Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Section 80D Deduction: इन्कम टॅक्समध्ये कलम 80D अंतर्गत कोणत्या सवलती मिळतात?

What is Section 80D Deduction

Section 80D Deduction: भारतातील प्रत्येक वैयक्तिक व्यक्ती किंवा हिंदू अविभक्त कुटुंब (Hindu Undivided Family-HUF) कलम 80D अंतर्गत वर्षभर भरलेल्या इन्शुरन्स पॉलिसीच्या प्रीमियमवर टॅक्स वजावटीसाठी दावा करू शकतात.

कोणतीही मेडिकल इमरर्जन्सी सांगून येत नाही; त्यासाठी आपली तयारी असणे गरजेचे आहे. आणि गरज म्हणजे आपला मेडिकल इन्शुरन्स असावा. भारतातील बहुसंख्या लोकसंख्या ही अजूनही इन्शुरन्स अंतर्गत सुरक्षित नाही. ते अजूनही मेडिकल इमर्जन्सीसाठी बचत आणि कर्जवर अवलंबून राहतात. त्यामुळे तुमच्या गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये  मेडिकल इन्शुरन्स असायलाच हवा. असा आग्रह सरकारकडून होत आहे. त्याचबरोबर सरकार मेडिकल इन्शुरन्समधून कलम 80D अंतर्गत टॅक्समध्ये वजावट सुद्धा देत आहे.

इन्कम टॅक्समधील कलम 80D काय आहे?

भारतातील प्रत्येक वैयक्तिक व्यक्ती किंवा हिंदू अविभक्त कुटुंब (Hindu Undivided Family-HUF) कलम 80D अंतर्गत वर्षभर भरलेल्या इन्शुरन्स पॉलिसीच्या प्रीमियमवर टॅक्स वजावटीसाठी दावा करू शकतात. ही वजावट किंवा सुविधा टॉप-अप, आरोग्य योजना आणि गंभीर आजार योजनांवरही उपलब्ध आहे. वजावटीची सुविधा ही फक्त वैयक्तिक इन्शुरन्ससाठी, तुमच्या जोडीदारासाठी किंवा मुलांसाठी किंवा पालकांना कव्हर देणाऱ्या पॉलिसीमधून कलम 80D ची वजावट घेता येते. चला तर इन्कम टॅक्स कायद्यातील कलम 80D अंतर्गत मिळणारी वजावट, त्यासाठी  लागणारी पात्रता काय? त्याचा लाभ कसा घेता येतो? याबाबत अधिक जाणून घेऊया.

इन्कम टॅक्समधील कलम 80D साठी कोण पात्र आहे?

1961च्या इन्कम टॅक्स कायद्याच्या कलम 80D (Income Tax Act Section 80D) मध्ये नमूद केलेल्या नियमांची पूर्तता करणारे टॅक्स पेअर्स त्यांचे करपात्र उत्पन्न, इन्शुरन्ससाठी भरलेल्या प्रीमिअममधून वजावट करू शकतात. इन्शुरन्स पॉलिसीमध्ये तुम्ही गंभीर आजारांसाठी घेतलेल्या योजनांचा तसेच टॉप-अप स्कीमसाठी भरलेल्या प्रीमिअमवर लागू होतो. तसेच तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी, जोडीदारासाठी, मुलांसाठी आणि पालकांसाठी खरेदी केलेल्या इन्शुरन्सचा टॅक्स वजावटीसाठी वापर करू शकता.

कलम 80D टॅक्स वजावटीसाठी कोण दावा करू शकतो

कोणतीही वैयक्तिक व्यक्ती किंवा हिंदु अविभक्त कुटुंब (Hindu Undivided Family-HUF) इन्कम टॅक्स कायद्यातील कलम 80D अंतर्गत खालीलपैकी कोणत्याही प्रकारच्या खर्चावर टॅक्स सवलतीसाठी दावा करू शकते.

  • वैयक्तिक, कुटुंबासाठी, पालकांसाठी काढलेल्या इन्शुरन्सच्या प्रीमियमच्या रकमेवर सवलत मिळते.
  • मेडिकल टेस्ट आणि स्क्रीनिंगसाठी झालेला खर्च.
  • कोणत्याही प्रकारच्या हेल्थ इन्शुरन्सद्वारे संरक्षित नसलेल्या 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या व्यक्तीवर होणारा वैद्यकीय खर्च.
  • सरकारद्वारे राबवल्या आरोग्य योजनांवरील खर्च यात अंतर्भूत आहे.
  • हिंदू अविभक्त कुटुंबातील (HUF) सदस्य हेल्थ इन्शुरन्ससाठी कलम 80D अंतर्गत वजावटीसाठी दावा करू शकतात.
  • वैयक्तिक व्यक्ती स्वत:साठी किंवा जोडीदारासाठी, मुलांसाठी 25 हजारापर्यंतच्या इन्शुरन्स खर्चाचा वजावटीसाठी दावा करू शकते.
  • तसेच 60 वय किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींसाठी ही वजावटीची सवलत 50 हजारापर्यंत लागू आहे.

80D Tax Deduction in Income Tax