Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Property Law: शेतजमिनीवर घर बांधण्याचे काय आहेत नियम?

Property Law

Agricultural Land Property: तुम्ही जर का शेतजमिनीवर घर बांधायचा विचार करीत असाल तर, त्यासाठी तुम्हाला काही नियम आणि अटींचे पालन करावे लागेल. सर्वप्रथम शेतजमिनीचे निवासी जमिनीत रुपांतर करावे लागेल. यासंबंधित नियम राज्यानुसार बदलत असला तरी, यासाठी काही कागदपत्रे आवश्यक आहेत. तेव्हा घर बांधण्यास कुठेही जमीन खरेदी करण्यापूर्वी नियमांची खात्री करुन घेणे आवश्यक आहे.

Property Rules And Regulation: देशातील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच गावांच्या तुलनेत शहरांमध्ये रोजगार उपलब्ध असल्याने, लोकांना राहण्यासाठी घरे कमी पडत आहेत. त्यामुळे नागरिक राहण्यासाठी  धाव घेत आहेत. अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे पूर्वी शेती व्हायची, आज तिथे चमकणाऱ्या गगनचुंबी इमारती उभ्या आहेत. शेतीचा आकार दिवसेंदिवस कमी होत आहे. मोठ्या शहरांमध्ये फारच कमी जागा शिल्लक आहे. अशा परिस्थितीत लोक छोट्या शहरांकडे वळत आहेत. तेथेही शेतजमीन विकत घेऊन घरे बांधत आहेत. तुम्हीही शेतजमिनीवर घर बांधत असाल तर घर बांधण्यापूर्वी, काही नियम आणि कायदे जाणून घ्या.

शेतजमिनीवर घर बांधणे जेवढे तुम्हाला वाटते तितके सोपे नाही. तुमच्याकडे शेतजमिनीची पूर्ण मालकी असूनही सरकारकडून परवानगी मिळाल्याशिवाय तुम्ही राहण्यासाठी घर बांधू शकत नाही, कारण यासाठी काही नियम आहेत.

लागवडीयोग्य जमीन म्हणजे काय?

ज्या जमिनीवर पिके घेता येतात, ती संपूर्ण जमिन लागवडीयोग्य जमिनीत येते. या जमिनीवर दरवर्षी पिके घेतली जातात. याव्यतिरिक्त, शेतजमीन ही सामान्यतः जमिनीच्या क्षेत्राचा भाग म्हणून परिभाषित केली जाते जी कायमस्वरूपी कुरणे, पिके आणि शेतीसाठी वापरली जाते. शेतजमिनीवर घर बांधण्यास परवानगी नाही. जर तुम्ही लागवडीयोग्य जमिनीवर घर बांधले तर खरेदीदाराला आधी जमिनीचे रुपांतर करून घ्यावे लागते. त्यानंतरच शेतजमिनीवर घर बांधता येईल.  शेतजमिनीचे घरामध्ये रूपांतर झाल्यावर काही शुल्क भरावे लागतात.

ही कागदपत्रे आवश्यक आहे

त्यासाठी जमीन मालकाचे ओळखपत्र असणे आवश्यक आहे. यासोबत मालकी, भाडेकरू, पिकांची नोंदही आवश्यक आहे. जमीन भेट म्हणून मिळाल्यास विक्री करार आणि म्युटेशन डीड, गिफ्ट पार्टीशन डीड असणे आवश्यक आहे. नगर परिषद किंवा ग्रामपंचायतीकडून एनओसी मिळणे आवश्यक आहे. यावेळी सर्वेक्षणाचा नकाशा, जमीन वापराचा आराखडा, जमीन महसुलाची पावतीही मागितली जाते. जमिनीवर कोणतीही थकबाकी किंवा दावा असू नये.