Dhani One Freedom Card: फिनकेट कंपनी धनी ने ग्राहकांसाठी वन फ्रिडम कार्डद्वारे भन्नाट ऑफर आणली आहे. याद्वारे तुम्ही 5 लाख रुपयांपर्यंत क्रेडिट मर्यादा अगदी काही मिनिटात मिळवू शकता. तेही शून्य टक्के व्याजदराने. तसेच कॅशबॅक, डिस्काउंट, ऑनलाइन वैद्यकीय सेवा अशा अनेक सुविधा या कार्डद्वारे मिळवता येतील.
धनी वन फ्रिडम कार्डचे फायदे
या कार्डवर 10 हजार ते 5 लाख रुपयांपर्यंत क्रेडिट मिळू शकते.
क्रेडिट लिमिटच्या 10% रक्कम तुम्हाला दर दिवशी वापरता येईल. म्हणजे जर तुमच्या कार्डचे लिमिट 1 लाख रुपये असेल तर दरदिवशी तुम्ही 10 हजार रुपये खर्च करू शकता.
शॉपिंग आणि बिल पेमेंटसवर 2 टक्के तत्काळ कॅशबॅक मिळेल. समजा, जर तुम्ही 10 हजारांची शॉपिंग केली तर तत्काळ 2% म्हणजे 200 रुपये कॅशबॅक मिळेल.
शून्य टक्के व्याज आणि समान 3 हप्त्यांमध्ये कर्ज फेडता येईल.
उदाहरणार्थ, जर तुम्ही 6 हजार रुपये खर्च केले तर पेमेंटच्या दुसऱ्या दिवशी 2 हजार रुपये पे करावे लागतील. दुसरा 2 हजार रुपयांचा हप्ता 30 दिवसानंतर आणि तिसरा हप्ता 60 दिवसानंतर भरावा लागेल. असे एकूण 6 हजार रुपये तीन हप्त्यांत भरता येतील.
धनी ऑनलाइन स्टोअरवरून खरेदी करताना दैनंदिन गरजेच्या वस्तूंवर 35% डिस्काउंट मिळेल.
दिवसाचे चोवीस तास कधीही डॉक्टरांना कॉल करण्याची सुविधा. डॉक्टरांचा सल्ला, मेडिसिन घरबसल्या मिळवता येईल.
कार्ड पेमेंट लेट झाल्यावर बँकेतून ऑटोमॅटिक पैसे कापून घेतले जाणार नाही.
शॉपिंग, हॉटेल, सिनेमा, मेडिसिन, किराणा, फ्लाइट आणि इतर तिकीट बुकिंगवरही डिस्काउंट मिळेल.
कार्डसाठी शुल्क किती?
धनी वन फ्रिडम कार्ड हे ऑनलाइन आणि ऑफलाइन मोडने शॉपिंग, बिल पेमेंट आणि इतरही सर्व व्यवहारासाठी वापरता येईल. या कार्डसाठी प्रोसेसिंग फीसह इतर कोणतेही शुल्क नसले तरी दरमहा 199 रुपये शुल्क आकरले जाईल. तर फिजिकल कार्ड 99 रुपये भरून मिळवता येईल.