Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Loan Foreclosureचे फायदे काय आहेत? तुम्हाला सुद्धा ईएमआयमधून सुटका हवी, जाणून घ्या प्रक्रिया

Benefits of Loan Foreclosure

Loan Foreclosure चे फायदे जाणून घेण्यापूर्वी तुम्हाला Foreclosure म्हणजे काय, हे माहित आहे का? फोरक्लोजर म्हणजे वेळेपूर्वी कर्ज चुकते करणे. त्याला बँकिंगच्या भाषेत लोन फोरक्लोजर म्हटले जाते.

कर्ज हा सध्या आपल्या जीवनशैलीतील महत्त्वाचा भाग झाला आहे. कारण कोणतीही मोठी गोष्ट करायची असेल तर कर्ज हे घ्यावेच लागते. मग ते नवीन घर असो, नवीन गाडी किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी मिळवलेले भांडवल असो. कारण यासाठी लागणारी रक्कम कोणाकडेच एकरकमी उपलब्ध नसते. पण मग या कर्जासाठी प्रत्येक महिन्याला ईएमआय भरावा लागतो आणि तो बरीच वर्षे भरावा लागतो. कधीकधी यामुळे घराचे बजेट कोलमडते किंवा त्याचे बर्डन वाटू लागते. अशावेळी यातून सुटका करून घेण्यासाठी तुम्ही Loan Foreclosureची मदत घेऊ शकता.

लोन फोरक्लोजर म्हणजे काय?

लोन फोरक्लोजर ही बँकिंग सिस्टिममधील एक टर्म आहे आणि ती कर्जदारांसाठी फायद्याची आहे. जेव्हा एखादी व्यक्ती वेळेपूर्वी कर्जाची परतफेड करते. त्यावेळी त्याला लोन फोरक्लोजर (Loan Foreclosure) म्हटले जाते. फक्त यामध्ये कर्जाची रक्कम एकदम भरावी लागते. तसेच ही सुविधा कर्ज घेतल्यानंतर कधी वापरता येते, यासाठी बँकेला काही चार्जेस भरावे लागतात का आणि त्याचा नेमका काय फायदा होतो, हे समजून घेणार आहोत.

लोन फोरक्लोजरसाठी सर्वप्रथम बँकेला अर्ज करून त्याची माहिती द्यावी लागते. मुदतीपूर्वी लोन बंद करण्यासाठीचे बँकांचे काही नियम आहेत. त्या नियमानुसार कर्जदाराने काही महिन्यांचे ईएमआय भरणे गरजेचे असते. त्या कॅल्क्युलेशननुसार बँक कर्जदाराला फोरक्लोजरची रक्कम कळवते. ती रक्कम चेक, RTGS, NEFT द्वारे भरल्यानंतर लोन फोरक्लोजरची प्रक्रिया पूर्ण केली जाते.

फोरक्लोजरसाठी शुल्क भरावे लागते का?

पूर्वी लोन फोरक्लोजरसाठी बँका विशेष शुल्क आकारत होत्या. पण आरबीआयने आणलेल्या नवीन नियमानुसार आता फ्लोटिंग व्याजदराने कर्ज घेतलेल्या कर्जदारांकडून बँका लोन फोरक्लोजरसाठी कोणते शुल्क घेत नाहीत. पण फिक्सड् इंटरेस्ट रेटने कर्ज घेतलेल्या कर्जदारांना लोन फोरक्लोजरसाठी चार्जेस भरावे लागतात.

लोन फोरक्लोजर झाले पुढे काय?

लोन फोरक्लोजरची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर बँकेकडे तारण ठेवलेली मूळ कागदपत्रे कर्जदाराला परत दिली जातात. पूर्वी या प्रक्रियेला 30 दिवसांपेक्षा अधिक वेळ लागायचा. पण आता आरबीआयच्या नवीन नियमानुसार बँकेने 30 दिवसांच्या आत मूळ कागदपत्रे परत दिली नाही तर बँकेला कर्जदाराला प्रति दिवसाला दंड शुल्क द्यावे लागेल.

कर्जदाराने बँकेकडून मूळ कागदपत्रे स्वीकारल्यानंतर No Dues Certificate आठवणीने घेणे गरजेचे आहे. या सर्टिफिकेटमध्ये बँक असे लिहून देते की, कर्जदाराकडे बँकेची कोणतेही देणे बाकी नाही. या सर्टिफिकेटची नवीन कर्ज घेताना मागणी होऊ शकते.

लोन फोरक्लोजरचे फायदे

लोन फोरक्लोजरचा सर्वांत महत्त्वाचा फायदा म्हणजे तुमची कित्येक वर्षांच्या ईएमआयमधून सुटका होते. त्यानंतर ईएमआयवर भराव्या लागणाऱ्या व्याजातून तुम्ही मुक्त होता. त्याचबरोबर लोन फोरक्लोजरमुळे तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारतो. वेळेपूर्वी कर्जाची परतफेड करणे. ही साधारण गोष्ट नाही. यावरून संबंधित कर्जदाराची आर्थिक स्थिती चांगली असल्याचे दिसून येते.