Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Best Scholarships for College Students: कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी 'या' शिष्यवृत्ती ठरतील उपयुक्त

Best Scholarships For College Students

Image Source : www.vignan.ac.in

Useful Scholarships for College Students: अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींमुळे बारावीनंतरचे शिक्षण पूर्ण करता येत नाही. आर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी सरकारने विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती योजना विद्यार्थ्यांकरीता आखल्या आहेत. या शिष्यवृत्ती योजनांमधून मिळणाऱ्या रकमेचा वापर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी करता येतो.

Best Scholarships For College Students: सध्या शिक्षण फार महागडे झाले आहे, असे आपण अनेक पालकांकडून ऐकत असतो. आता अगदी पहिल्या वर्गापासून ते दहावीपर्यंतचे शिक्षण घ्यायला लाखो रुपये खर्च येतो. त्यातही बारावीनंतरचे उच्च शिक्षण घेणे, आणखी कठीण होऊन बसले आहे. महागड्या शिक्षणाचा लाभ आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांना देखील घेता यावा, यासाठी सरकारनकडून विद्यार्थ्यांकरीता शिष्यवृत्ती योजना राबविल्या जात आहेत. या शिष्यवृत्तींच्या मदतीने आर्थिकदृष्ट्या कमकुवत पण गुणवंत विद्यार्थी आपले उच्च शिक्षण पूर्ण करु शकतात. चला मग जाणून घेऊ अशा काही शिष्यवृत्तींबद्दलची माहिती.

किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना (KVPY)

सर्वसामान्य घरातील विद्यार्थ्यांचा कल विज्ञान क्षेत्रात वाढावा, यासाठी किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना शिष्यवृत्ती दिली जाते. ही शिष्यवृत्ती केंद्र सरकारच्या सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी विभागाकडून दिली जाते. यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सद्वारे परीक्षा घेतली जाते. परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्याला त्याची पीएचडी पूर्ण होईपर्यंत, प्रत्येक महिन्याला 5 ते 7 हजार रुपयांपर्यंत फेलोशिप दिली जाते.

KVPY शिष्यवृत्तीसाठी लागणारी पात्रता

सायन्स शाखेतून 12वी मध्ये 75 टक्के मिळालेले विद्यार्थी या स्कॉलरशिपसाठी अर्ज करू शकतात. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सद्वारे (Indian Institute of Science-IIS) या शिष्यवृत्तीसाठी परीक्षा घेतली जाते. लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधार शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाते.

केंद्रीय शिष्यवृत्ती योजना (Central Sector Scholarship-CSS)

केंद्रीय शिष्यवृत्ती योजना (Central Sector Scholarship-CSS) ही एक व्यापक स्वरुपाची शिष्यवृत्ती योजना आहे. भारतातून सीएसएस शिष्यवृत्ती योजनेचा लाभ दरवर्षी जवळपास 82 हजार विद्यार्थी घेतात. यामध्ये 50 टक्के शिष्यवृत्ती मुलींना आणि 50 टक्के मुलांना दिली जाते. सीएसएस शिष्यवृत्ती ही कॉलेज आणि युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी 10 हजार रुपये आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी 20 हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे. अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये, हा त्यामागचा उद्देश आहे.

सीएसएस शिष्यवृत्तीसाठी लागणारी पात्रता

सीएसएस शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी संबंधित विद्यार्थ्याला बारावीमध्ये  80 टक्क्यांपेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे. तसेच, त्या विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे एका आर्थिक वर्षातील उत्पन्न 8 लाखांपेक्षा जास्त नसले पाहिजे. या स्कॉलरशिपसाठी ऑगस्ट-नोव्हेंबर महिन्यात अर्ज ओपन होतात. अर्ज करण्याची प्रक्रिया आणि संबंधित माहिती केंद्र सरकारच्या नॅशनल स्कॉलरशीप पोर्टल उपलब्ध आहे.

प्रगती शिष्यवृत्ती योजना (Pragati Scholarship Scheme)

मुलांप्रमाणे मुली देखील सक्षम व्हाव्यात, यासाठी ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (AICTC) तर्फे खास मुलींसाठी काही योजना राबविल्या जातात. प्रगती शिष्यवृत्ती योजना ही अशीच एक योजना आहे. यामध्ये मुलींना बारावी पास झाल्यानंतर मानव संसाधन आणि विकास मंत्रालयाकडून (Ministry of Human Resources and Development) 5 हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. त्यामधील 2 हजार डिग्रीधारकांना आणि 2 हजार डिप्लोमाधारकांना आणि 1 हजार दिव्यांग विद्यार्थिनींना ही शिष्यवृत्ती दिली जाते. तसेच AICTE मध्ये निवड झालेल्या विद्यार्थिनींपैकी निवडक विद्यार्थीनींना प्रत्येक वर्षाला 50 हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते.

प्रगती शिष्यवृत्तीसाठी लागणारी पात्रता

प्रगती शिष्यवृत्ती योजनेचा लाभ गुणवत्तेच्या आधारे दिला जातो. संबंधित विद्यार्थिनीने पहिल्या वर्षाच्या डिप्लोमा आणि डिग्री कोर्ससाठी प्रवेश घेतलेला असावा. 2023-23 या शैक्षणिक वर्षातील शिष्यवृत्तीसाठी संबंधित विद्यार्थिनीला ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये अर्ज करावा लागतो. या शिष्यवृत्तीसाठी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवरून अर्ज करता येतो. ज्या विद्यार्थीनीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी आहे, अशी विद्यार्थीनी या शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ शकते.

पंतप्रधान शिष्यवृत्ती योजना (Prime Minister’s Scholarship Scheme-PMSS)

पंतप्रधान शिष्यवृत्ती योजना ही शिष्यवृत्ती दहशतवादी आणि नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेले माजी सैनिक, इतर केंद्रीय दलातील सैनिक, पोलीस कर्मचारी आणि रेल्वे कर्मचारी यांच्या मुलांना तसेच त्यांच्या विधवा पत्नींना दिली जाते. उच्च तांत्रिक शिक्षण तसेच व्यावसायिक शिक्षणासाठी या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. या शिष्यवृत्ती योजनेंतर्गत प्रत्येक महिन्याला 2 ते 3 हजार रुपये दिले जातात.

PMMS शिष्यवृत्तीसाठी लागणारी पात्रता

या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे वय किमान 18 ते 25 वर्षांच्या दरम्यान असावे. तसेच संबंधित विद्यार्थ्याल बारावी, डिप्लोमा किंवा पदवीमध्ये किमान 60 टक्के गुण मिळालेले हवेत. या योजनेसाठी 30 जून, 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे.  PMMS शिष्यवृत्तीसाठी संबंधित विद्यार्थी केंद्रीय सैनिक बोर्डाच्या वेबपोर्टलवरून अर्ज करू शकतात.