• 04 Oct, 2022 16:36

स्वस्तात खरेदी करायची आहे? हे अ‍ॅप पण बघा!

shopping

ई कॉमर्स वेबसाईट्सवर शॉपिंग करण्याचा फायदा म्हणजे यात तुम्हाला तुमचे आवडते प्रोडक्टड घरबसल्या कमी किमतीत मिळतात. तसेच वेगवेगळ्या प्रोडक्टवर 50 टक्क्यांपासून अगदी 80 टक्क्यांपर्यंत सूट दिली जाते.

सध्या जग इतका जवळ आलं आहे कि आपल्या हातातल्या मोबाईलने पाहिजे ते सहज मिळवता येत. अनेकांना खरेदी करायची असते पण बाहेर जाण्याचा आणि दुकानदारासोबत किमतीत बार्गेनिंग करण्याचा कंटाळा येतो. अशा वेळी हातातल्या मोबाईल मधील काही शॉपिंग अ‍ॅप (Shopping app) आपल्याला खुणावतात. तसही  पावसाळा सुरु झाला कि ई कॉमर्स साईट (E-commerce website) किंवा  वर सेलचा (Sale) पूर येतो. वेगवेगळ्या प्रोडक्टवर 50 टक्क्यांपासून अगदी 80 टक्क्यांपर्यंत सूट दिली जाते. ई कॉमर्स वेबसाईट्सवर (E-commerce website) शॉपिंग करण्याचा फायदा म्हणजे यात तुम्हाला तुमचे आवडते प्रोडक्टड घरबसल्या कमी किमतीत मिळतात. सध्या अ‍ॅमेझॉन (Amazon) आणि फ्लिपकार्ट (Flipkart) या देशातील प्रमुख ऑनलाइन शॉपिंग साइट्समध्ये असून या साईटवरून रोज लाखो लोक शॉपिंग करतात. तुम्हालाहि खरेदी करायची असेल तर अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट व्यतिरिक्त आणखी काही अ‍ॅप आहेत जे चांगल्या प्रतीचे प्रॉडक्ट तुम्हाला कमी किमतीत घरपोच (Free home delivery) आणून देतात. 

मीशो (Meesho)

मीशो (Meesho) ही अशीच एक ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट आहे. जी अलीकडे खूप लोकप्रिय झाली आहे. स्वस्त ऑफर्समुळे, शपिंग करणारे सतत या वेबसाइटकडे आकर्षित होत असल्याचे दिसून येत आहे. तुम्ही बाजारातून 500 ते 600 रुपयांना जे कपडे खरेदी करता ते मीशोवर केवळ 150-300 रुपयांमध्ये खरेदी करता येतात. ही वेबसाइट केवळ स्वस्तात वस्तूच विकत नाही तर, फ्री डिलिव्हरीचा पर्याय देखील देते. तसेच तुम्ही मिशोच्या माध्यमातून रिसेलर बनून नफाही कमवू शकता. 

जेम (GeM) 

जेम (GeM) हा देखील स्वस्त पर्याय आहे: GeM, म्हणजे गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस हे एक सरकारी मार्केटप्लेस आहे जिथे तुम्हाला तुमच्या आवडीच्या आणि गरजेच्या सर्व गोष्टी मिळतील आणि तेही अगदी स्वस्त दरात. जेमवर मिळणाऱ्या वस्तूंची किंमत बाजारभावापेक्षा खूपच कमी असते. ही जुनी वेबसाईट आहे पण त्याबद्दल फार लोकांना माहित आहे. या सरकारी वेबसाइटवरून खरेदी करून तुम्ही मोठ्या प्रमाणात बचत करू शकता.

शॉपसी (Shopsy)

शॉपसी (Shopsy) असे अ‍ॅप आहे जिथे 89 रुपयांपासून तुम्हाला खरेदी करता येते. या अ‍ॅप च्या माध्यमातून तुम्ही कपडे, किराणा, सौंदर्यप्रसाधने,  गृहसजावटीचं सामान असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तुमचा बजेट मध्ये शॉपिंगसाठी चांगला पर्याय आहे. यात किमतीचे वेगवेगळे विभाग आहेत 99 रुपयांपासून एखाद्या वास्तूवर 80 टक्क्यांपर्यंत सूटही दिली जाते.

या शॉपिंग अ‍ॅपच्या माध्यमातून तुम्ही स्वस्तात खरेदी करू आपले पैसे वाचवू शकता. या अ‍ॅपद्वारे मागवलेल्या सामानाची गुणवत्ताही उत्तम असते.