Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Eco Friendly House Tips: जाणून घ्या, पर्यावरणपूरक घर बांधताना कोणत्या गोष्टी आवश्यक?

Eco Friendly House

Eco Friendly House: स्वत:चे घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. जर तुम्ही स्वप्नातील घर यावर्षी बांधण्याचे ठरविले असेल तर, तुमच्यासाठी पर्यावरणपूरक घर कसे बांधावे हा लेख नक्कीच फायदेशीर ठरणार आहे.

Eco Friendly House: सध्या धावपळीच्या युगात प्रत्येक व्यक्ती पळत आहे. तसेच वाढत्या प्रदुषणामुळे आरोग्यावरदेखील परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाला निसर्गाच्या सानिध्यात जावे वाटते. त्यामुळे जर तुम्ही तुमचे घरच पर्यावरणपूरक बनवाल तर, तुम्हाला बाहेर पडण्याचीदेखील गरज भासणार नाही. म्हणूनच आम्ही तुम्हाला पर्यावरणपूरक घर बांधताना काय गोष्टी करणे गरजेचे, हे सांगणार आहोत.

पर्यावरणपूरक घर (Eco Friendly House)  

तुम्ही घर बांधण्यापूर्वी घराची रचना पर्यावरणास अनुकूल असेल का, हा विचार करणे आवश्यक आहे. शक्यतो, कोणत्याही कंपनी व उद्योगधंदे आस-पास असतील अशा ठिकाणी घर घेणे टाळावे. कारण आवाज व धूर वगैरेसारख्या गोष्टींमुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. तसेच घर बांधताना लाकूड, धातू व काच यांसारख्या गोष्टींचा पुर्नवापर होईल अशी काळजी घ्यावी. जेणेकरून पर्यावरणाची हानी ही टाळेल व तुमचा पैसा ही बचत होईल. 

सौर पॅनेल (Solar Panel)

सौर ऊर्जा हा ऊर्जेचा महत्वपूर्ण स्रोत आहे. सौर पॅनेलमुळे वीजेचीदेखील बचत अधिक होते. तसेच घरोघरी सौर पॅनेल लावल्याने प्रदुषण नियंत्रित करता येते. तसेच एकदा लावल्यानंतर अधिक काळ टिकतो. त्याच्या दुरूस्तीच्या खर्चदेखील कमी येतो. त्यामुळे पैशांचीदेखील बचत मोठया प्रमाणात होते.  

मॉड्यूलर बांधकामाचा पर्याय निवडा (Modular Construction)

मॉड्यूलर बांधकाम (Modular construction) एक पूर्वनिर्मित रचना असून, या प्रकारचे घरे पाहिजे, त्या डिझाइनमध्ये कोणत्याही ठिकाणी बांधता येते. विशेष म्हणजे, मॉड्युलर घराचे बांधकाम तुमच्या गरजेनुसार एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवता येते. या प्रकारच्या घराच्या बांधकामाचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे कचरा व्यवस्थापन! यासाठी वापरलेल्या वस्तू वाया जात नाहीत. 

घराच्या टेरेसवर हिरवे आच्छादन (Green Terrace)

तुमच्या घराचे टेरेस हे नेहमी हिरवेगार ठेवण्यासाठी प्रयत्न करा. यामुळे तुमचे घर नेहमी थंड राहील. तसेच या घराचा फायदा उन्हाळयात अधिक होतो. या गोष्टीमुळे विजेचीदेखील अधिक बचत होण्यास मदत होईल आणि तुमचे लाइटबिलदेखील कमी येईल, त्यामुळे साहजिकच पैशांची बचत होईल. 

पुन्हा वापरता येणारे साहित्य (Reusable Materials)

घर बांधण्यासाठी लाकूड हा एक चांगला पर्याय आहे. घराच्या फ्रेमिंग आणि फ्लोअरिंगसह विविध कारणांसाठी लाकूड पुन्हा वापरता येते. धातू, काच आणि प्लास्टिक याचा पुन्हा वापर करता येतो. त्यामुळे अशा गोष्टींचा वापर करण्यावर अधिक भर द्यावा. या पद्धतीने घर बांधकामाचे नियोजन केले, तर तुम्ही तुमचे नवीन घर पर्यावरणपूरक बांधू शकता.