Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Children's Mutual Fund : मुलासाठी म्युच्युअल फंडात गुंतवणूक कशी करावी?

www.economictimes.indiatimes.com

अनेक पालक मुलांच्या नावे विविध वित्तीय संस्थांच्या योजनामध्ये गुंतवणूक करत असतात. त्याच प्रमाणे अलीकडच्या काळात म्युचअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. तर मग पालकांना आपल्या मुलांच्या नावे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता येते का? आणि ती कशी करावी? याबाबतची माहिती या लेखातून जाणून घेऊ..

आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पालक नेहमीच सतर्क असतात. भविष्यात मुलांच्या शिक्षणासाठी, व्यवसायासाठी अथवा लग्नासाठी म्हणून अनेक पालक मुलांच्या नावे विविध वित्तीय संस्थांच्या योजनामध्ये गुंतवणूक करत असतात. त्याच प्रमाणे अलीकडच्या काळात म्युचअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. तर मग पालकांना आपल्या मुलांच्या नावे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता येते का? आणि ती कशी करावी? याबाबतची माहिती या लेखातून जाणून घेऊ..

मुलांच्या नावे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता येते का?

पालकांना आपल्या अल्पवयीन मुलांच्या नावाने देखील म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता येते. यासाठी सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) कडून तशी परवानगी देण्यात आली आहे. Children's mutual fund मधील गुंतवणूक 5 वर्षासाठी दिर्घकालासाठी करता येते. तसेच या मुदत कालावधीच्या आत तुम्हाला गुंतवणूक केलेली रक्कम काढता येणार नाही. जर तुम्ही दीर्घकालीन योजनेमध्ये गुंतवणूक करत असाल, तर तुम्ही अल्पवयीन मुलाच्या नावावर पद्धतशीर गुंतवणूक योजना (SIP) देखील सुरू करू शकता.

काय आहे चाईल्ड म्युच्युअल फंड? Children's mutual funds

चाईल्ड म्युच्युअल फंड हा वय वर्ष 18 च्या आतील मुलासांठी सुरु करण्यात आलेला म्युच्युअल फंडाचाच एक प्रकार आहे. या म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून पालकांना आपल्या पाल्याच्या भविष्यासाठी ठराविक रकमेची गुंतवणूक करता येते. मुलाचे शिक्षण, व्यवसाय, लग्न यासाठी भविष्यातील आर्थिक तरतूद म्हणून तुम्ही चिल्ड्रन म्युच्युअल फंडामध्ये  (Children's mutual fund) गुंतवणूक करू शकता. यासाठी पालक आपल्या मुलाचे खाते उघडून मुलाच्या नावाने म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करू शकतो.

म्युच्यअल फंडाचा हक्क मुलाकडे

ही गुंतवणूक 5 वर्षासाठी दिर्घकालीन मुदतबंद पद्धतीने करावी लागते. तसेच या गुंतवणुकीचे खाते पालक आणि मुलाच्या नावावर संयुक्तपणे करता येणार नाही. ही गुंतवणूक फक्त मुलाच्या नावाने होईल आणि तो सज्ञान म्हणजे 18 वर्षाच्या झाल्यानंतरच त्याच्याकडे त्याचा हक्क दिला जातो. तो पर्यंत म्युच्यअल फंडाचा कालावधी वाढवता येतो.

कागदपत्रे काय लागतील?

अल्पवयीन मुलाच्या नावाने म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यासाठी त्याचे खाते उघडण्यासाठी पुढील कागदपत्रांची आवश्यकता आहे.

  • मुलाच्या वयाचा पुरावा (जन्म दाखला)
  • अल्पवयीन मुलाच्या पालकत्वाचा पुरावा
  • केवायसी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे (आधार, पॅन)