What are the cloud kitchen models: भारतासह जगभरात क्लाऊड किचन ही संकल्पना वाढत आहे. अमेरिकेत 2022 वर्षात क्लाऊड किचन स्टार्टअप 13 टक्क्यांनी वाढले आहेत, तर मार्केट 138.24 अब्ज युएस डॉलरवर पोहोचले आहे. भारतात मागील तीन ते चार वर्षांपासून हा व्यवसाय हळूहळू मोठा होऊ लागला आहे. तर, नेमके क्लाऊड किचन आहे काय ते आधी समजून घेऊयात.
भारतात करोना काळात क्लाऊड किचन व्यवसायाने वेग घ्यायला सुरुवात केली होती. क्लाउड किचन हे एक प्रकारचे रेस्टॉरंट नाही तर फक्त रेस्टॉरंटचे किचन आहे. जेथून केवळ टेक अ वे ऑर्डर मिळतात म्हणजे फक्त पार्सल घेऊन जाण्याची सोय आहे. तेथे बसून खाऊ शकत नाही, तशी तिथे सोय उपलब्ध नसते. मुख्यत्वे या ऑर्डर प्रत्यक्ष न घेता, स्विगी, झोमाटो, इट शुअर सारख्या ऑनलाईन अॅग्रीगेटर्सद्वारे दिल्या जातात. यासह अनेक क्लाऊंड किचन कंपन्या आपले ऑनलाईन मार्केटींग करतात आणि स्वत:चा स्वतंत्र ग्राहकवर्ग निर्माण करतात, म्हणजे ते अॅग्रीगेटरवर निर्भर राहात नाहीत. काही कंपन्या संपूर्ण शहर किंवा आजूबाजूच्या लहान शहरांमध्येही डिलिव्हरी देतात, त्यासाठी ते स्वत:ची ऑपरेश सिस्टीम उभी करतात.
करोनाच्या काळात अनेकांनी क्लाऊड किचन व्यवसायाची सुरुवात घरच्या किचनपासून केली. मग पुढे तिचे रुपांतर प्रोफेशनल किचनपर्यंत केले. बहुतेक ऑनलाइन ऑर्डर स्विगी आणि झोमॅटो सारख्या फूड डिलिव्हरी अॅप्सवरून येतात.
काही किचन हे ऑफलाईन पुरवठाही करतात. जसे की रेस्टॉरंटला नियमित पुरवठा करणे, वसतिगृहे आणि कॉर्पोरेट कार्यालयांच्या दैनंदिन टिफिनची आवश्यकता पूर्ण करणे, केटरिंग ऑर्डर घेणे इत्यादी. हे पूर्वी घरच्या, मंडळाच्या किचनमधून होतहोते. आता मात्र यासाठी प्रोफेशन क्लाऊड किचन उभारले जाते.
कमी गुंतवणुकीत अधिक नफा आहे मिळवून देणारा व्यवसाय आहे. यामुळे तुम्ही तुमचा छंद व्यवसायात बदलू शकता. तुम्ही तुमचे काम कुठूनही सुरू करू शकता. या कामात दीर्घकालीन नफा खूप चांगला आहे, ज्यामुळे तुम्ही या व्यवसायात प्रस्थापित होऊ शकता. मात्र यात मार्केटींग आणि ऑनलाईन तंत्रज्ञान हे महत्त्वाचे ते शिकल्याशिवाय आणि त्याचा अभ्यास केल्याशिवाय व्यवसाय सुरू करू नये. तसेच कोणते पदार्थ किचनमध्ये बनवले जाणार, त्या पदार्थांची मार्केटमध्ये असलेली मागणी याचा अभ्यास केली पाहिजे, असे अशोक वाय. के. यांनी महामनीला सांगितले.