काम करण्याची प्रेरणा मिळते.

इंटरनेट सुविधा

बऱ्याच को-वर्किंग स्पेसमध्ये फ्री इंटरनेट सुविधा दिली जाते आणि बहुतांश स्टार्टअप आणि फ्री-लान्स करणाऱ्यांना इंटरनेटच हवे असते. त्यामुळेही को-वर्किंग स्पेसला भरपूर मागणी आहे. इथे तु्म्हाला प्लॅननुसार लिमिटेड आणि अनलिमिटेड इंटरनेट वापरता येते. त्यामुळे संपूर्ण फोकस हा फक्त कामावरच राहतो.

फ्लेक्सिब्लिटी

कामाची फ्लेक्लिब्लिटी हा को-वर्किंग स्पेसचा खूप महत्त्वाचा फायदा आहे. तुम्ही कोणत्या शहरात जाऊन कोणत्याही प्रोजेक्टवर काम करू शकता. तिथे तुम्हाला फक्त काही दिवस राहून को-वर्किंग स्पेसमधून काम करून तुमचा प्रोडेक्ट पूर्ण करता येऊ शकतो. अशाप्रकारे तुम्ही वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन वेगवेगळ्या प्रकारची कामे करू शकता.