What a Coworking Space is and its Benefits: सध्या सर्व खासगी कंपन्या ‘कोवर्किंग स्पेस’ (Coworking Space) वर भर देताना दिसत आहेत. कोवर्किंग स्पेसला मराठीत ‘सहकारी जागा’ असे म्हटले जाते. थोडक्यात, आपल्या सहकाऱ्यांसोबत एकाच रूममध्ये तयार केलेली जागा, म्हणजे कोवर्किंग स्पेस. तसेच वेगवेगळया कंपनीचे कर्मचारीदेखील ही जागा शेयर करू शकतात. त्यामुळे अफाट खर्च वाचतो तसेच एकटेपणादेखील दूर होतो. या को-वर्किंग स्पेसचे फायदयांबाबत अधिक जाणून घेवुयात.
Table of contents [Show]
आरामदायी कामाची जागा
कोवर्किंग स्पेसमध्ये एकाच ठिकाणी अनेक सुविधा असतात. जसे की, प्रिंटर, वाय-फाय या सर्व सुविधा एकाच ठिकाणी असल्यामुळे वाय-फायला लागणाऱ्या अधिक खर्चावर नियंत्रण करता येते. तसेच लाइट बिल देखील आटोक्यात येते. महत्वाचे म्हणजे सर्व कर्मचारी एकाच ठिकाणी असल्यामुळे, कामदेखील न चुकता, अगदी वेळेत पूर्ण होईल.
नेटवर्किंग वाढेल
विविध कंपनीचे लोक एकाच ठिकाणी आल्याने, कर्मचाऱ्यांचे नेटवर्किंग वाढते. त्यामुळे विविध कामांसंबंधीचे ज्ञान वाढण्यास मदत होते. प्रत्येक वेगवेगळया क्षेत्राची माहिती मिळते. ते कशापध्दतीने काम करतात याचे आकलन होते. तसेच भविष्यात इतर कंपनीत काम करण्याची संधी देखील मिळते.
सकारात्मक बना
एकाच वेळी, एकाच ठिकाणी अनेक लोक असल्याने काम करण्यात मजा येते. तसेच एकमेकांचे विचार घेऊन सकारात्मक बनण्यास ऊर्जा मिळते. सोबतच हुशार लोकांसोबत काम केल्याने फायदादेखील होतो. आजूबाजूला अशा लोकांची साथ असेल, तर कंपनीच्या कामासाठी त्याचा उपयोग होतो.
एकटेपणा दूर होतो
होम फ्राॅम होममुळे कर्मचाऱ्यांना एकटे राहण्याची सवय लागली आहे. त्यामुळे ते अधिक चिंताग्रस्त होताना दिसत आहे. कोवर्किंग स्पेसमुळे त्यांचा हा एकटेपणा दूर होईल. तसेच लोकांशी संवाद साधल्याने त्यांच्या मनातील जी भिती आहे, ती निघून जाईल. एकटेपणामुळे लोकांचा आत्मविश्वास संपताना दिसत आहे. त्याच्यात न्यूनगंड अधिक दिसून येतो. त्यांची संवादकौशल्ये संपताना दिसत आहे. अशावेळी कोवर्किंग स्पेस ही या सर्व समस्यांना तडा देते आणि एकटेपणा दूर करण्यास मदत करते. एकटेपणा संपविण्यासाठी कोवर्किंग स्पेस ही खूप फायदेशीर ठरते.