Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SBI Home Loan Offer: स्टेट बँकेचे नवीन व्याजदर, ईएमआय आणि पात्रता जाणून घ्या

SBI Home Loan Special Interest Rate

Image Source : www.en.wikipedia.org

SBI Home Loan Offer: स्टेट बँक ऑफ इंडिया होम लोन अंतर्गत ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारचे जवळपास 16 प्रकारचे गृह कर्ज उपलब्ध करून देते. त्यातील आपण काही निवडक आणि सिबिल स्कोअरशी संबंधित कर्जाचे व्याजदर जाणून घेणार आहोत.

SBI Home Loan Offer: रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कोणतीच वाढ ने केल्याने बँकांकडून कर्जाचे व्याजदर जैसे थे राहण्याची शक्यता आहे. त्यात काही बँकांनी आपल्या गृह कर्जाचे व्याजदर नियंत्रणात ठेवले आहेत. त्याचा ग्राहक नक्कीच लाभ घेऊ शकतात. तर आज आपण स्टेट बँक ऑफ इंडियाच्या होम लोनचे व्याजदर आणि त्याच्यासाठी आवश्यक असणारी पात्रता, ईएमआय अशा सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या गृह कर्जाचे व्याजदर सध्या सर्वाधिक कमी आहेत. बँक सध्या 8.50 टक्के व्याजदराने कर्ज देत आहे. तसेच हे कर्ज 30 वर्षांच्या कालावधीकरीता दिले जात असून, कर्जदारांना अगदी प्रॉपर्टीच्या 90 टक्क्यांपर्यंत होम लोन देण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे. त्यामुळे ज्यांची घर घेण्याची इच्छा आहे. त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे.

एसबीआय स्पेशल होम लोन स्कीम्स

एसबीआयने होम लोन घेणाऱ्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या योजना देखील आणल्या आहेत. यामध्ये सरकारी कर्मचारी, खाजगी कर्मचारी आणि छोट्या व्यावसायिकांपासून डोंगराळ/आदिवासी भागात राहणाऱ्यांसाठी स्पेशल होम लोन स्कीम्स आणल्या आहेत. त्याचबरोबर होम लोनमध्ये एसबीआय महिलांना व्याजदरात विशेष सवलत देखील देत आहे. नियमित व्याजदरातमध्ये 0.05 टक्क्यांची सवलत, त्याचबरोबर होम लोन ओव्हरड्राफ्ट सुविधा, बॅलन्स ट्रान्सफर सुविधा, टॉप-अप सुविधामध्येही सवलत देत आहे.

होम लोनसाठी पात्रता काय?

स्टेट बँक 18 वर्षांपासून 70 वर्षांपर्यंतच्या व्यक्तीला गृह कर्ज उपलब्ध करून देते. या पात्रतेमध्ये कर्जाच्या रकमेनुसार आणि मालमत्तेनुसार बदल होऊ शकतो. पगारदार व्यक्तींना कर्ज घेण्यासाठी 3 महिन्याचे सॅलरी सर्टिफिकेट, तसेच मागील 2 वर्षाचे इन्कम टॅक्स रिटर्न भरल्याची पावती आणि वैयक्तिक ओळखीच्या पुराव्याचे कागदपत्रे लागतात.

Features of SBI Home Loan

SBI Home Loan Interest Rates

स्टेट बँकेचे गृह कर्जावरील व्याजदर हे किमान 8.50 टक्क्यांपासून सुरू होते. पण बँक हे व्याजदर देताना ग्राहकांचा क्रेडिट स्कोअर किती आहे आणि ग्राहकांनी कोणत्या प्रकारांतर्गत होम लोन मागितले आहे. यावर व्याजदर ठरवते. ज्या ग्राहकांचा सिबिल स्कोअर (CIBIL Score) 800 किंवा त्यापेक्षा अधिक आहे. त्या ग्राहकांना एसबीआय सर्वांत कमी व्याजदर ऑफर करत आहे. ज्या ग्राहकांचा सिबिल स्कोअर नाही किंवा जे प्रथमच कर्ज घेत आहेत. त्यांना मात्र बँक जास्तीच्या व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देत आहे.

सिबिल स्कोअरनुसार बँकेचे व्याजदर

स्टेट बँकेतर्फे ऑगस्ट महिन्यात होम लोनवर एक विशेष कॅम्पेन चालवले जात आहे. या कॅम्पेननुसार, ज्या ग्राहकांचा सिबिल स्कोअर 800 किंवा त्यापेक्षा अधिक आहे. त्यांना बँक 8.70 टक्क्यांपर्यंत व्याजदर देत आहे. 700 ते 749 या दरम्यान सिबिल स्कोअर असलेल्यांना 8.80, 650 ते 699 साठी 9.45, 550 ते 649 साठी 9.45 आणि ज्यांचा सिबिल स्कोअरच उपलब्ध नाही त्यांच्यासाठी बँक 8.80 टक्के व्याजदर देत आहे. हे व्याजदर ऑगस्ट महिन्यापुरते सिमित आहेत. 31 ऑगस्टपर्यंत ग्राहक याचा लाभ घेऊ शकतात. खालील तक्त्यामध्ये तुम्ही या महिन्याच्या ऑफरमधील आणि नियमित व्याजदर पाहू शकतात.

SBI Home Loan Rates with CIBIL Score

स्टेट बँकेने ऑगस्ट महिन्यातील कॅम्पेनद्वारे SBI Top-Up Home Loan ची सुविधासुद्धा ग्राहकांना दिली आहे. टॉप-अप लोनद्वारे एसबीआय या महिन्यात नियमित रेट पेक्षा कमी व्याजदराने कर्ज देत आहे.

SBI Tribal Plus

एसबीआय बँकेने नियमित कर्जाव्यतिरिक्त या महिन्यात एक विशेष होम लोन कॅम्पेन चालवले आहे. या कॅम्पेनबरोबरच बँक ट्रायबल प्लस नावाची एक योजना राबवत आहे. ही योजना आदिवासी भागात राहणाऱ्या लोकांसाठी लागू आहे. यामध्ये ग्राहकांच्या सिबिल स्कोअरनुसार बँक व्याजदर ऑफर करत आहे. जसे की, 750 व त्यापेक्षा जास्त स्कोअर असलेल्या ग्राहकांना बँके 9.25 टक्के दराने कर्ज देत आहे. 700 ते 749 साठी 9.45 टक्के, 650 ते 699 साठी 9.55 टक्के, 550 ते 649 साठी 9.75 टक्के आणि ज्यांचा सिबिल स्कोअर उपलब्ध नाही, त्यांना 9.45 टक्के व्याजदराने कर्ज देत आहे.

एसबीआयची लोन प्रोसेसिंग फी किती आहे?

स्टेट बँक सध्या होम लोनसाठी कर्जाच्या एकूण रकमेपैकी 0.40 टक्के प्रोसेसिंग फी आकारते. त्यासोबत त्यावर जीएसटी लावून जी रक्कम होते. तेवढी प्रोससिंग फी बँक घेते. साधारण बँक किमान 10,000 आणि कमाल 30,000 रुपये प्लस जीएसटी अशी प्रोसेसिंग फी आकारते. त्याचबरोबर एसबीआय प्री-अॅप्रव्हू होम लोनसुद्धा ऑफर करते. यामुळे अर्जदारांची होम लोनची प्रक्रिया जलदगतीने होण्यास मदत होते.