Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Real Estate Investment Plan: रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक करायची आहे? मग हे शहरं आहेत बेस्ट पर्याय

Real Estate Investment

गुंतवणुकीसाठी सर्वात सुरक्षित मार्ग शोधत असाल तर तुम्ही रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक करु शकता. कारण, गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये रियल इस्टेट सर्वात सुरक्षित पर्याय आहे. त्यामुळे या क्षेत्रात गुंतवणूक करायची असेल तर ही वेळ योग्य आहे. नुकताच नोब्रोकरने (NoBroker) रियल इस्टेट रिपोर्ट 2023 जाहीर केला आहे. त्यानुसार त्यात काही शहरं आहेत, ज्या ठिकाणी तुम्ही गुंतवणूक करुन चांगला रिटर्न मिळवू शकता.

Real Estate Investment Plan: प्रत्येक ठिकाणी जमीनीचे भाव वेगवेगळे आहेत. त्यामुळे ते भाव पाहून त्यानुसार गुंतवणूक केल्यास भविष्यात त्याला चांगला भाव मिळू शकतो. कारण, कोविड-19 च्या परिस्थितीत जमीनीचे भाव घसरले होते. मात्र, आता पुन्हा एकदा त्यांचे भाव वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे  नोब्रोकरने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार, मालमत्तेत आत्ताच गुंतवणूक करण्याची योग्य वेळ आहे. 

तुम्ही आत्ता जर प्लाॅट किंवा फ्लॅट खरेदी केल्यास भविष्यात त्यावर चांगला रिटर्न मिळवता येणार आहे. तसेच, घर खरेदी करणाऱ्यांचा घर खरेदीसाठी आत्मविश्वासात मोठा बदल झाला असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. रिपोर्टनुसार, 77 टक्के लोकांनी 2023 मध्ये मालमत्ता खरेदी करण्याचा मानस व्यक्त केला आहे. त्यामुळे मिडल-इन्कम क्षेत्रात बिझनेस वाढण्याची संधी दिसून येत आहे.

गुंतवणुकीसाठी कोणती शहरे आहेत खास?

देशातील काही ठरावीक शहरं मालमत्तेच्या गुंतवणुकीसाठी लोकांची पहिली पसंत बनली आहेत. यामध्ये अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली-एनसीआर, हैदराबाद, कोलकाता, मुंबई आणि पुणे ही मालमत्ता खरेदीसाठी सर्वाधिक पसंतीची शहरे असल्याचे, एका मोठ्या ऑनलाईन रियल इस्टेट ब्रोकरेज कंपनीच्या ताज्या आकडेवारीवरून समोर आले आहे.

 मालमत्तेचा दर आणि वाढ पाहिली तर यात गुरुग्रामने नंबर पटकावला आहे. गुरुग्राममध्ये प्रति चौरस फूट रेसिडेंटल किमतीत सर्वाधिक 12 टक्के वाढ झाली आहे. यामध्ये बेंगळुरू दुसऱ्या स्थानावर असून येथील किमती 9 टक्क्यांनी वाढल्या आहेत. तर नोएडामध्ये हेच प्रमाण 8 टक्क्यांनी वाढले आहे.

राहण्यासाठी घर खूप महत्वाचे!

नुकत्याच आलेल्या रिपोर्टवर सिग्नेचर ग्लोबल (इंडिया) लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर रवी अग्रवाल यांनी एका मुलाखतीत सांगितले की, राहण्यासाठी जागा म्हणजेच घर असणे किती महत्वाचे आहे. हे आपल्याला महामारीमुळे समजले आहे. तसेच, घर विकत घेणे खूप महाग आहे. पण, इंडस्ट्रीचा आलेला रिपोर्ट पाहून आम्हाला आनंद आहे. कारण, भारतात स्वत:चे घर असणे ही एक परंपरा आहे, या कल्पनेला हा रिपोर्ट समर्थन देतो आहे.

आत्ता गुंतवणूक करणे फायद्याचे

रिपोर्टमधील शहरांची नावे बघून ज्या ठिकाणी भाव कमी आहेत. तेथे आत्ता गुंतवणूक करणे फायद्याचे ठरणार आहे. कारण, जमीनीचे भाव वाढत राहतात. त्यामुळे आत्ता जमीन घेतली नाही. तर भविष्यात जास्त पैसे देऊन ती घ्यावी लागणार आहे. त्यापेक्षा आत्ता व्यवस्थित प्लॅन करुन जमीन विकत घेतल्यास, भविष्यात त्याचा आपल्याला खूप फायदा होऊ शकतो. कारण, या क्षेत्रात जमीनीचे भाव तुम्हाला वाढत असलेलेच पाहायला मिळणार आहेत.