Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Career After 12th : बारावीनंतर काय? तर 'हे' काही कोर्स असू शकतात, तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन!

Career After 12th

Image Source : www.indianexpress.com

Career After 12th : बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाले की, सर्व विद्यार्थी पुढील मार्ग शोधतात. अनेक मुलांवर गरची जबाबदारी लवकर येते त्यामुळे त्यांना होईल तितक्या लवकर चांगल्या पगाराची नोकरी हवी असते. अशा मुलांसाठी बेस्ट ऑप्शन असू शकतात 'हे' काही कोर्स.

Career After 12th : बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला आणि आता विद्यार्थ्यांची आवडत्या क्षेत्रात अ‍ॅडमिशन घेण्याची घाई सुरू झाली. प्रत्येक विद्यार्थी आधीच ठरवून ठेवतो की आपल्याला पुढे काय करायचं. पण, काही विद्यार्थी असे असतात ज्यांना त्यांची आवड नेमकी काय? आपल्याला ज्यात आवड आहे त्या क्षेत्राचे कोर्स कोणते आहेत? यामुळे अनेकदा मुलांचा  चुकीच्या ठिकाणी प्रवेश घेतला जातो आणि मग त्यात अपयश येतं. या सर्व चुका टाळण्यासाठी आधीच आपल्या आवडीनिवडी बघून त्याच क्षेत्रात करिअर करणे गरजेचे आहे. काही युनिक करिअर ऑप्शन असे ज्यातून तुम्हाला चांगला पगार मिळू शकतो. करिअरचे काही ऑप्शन पुढीलप्रमाणे, 

डेटा सायन्स कोर्स 

  • पद  - डेटा सायंटिस्ट
  • काम - डेटा सायंटिस्ट बिझनेस वाढवण्यासाठी प्रभावी निर्णय घेण्यास मदत करतो. 
  • कारण ते गणितीय आणि सांख्यिकीय पद्धती वापरून मोठ्या संख्येने डेटाचं विश्लेषण करतात.
  • डेटा सायन्स हा भारतात बारावीनंतरचा एक युनिक कोर्स आहे.
  • शिक्षण - पीसीएमसह बारावी, गणित, सांख्यिकी, अर्थशास्त्र किंवा इतर कोणत्याही संबंधित क्षेत्रात बॅचलर आणि मास्टर्स
  • पगार - डेटा सायंटिस्टचं सुरुवातीचं सरासरी वार्षिक मानधन 6 लाख ते 8 लाख रुपये असतं.

ब्लॉकचेन इंजिनीअर

  • पद - ब्लॉकचेन सोल्युशन्स आर्किटेक्ट किंवा ब्लॉकचेन इंजिनीअर
  • काम- बारावीनंतर करिअरच्या युनिक ऑप्शन्सपैकी एक म्हणजे ब्लॉकचेन सोल्युशन्स आर्किटेक्ट/ब्लॉकचेन इंजिनीअर होय. 
  • ब्लॉकचेन इंजिनीअर डायग्राम्स व डॉक्युमेंटेशनच्या मदतीने डिझायनिंग अ‍ॅप्लिकेशन्सवर आधारित अंमलबजावणी करतात.
  • शिक्षण- पीसीएमसह बारावी, कम्प्युटर सायन्समध्ये बॅचलर डिग्री, बिझनेस अ‍ॅनालिटिक्स, आयटी मॅनेजमेंटमध्ये एमबीए
  • पगार- ब्लॉकचेन सोल्युशन्स आर्किटेक्ट किंवा ब्लॉकचेन इंजिनीअरचं सुरुवातीचं सरासरी वार्षिक मानधन  3 लाख ते 8 लाख रुपये असतं.

फूड टेक्नॉलॉजिस्ट

  • पद- फूड टेक्नॉलॉजिस्ट
  • काम- बारावीनंतर करिअरचा आणखी एक युनिक पर्याय म्हणजे फूड टेक्नॉलॉजिस्ट होय. 
  • फूड टेक्नॉलॉजिस्ट्सना क्वालिटी, प्रक्रिया आणि उत्पादन तपासावं लागतं. 
  • यामध्ये अन्नाशी संबंधित संशोधन करावं लागतं.
  • शिक्षण- पीसीएमसह बारावी; फूड टेक्नॉलॉजीमध्ये बी. टेक किंवा फूड इंजिनीअरिंग
  • पगार- फूड टेक्नॉलॉजिस्ट्सचं सुरुवातीचं सरासरी वार्षिक मानधन 5 लाख ते 8 लाख रुपये असतं.

न्यूट्रिशनिस्ट/ डाएटिशियन

  • पद- न्यूट्रिशनिस्ट/ डाएटिशियन
  • काम- न्यूट्रिशनिस्ट रुग्णालयं, फिटनेस सेंटरमध्ये काम करतात किंवा खासगी प्रॅक्टिस करू शकतात.
  • ते व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक आवश्यकतांवर आधारित हेल्थ प्लॅन फिटनेसबद्दल सल्ला देतात.
  • शिक्षण- पीसीबीसह बारावी, तसंच न्यूट्रिशन व डायटेटिक्समध्ये B.Sc व M.Sc, होम सायन्स
  • पगार- न्यूट्रिशनिस्ट/डाएटिशियनचं अ‍ॅव्हरेज वार्षिक मानधन 4 लाख ते 8 लाख रुपये असतं.

फॉरीन लँग्वेज इंटरप्रीटर

  • पद- फॉरीन लँग्वेज इंटरप्रीटर
  • काम- फॉरीन लँग्वेज इंटरप्रीटर म्हणून ट्रेनर, शिक्षक, ट्रान्सलेटर, लेखक, फ्लाइट अटेंडंट म्हणून नोकरी मिळू शकते. 
  • सांस्कृतिक देवाणघेवाण आणि व्यावसायिक व्यवहारांसाठी योग्यप्रकारे संवाद करण्यासाठी मदत करून पैसे कमावता येतात.
  • शिक्षण- कोणत्याही फॉरीन लँग्वेजमध्ये बॅचलर डिग्री
  • पगार- फॉरीन लँग्वेज इंटरप्रीटरचा सुरुवातीचं वार्षिक मानधन  3 लाख ते 7 लाख रुपये असतं.

Source : www.abplive.com