Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Low Interest Rate Home Loan: वाढत्या महागाईत घर घ्यायचंय; या बँका देत आहेत स्वस्तात होम लोन

lowest interest rate on home loan

Low Interest Rate Home Loan: कर्ज देणाऱ्या बँका आणि वित्तीय संस्था या ज्या ग्राहकांचा क्रेडिट स्कोअर मजूबत आहे. त्यांना कर्ज देण्यात प्राधान्य देतात. जर तुमचा क्रेडिट स्कोअर 800 आसपास आहे; आणि तुमचा लोन ट्रॅक रेकॉर्ड चांगला असेल तर तुम्हाला ही किमान व्याजदराने नक्कीच होम लोन मिळू शकते.

Low Interest Rate Home Loan: स्वत:चे घर विकत घेणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते, आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाला होम लोन हे घ्यावेच लागते. होम लोन घेतल्यानंतर त्यावर भरावे लागणारे व्याज आणि ईएमआय हा प्रत्येकाच्या लाईफवर परिणाम करत असतो. अनेकांचे आयुष्य होम लोनचे हप्ते फेडण्यात जाते. तर काही जण ईएमआय आणि घरातील खर्चाची सांगड घालण्यात जीवन जगणेच विसरून जातात. तर आज आपण किमान व्याज दराने होम लोन देणाऱ्या बँकांबद्दल आणि त्यांनी दिलेल्या ऑफर्सबद्दल जाणून घेणार आहोत.

सध्याच्या घडीला HDFC Bank ही सर्वांत कमी होम लोन देत आहे. HDFC Bank 8.40 टक्के प्रतिवर्षाने होम लोन देत आहे. तर UCO Bank वार्षिक 8.45 टक्के आणि त्यापेक्षा जास्त दराने होम लोन देत आहे. त्यानंतर Union Bank of India, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, LIC हाऊसिंग फायनान्स आणि Bajaj हाऊसिंग फायनान्स 8.50 टक्के व्याजदराने होम लोन देत आहेत. हे या बँकांचे किमान व्याजदर आहेत. प्रत्यक्ष कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा क्रेडिट स्कोअर, कर्जाची रक्कम, त्याच्या कामाचे स्वरुप आणि वार्षिक उत्पन्न हे तपासूनच बँक होम लोन देते आणि त्यानुसारच त्याचा व्याजदर देखील ठरतो.

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे व्याजदर

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा विचार केला तर स्टेट बँक ऑफ इंडिया किमान 30 लाखापर्यंतच्या कर्जासाठी 8.50 ते 10.15 टक्के यादरम्यान व्याजदर आकारत आहे. यामध्ये ग्राहकाचे उत्पन्न आणि सर्व कागदपत्रांची पूर्तता होते की नाही. यावरून बँक व्याज देत आहे. त्यानंतर युनिअन बँक ऑफ इंडिया 8.50 ते 10.75 टक्के या व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देत आहे. तर पंजाब आणि सिंध बँक 8.85 ते 9.95 टक्के या दरम्यान व्याज आकारत आहे.

Public sector bank interest rate aug 23

खाजगी क्षेत्रातील बँकांचे व्याजदर

सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँकांच्या व्याजदरात स्पर्धा सुरू असते. पण यामध्ये कागदपत्रांची पूर्तता आणि डिजिटायझेनच्या प्रक्रियेमुळे खाजगी बँकांची प्रक्रिया जलदगतीने होत असल्याचे दिसून येते. सध्याच्या घडीला खासगी बँकांमधील एचडीएफसी बँक ही 30 लाख रुपयांच्या कर्जवर किमान 8.40 टक्के व्याज आकारत आहे. हा मार्केटमधील सर्वाधिक कमी व्याजदर मानला जातो. HDFC बरोबरच, ICICI, Kotak Mahindra आणि Axis आदी बँकाही किमान व्याजदराने होम लोन देतात.

