सध्या खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका त्यांच्या ग्राहकांना वेगवगेळ्या सुविधा देताना दिसतात. मोबाईल बँकिंग सुविधा सुरु झाल्यापासून अनेकांचे काम सोपे झाले आहे. छोट्याछोट्या गोष्टींसाठी बँकेत जाण्याचा त्रास वाचला आहे. आपल्या बँक खात्यात किती रुपये शिल्लक आहेत, पासबुकचे डीटेल्स काय आहेत हे बघण्यासाठी तासनतास नागरिकांना रांगेत उभे राहावे लागत होते. मात्र आता नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाने बँक बॅलन्स तपासता येतो आहे.
मोबाईल बँकिंग वापरताना जर इंटरनेट कनेक्शन नसेल आणि अशावेळी बँक बॅलन्स तपासायची वेळ आली तर तुम्ही तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून तुमच्या बँकेने दिलेल्या मोबाईल क्रमांकावर मिस कॉल देऊ शकता आणि माहिती मिळवू शकता.
या सेवेचा फायदा ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. तुम्ही तुमच्या बँकेत नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून मिस्ड कॉल देऊन तुमचा बँक बॅलन्स तपासू शकता. तुम्ही मिस्ड कॉल देताच बँक तुम्हाला एसएमएसद्वारे हा तपशील पाठवेल.
कुणाला मिळेल या सेवेचा लाभ?
जा बँक खातेदारांनी त्यांचे केवायसी अपडेट पूर्ण केले आहेत आणि तुमचा वापरात असलेला मोबाईल क्रमांक रजिस्टर केला आहे,अशाच ग्राहकांना हे अपडेट दिले जाणार आहेत. तुम्ही जर तुमचा मोबाईल क्रमांक बदलला असेल तर तुम्हांला तुमच्या बँक शाखेत जाऊन तुमचा नवीन मोबाईल क्रमांक अपडेट करावा लागेल, अन्यथा या सेवेचा लाभ तुम्हांला घेता येणार नाहीये.
प्रत्येक बँकेचा क्रमांक वेगळा
मिस कॉल देऊन तुमचा बँक बॅलन्स जर तुम्ही तपासणार असाल तर तुम्हांला तुमच्या बँकेचा संबंधित क्रमांक माहिती असायला हवा. प्रत्येक बँकेचा ही सुविधा देणारा नंबर वेगवेगळा आहे हे लक्षात घ्या. तसेच तुमचे एकापेक्षा अधिक बँकेत बँक खाते जर असेल आणि तुमचा नोंदणीकृत मोबाईल सेम असेल तर काहीही अडचण नाही. केवळ ज्या बँक खात्याचा बँक बॅलन्स तुम्हांला चेक करायचा आहे त्या बँकेच्या नंबरवर तुम्हाला मिस कॉल द्यायचा आहे.
मिस्ड कॉलद्वारे बँक शिल्लक तपासण्यासाठी बँक क्रमांक जाणून घ्या
- इंडियन बँक : 919289592895
- येस बँक : 919223920000
- करूर वैश्य बँक : 919266292666
- सारस्वत बँक : 919223040000
- बंधन बँक : 1800-258-8181
- IDBI बँक: 1800-843-1122
- कोटक महिंद्रा बँक : 1800-274-0110
- PNB बँक : 1800-180-2222
- आयसीआयसीआय बँक : 02230256767
- HDFC बँक : 1800-270-3333
- बँक ऑफ इंडिया : 02233598548
- कॅनरा बँक : 919015483483
- कर्नाटक बँक : 1800-425-1445
- आरबीएल बँक : 1800-419-0610
- DCB बँक : 917506660011
- ॲक्सिस बँक :1800-419-5959
- बँक ऑफ बडोदा : 919223011311
- धन लक्ष्मी बँक : 918067747700
वर नमूद केलेले बँक क्रमांक संबंधित बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरून घेतले आहेत. हा नंबर बँका नंतर बदलू देखील शकतात. त्यामुळे जर तुम्हाला वर दिलेल्या मोबाईल नंबरवरून बँक बॅलन्सचे अपडेट मिळत नसतील तर बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन नंबर चेक करून बघा.