'हृदय जिथे असेल तिथे असते घर' आपण लहानपणापासून ऐकत आलो आहे अशी ही म्हण घराचे आपल्या आयुष्यातील स्थान अधोरेखित करते. या मौल्यवान ठेव्याचे महत्त्व आपण तर मान्य केलेच आहे पण सरकार व नियामक यंत्रणांनाही याची जाणीव आहे हे दिसून येते रिअल इस्टेट (नियमन व विकास) कायदा आणि जास्तीत जास्त लोकांना संघटित गृहनिर्माणाच्या छत्राखाली आणण्याचे लक्ष्य केंद्र सरकारने ठेवले आहे.केंद्र सरकारने सर्वांसाठी घरे ही महत्वकांक्षी योजना हाती घेतली आहे.
Table of contents [Show]
गृहविमा म्हणजे सर्वसमावेशक संरक्षण
गृह विमा केवळ तुमच्या मालमत्तेचेच नव्हे, तर मालमत्तेतील सामानाचे संरक्षण करते. गृहविम्याचे संरक्षण घराचे आग किंवा दरोड्यात नुकसान झाले तर तेवढ्यापुरतेच मिळते हा समज चुकीचा असून सर्वसमावेशक संरक्षण हे घरातील उचलता येण्याजोगी उपकरणे, इलेक्ट्रिकल उपकरणे, दागिने आणि मौल्यवान वस्तू या सर्वांना मिळते. यामुळे प्रत्येक वस्तूसाठी आणि प्रत्येक दुर्घटनेसाठी वेगळा विमा काढण्याची डोकेदुखी राहत नाही.
गृहविम्याचे संरक्षण भाडेतत्त्वावरील मालमत्तांनाही लागू असते
तुम्ही राहता ती जागा तुमच्या मालकीची नसली तरी, ते तुमचे घर असते आणि त्यातील सामान, वस्तू तुम्हाला तेवढेच प्रिय असते. या घराला व त्यातील वस्तूंनाही नुकसानीचा धोका स्वत:च्या मालकीच्या घराइतकाच असतो. अशा परिस्थितीत, तुम्हाला गृहविम्याचे संरक्षण असेल, तर घरातील तुमच्या सर्व सामानाला, वस्तूला तेच संरक्षण मिळते.
प्रवासात असताना रोख रक्कम हरवल्यास मिळेल विमा संरक्षण
तुमच्या सोसायटीला सुरक्षितता वाढवणे शक्य असले, तरी एटीएमकडून घराकडे येत असतानाही पैसे हरवण्याची शक्यता अनेकांच्या बाबतीत असते. गृहविम्याखाली अशा प्रकारच्या नुकसानीसाठी भरपाई दिली जाते. त्याचप्रमाणे वस्तू हरवणे, दरोड्यांबाबतही संरक्षण दिले जाते.
नैसर्गिक संकटात गृहविम्याचे संरक्षण
गृहविम्याचे संरक्षण नैसर्गिक आपदांसाठी मिळत नाही हा मोठा गैरसमज असून, पूर, नैसर्गिकरित्या लागलेली आग आदी परिस्थितीत गृहविम्याखाली सर्व संरक्षण पुरवले जाते.विविध धोरणांखाली विविध प्रकारची कव्हर्स दिली जातात, त्यातील सर्वांत अनुकूल धोरणाचा लाभ ग्राहक घेतात. अशा परिस्थितीत तुम्ही कमाल संरक्षण देणा-या विमा योजनेची निवड करणेच योग्य ठरते.
व्यक्तिगत अपघात
अपघात काही वेळ किंवा जागा बघून होत नाहीत, म्हणून तर त्यांना अपघात म्हणतात! एक चांगला गृहविमा तुम्हाला घराच्या सीमेत झालेल्या सर्व व्यक्तिगत अपघातांसाठी संरक्षण देतो, यामध्ये मृत्यूचाही समावेश आहे.
आपल्यापैकी बहुतेक जणांवर ही वेळ आली असेल. आपण प्रचंड घाईगडबडीत असतो आणि लक्षात येते की घराच्या किंवा वाहनाच्या किल्ल्या हरवल्या आहेत. सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे, तुमचा गृहविमा घराच्या किंवा वाहनाच्या हरवलेल्या किंवा चोरीला गेलेल्या किल्ल्या नव्याने करून घेण्याच्या खर्चाचा परतावा देतो.
घर तुमचे स्वत:चे असूदे किंवा भाड्याने घेतलेले, त्यातून प्रतित होते ते आराम, संरक्षण आणि स्थैर्य. म्हणूनच ही मालमत्ता आणि त्यातील सामान यांचे संरक्षण करून त्यांच्यासंदर्भातील संभाव्य धोके टाळणे आवश्यक आहे. तेव्हा या दिवाळीत आपण प्रतिज्ञा करूया- जे आपल्याला संरक्षण पुरवते त्याच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी घेण्याची.