Private Setor Bank Interest rate aug 2023

हाऊसिंग फायनान्स कंपन्यांचे व्याजदर

साधारपणे सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँकांच्या तुलनेत हाऊसिंग फायनान्स कंपन्यांचे व्याजदर हे अधिक असतात. ज्या ग्राहकांना वरील दोन्ही बँकांकडून कर्ज मिळण्यात अडचण येते. तेव्हा बरेचसे ग्राहक अशा फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेतात. या बँकांकडून कर्ज लगेच वितरित होते. पण यांचे व्याजदर अधिक असतात.  

Housing finance company Interest Rate Aug 23

होम लोनवरील व्याजदर कसा आकारला जातो?

होमलोन हे दीर्घकाळ म्हणजे 20 ते 25 वर्षे चालणारे लोन असते. त्यामुळे त्या लोनवर आपण किती व्याज भरणार आहोत. त्याचा ईएमआय किती असणार, याची माहिती आपल्याला असणे गरजेचे आहे. हा व्याजदर किंवा बदलता ईएमआय तुम्ही स्वत:ही मोजू शकता.

Home Loan EMI Calculator

कर्जाची रक्कम
व्याज दर किती टक्के?
%
कर्जाचा कालावधी
Yr
मासिक EMI
कर्जाची रक्कम
किती व्याज मिळाले
एकूण मूल्य

तुम्ही आमच्या ईएमआय कॅल्क्युलेटरचा (Home Loan EMI Calculator) वापर करून तु्म्हाला किती होम लोन हवे आहे आणि बँक त्यासाठी किती व्याजदर आकारत आहे. यावरून तुम्ही तुमचा ईएमआय आणि एकूण व्याजाची रक्कम मोजू शकता. या कॅल्क्युलेटरमध्ये तुम्हाला फक्त होम लोनची रक्कम, कर्जाचा कालावधी आणि व्याजदर टाकावा लागतो. हे आकडे टाकले की तुम्ही कॅल्क्युलेट या बटणावर क्लिक करून तुम्हाला अपेक्षित असलेली माहिती मिळवू शकता.

होम लोनमध्ये व्याज दराचे प्रकार असतात का?

होय, होम लोनमध्ये व्याजदराचे प्रामुख्याने दोन प्रकार असता. त्यानुसार बँक प्रत्येक ग्राहकाकडून व्याजदर आकारत असते. त्यातील पहिला व्याजदर फिक्सड इंटरेस्ट रेट आणि दुसर फ्लोटिंग इंटरेस्ट रेट (Fixed Interest Rate & Floating Interest Rate) आहे.

Fixed Interest Rate मध्ये ग्राहकांना फिक्स व्याजदराने कर्ज दिले जाते. जितकी वर्षे तुम्ही कर्ज फेडता तेवढी वर्ष हा व्याजदर तेवढाच राहतो. त्यामध्ये बदल होत नाही. ग्राहक फिक्स इंटरेस्ट रेटमधून फ्लोटिंग इंटरेस्ट रेट या प्रकारात जाऊ शकतात.

Floating Interest Rate मध्ये आरबीआयच्या रेपो रेटनुसार बदल होतात किंवा बँक सुद्धा या दरामध्ये बदल करू शकते. बँकेने व्याजदरात बदल केले की, ते ग्राहकांना लगेच लागू होतात. त्यामुळे ग्राहकाचा ईएमआय किंवा कर्जाचा कालावधी वाढतो.

तर वर दिलेल्या तक्त्यानुसार तुम्ही संबंधित बँकेला भेट देऊन बँकेची होम लोनवरील संपूर्ण ऑफर समजून घ्या. बँकेकडे प्रत्येक घटकासाठी वेगवेगळ्या प्रकारची योजना असते. ती तुम्हाला प्रत्यक्ष बँकेच्या अधिकाऱ्यांकडून समजून घेऊन त्याचा लाभ घेता येऊ शकतो.