Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Consumer Right's : ग्राहक म्हणून तुम्हाला ‘हे’ 6 हक्क माहितीच हवेत

Consumer Right's Consumer forum

Consumer Right's : मोबाईल किंवा वीज कंपन्यांकडून वसूल केली जाणारी जादा बिलं, ई-कॉमर्स कंपन्यांकडून वस्तू खरेदी करताना होणारी फसवणूक आपल्याला नवी नाही. एखादी वस्तू खरेदी करताना किंवा सेवा घेताना ग्राहक म्हणून तुमचे कोणते हक्क आहेत हे या लेखातून आपण जाणून घेऊ.

एखादी वस्तू किंवा सेवा विकत घेताना त्यामध्ये काही त्रुटी आढळल्यास आपण हक्काने त्याबद्दल तक्रार करू शकतो किंवा त्याबाबत माहिती मिळवू शकतो. पण हे हक्क कोणते ते आपण आज पाहणार आहोत. ग्राहक संरक्षण कायदा 1986 नुसार प्रत्येक भारतीय ग्राहकाला 6 हक्क देण्यात आले आहेत. ते कोणते? ते पाहूया.  

सुरक्षेचा हक्क (Right to Safety)

कोणतीही वस्तू किंवा सेवा विकत घेताना केवळ तिची उपयुक्तता लक्षात घेणे गरजेचे नाही. तर ती वस्तू किंवा सेवा सुरक्षित असावी. जेव्हा आपण एखादी वस्तू विकत घेतो, तेव्हा ती पूर्ण सुरक्षित असणे गरजेचे आहे. याची संपूर्ण जबाबदारी उत्पादकांची असते. गुणवत्तापूर्ण वस्तू मिळणे हा ग्राहकांचा हक्क आहे. त्यामुळे ग्राहकांनी शक्यतो आयएसआय आणि अॅगमार्कचं चिन्ह असलेल्या वस्तूंची खरेदी करावी. हे चिन्ह असलेल्या वस्तूंच्या वापरामुळे काही शारीरिक किंवा आर्थिक नुकसान झाल्यास कंपनीला ग्राहकाला नुकसान भरपाई देणे बंधनकारक आहे.

माहितीचा हक्क (Right to be Informed)

एखाद्या वस्तूची किंवा उत्पादनाची गुणवत्ता, प्रमाण, संख्या, शुद्धता, किंमत, मानक या सर्वांची माहिती मिळवण्याचा ग्राहकाला हक्क आहे. ग्राहकाने एखादे उत्पादन किंवा सेवेची निवड किंवा खरेदी करण्यापूर्वी त्या उत्पादन किंवा सेवेची सर्व माहिती मिळविण्याचा आग्रह धरला पाहिजे. हा ग्राहकाचा अधिकार आहे जो कोणताही दुकानदार किंवा व्यावसायिक नाकारू शकत नाही.

निवडीचा अधिकार (Right to Choose)

आजच्या स्पर्धात्मक युगात ग्राहकांच्या वस्तू आणि सेवांच्या निवडीचा अधिकार दुकानदार नाकारू शकत नाही. स्पर्धात्मक स्थितीत मक्तेदारीच्या बाबतीत एखादी वस्तू किंवा सेवा योग्य किंमतीत मिळवण्याचा ग्राहकांचा हक्क आहे.

आपले मत मांडण्याचा अधिकारी (Right to be Heard)

याचा अर्थ असा आहे की ग्राहकांच्या हिताचा योग्य मंचांवर योग्य विचार केला जाईल. ग्राहकांच्या कल्याणाचा विचार करण्यासाठी स्थापन केलेल्या विविध मंचांवर प्रतिनिधित्व करण्याच्या अधिकाराचाही यात समावेश आहे. आपली फसवणूक झाली आहे असे वाटले तर ग्राहक त्याबाबतची तक्रार, तक्रार निवारण केंद्रात करू शकतो. ग्राहकाला आपलं म्हणणं सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी ग्राहक मंचाची स्थापना करता येते. याद्वारे ग्राहक मंचाच्या शिष्टमंडळाकडून मांडण्यात आलेल्या शिफारशी आणि सूचनांवर सरकार विचार करतं.

तक्रार निवारणाचा अधिकार (Right to seek Redressal)

तक्रार लहान असो किंवा मोठी, तक्रार बरोबर असल्यास ग्राहकाला तक्रार निवारणाचा अधिकार कायद्याने ग्राहकाला दिला आहे. ग्राहक त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी ग्राहक संस्थांची मदत घेऊ शकतात.

ग्राहक शिक्षणाचा अधिकार (Right to Consumer Education)

आपली फसवणूक तर झाली नाही ना याबाबत अनेकदा ग्राहकाला माहितीच नसते. तसेच जर फसवणूक झाली तर काय करावे याबाबची माहितीही त्याला नसते. ग्राहकाने त्याचे हक्क काय आहेत हे जाणून घेतले पाहिजे. त्यासाठी सरकारद्वारे विविध माहितीपर उपक्रम राबवण्यात येतात. त्याचा लाभ ग्राहकांनी घेणे गरजेचे आहे.