Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Insurance Complaint Options: विमा कंपनीवर नाराजी? कशी कराल तक्रार? 'या' पाच मार्गांचा अवलंब करा

Insurance Complaint Options: विमा कंपनीवर नाराजी? कशी कराल तक्रार? 'या' पाच मार्गांचा अवलंब करा

Insurance Complaint Options: तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी विमा कंपन्यांकडून पॉलिसी घेतली जात असते. मात्र विमा कंपनीकडून योग्य सेवा दिली जाईलच, याची शाश्वती नसते. खरं तर ऐनवेळी गैरसोय होऊ नये, म्हणून विविध प्रकारचा विमा काढला जातो. कंपन्यांकडून मात्र योग्य सेवा दिली जात नाही.

विमा पॉलिसी विविध प्रकारच्या असू शकतात. काही ठेवींसाठी, काही आरोग्यासाठी तर काही वाहनांसाठी. विमा कंपन्या अनेक प्रकारच्या पॉलिसी (Policy) आणतात. या माध्यमातून तुम्हाला भविष्यकाळातल्या आपत्कालीन परिस्थितीत आर्थिक सुरक्षा मिळते. मात्र विमा पॉलिसी घेण्यापूर्वी तुम्हाला हेही माहीत असायला हवं, की ज्या कंपनीची पॉलिसी तुम्ही घेणार, त्यांच्या ग्राहकांना कशी सेवा मिळाली आहे? त्यांनी तक्रारी केल्या आहेत का? तुम्हालाही विमा कंपनीकडून काही त्रास झाला असेल, गैरसोय झाली असेल, तर त्याविरुद्ध तक्रार (Complaint) दाखल करता येवू शकते.

'या' पाच मार्गांचा उपयोग करू शकता

विमा कंपनीच्या तक्रार अधिकाऱ्याकडे करा तक्रार

तुमच्या तक्रारीसह आणि सर्व आवश्यक कागदपत्रांसह विमा कंपनीच्या तक्रार निवारण अधिकाऱ्याला लेखी तक्रार पत्र पाठवावं. तुम्हाला विमा कंपनी किंवा विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या (IRDAI) वेबसाइटवर संपर्काविषयीचे डिटेल्स सापडतील. तक्रार केल्यानंतर मिळालेली स्लिप अर्थात पावती जपून ठेवा, भविष्यासाठी ती तुमच्या उपयोगाला येणार आहे.

वेळेची मर्यादा

विमा कंपनीकडे तक्रार आल्यानंतर ती 15 दिवसांत सोडवणं गरजेचं आहे. तसं न झाल्यास किंवा कंपनीच्या प्रतिसादानं समाधानी नसल्यास, तुम्ही आयआरडीएकडे तक्रार दाखल करू शकता.

आयआरडीएशी संपर्क

तुम्ही आयआरडीएच्या ऑनलाइन पोर्टलवर तक्रार निवारण सेलवर (complaints@irda.gov.in) जाऊन तक्रार नोंदवू शकता. किंवा 155255 (किंवा) 1800 4254 732वर कॉल करूनही तक्रार नोंदवता येईल.

आयजीएमएस

तुम्ही igms.irda.gov.inवर तक्रार नोंदवू शकता. याशिवाय तुम्ही आयआरडीएची एकात्मिक तक्रार व्यवस्थापन प्रणालीदेखील वापरू शकता. डिटेल्स भरून रजिस्ट्रेशन करावं. तक्रार नोंदवल्यानंतर तुम्हाला एक टोकन क्रमांक दिला जाईल.

विमा लोकपाल किंवा दिवाणी न्यायालयात तक्रार

यानंतरही तुम्‍ही समाधानी नसाल, तर तुम्ही विमा लोकपालाकडे संपर्क साधू शकता किंवा दिवाणी न्यायालयात विमा कंपनीविरुद्ध दिवाणी तक्रार दाखल करू शकता.

या गोष्टींकडे लक्ष द्या

आयआरडीएकडे जाण्यापूर्वी, संबंधित विमा कंपनीकडे तक्रार करणं आवश्यक आहे. आयजीएमएस प्रणाली पॉलिसीधारकाला त्याच्या तक्रारीत सुधारणा करण्याची परवानगीदेखील देत असते.