Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Electric Vehicles Benefits: EV खरेदी करायचा प्लॅन बनवताय? फायदे वाचून व्हाल थक्क!

Electric Vehicles Benefits: EV खरेदी करायचा प्लॅन बनवताय? फायदे वाचून व्हाल थक्क!

Image Source : www.gomechanic.in

सध्या या धावपळीच्या जमान्यात, सगळेच फास्ट झाले आहेत. या फास्ट वातावरणात तुम्हाला स्मूद ड्रायव्हिंगचा अनुभव घ्यायचा असल्यास, तुम्ही EV खरेदी करण्याचा प्लॅन बनवू शकता. कारण, या गाडीचे फायदे इतके आहेत की तुम्ही वाचून थक्क व्हाल.

आता गाडी घेणं पहिल्यासारखं नाही आहे. पूर्वी एखादीच गाडी रस्त्यावर दिसायची. आता तर रांगाच रांगा दिसतात. कारण, मार्केटमध्ये गाडी घ्यायची म्हटल्यावर लोनपासून सर्वच गोष्टी सहज उपलब्ध आहेत. त्यामुळे गाडी घेणे सोपे झाले आहे. पण, तिचा मेंटेनन्स करणे, पेट्रोलचा खर्च आणि दुरूस्ती खर्चाने माणूस त्रासून जातो. पण, तुम्ही EV खरेदी करायचा विचार करत असल्यास, ही तुमच्यासाठी योग्य वेळ असणार आहे. या गाडीचे खूप फायदे आहेत. जर तुम्ही गाडी खरेदी करण्याचा निर्णय घेतला असल्यास, तुम्ही चांगले वातावरण तयार करण्याच्या दृष्टीने पाऊल टाकले म्हणायला हरकत नाही. कारण, ही गाडी पर्यावरणपूरक आहे. त्यामुळे ही गाडी घेतल्यास तुमचे पैसेच वाचणार नाहीत तर चांगले वातावरण तयार व्हायला ही मदत होणार आहे.

मेंटेनन्स खर्च आहे बजेटात

EV कारची रचना पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या कारपेक्षा खूप सरस आहे. त्यामुळे तिच्यात बिघाड होण्याची शक्यता कमी असते. तसेच, इंजिन असलेल्या कारला ज्या गोष्टी सतत बदलवत राहाव्या लागतात, जसे की ब्रेक पॅड, त्या EV ला बदलवायची गरज पडणार नाही. कारण, या कारमध्ये रिजनरेटिव्ह ब्रेकिंगची सुविधा आहे. तुम्ही जर EV ची योग्यरित्या काळजी घेतली आणि ड्रायव्हिंग व्यवस्थित केली. तर तुम्हाला तिला गॅरेजला न्यायची वेळ येणार नाही. त्यामुळे तुमचे पैसेच नाहीतर वेळ वाचायलाही मदत होणार आहे.

पेट्रोल-डिझेलचे नाही टेन्शन

सध्या वाढत्या पेट्रोल-डिझेलचे भाव पाहता EV खरेदी करणे फायद्याचे ठरणार आहे. तसेच, या भावात काही कमी होण्याचे काहीच मार्ग नाहीत. त्यामुळे EV खरेदी केल्यास, तुम्हाला ती चार्ज करण्यासाठी जास्त पैसे देण्याची गरज पडणार नाही. कार खरेदी केल्यानंतर तुम्ही तुमच्या घरी देखील चार्जिंग स्टेशन इन्स्टाॅल करू शकता. जे दीर्घकाळ तुम्हाला चार्जिंगसाठी कामी येऊ शकते. काही ठिकाणी सार्वजनिक EV स्टेशन उभारल्या जात आहेत. त्यामुळे कारची विक्री वाढल्यास, येत्या काही दिवसात सर्वच ठिकाणी चार्जिंग स्टेशन पाहायला मिळू शकतात. त्यामुळे कार खरेदी केल्यास चार्जिंगसाठी जास्त खर्च लागणार नाही.

इमर्जन्सीत मिळू शकतो चांगला रिटर्न

जर तुम्ही गाडीला फुलासारखं जपल्यास, ती विकायला नेल्यावर चांगली किंमत मिळू शकते. तसेच, तुम्ही ती विकल्यानंतरही अपग्रेड असलेली नवीन EV खरेदी करू शकता. त्यासाठी तुम्हाला कोणताही अडथळा येणार नाही. ही कार खरेदी करणं चांगली गुंतवणूक आहे. जेव्हा तुम्हाला काही आर्थिक इमर्जन्सी असेल, त्यावेळी कार विकून, तुम्ही चांगले पैसे मिळवू शकता.  

EV ला आहे जास्त वाव

एकदा लोकांना EV चे महत्व कळल्यावर, लोक EV खरेदीलाच प्राधान्य देणार आहेत. त्यामुळे EV हे वाहतुकीचे भविष्य आहे. तसेच, रोजच काहीतरी नवीन कल्पना मार्केटमध्ये येतच आहेत. त्यामुळे या वाहनांना जास्त वाव आहे. मार्केटमध्ये प्रत्येक मोठी कंपनी EV बनवण्यासाठी मार्केटमध्ये उतरत आहेत. त्यामुळे जे सुविधा आपल्याला पेट्रोल-डिझेल कारमध्ये मिळत आहेत. तेच EV मध्ये सुद्धा आहेत. विशेष म्हणजे ते सर्व परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध आहेत.

टॅक्समध्येही मिळेल सवलत

EV कारला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने खरेदीदारांना इन्कम टॅक्स अॅक्टनुसार 80EEB अंतर्गत ऑटो लोन घेतल्यावर त्याच्या वार्षिक व्याजदरावर ग्राहकाला 1.5 लाखापर्यंत सवलत मिळवू शकते. ही सवलत फक्त व्याजावर मिळणार आहे, कारच्या किमतीवर नाही. तसेच EV कार पहिल्यांदा घेत असल्यासच याचा लाभ मिळणार आहे. याचबरोबर ही सुविधा दुचाकी आणि चारचाकी सर्व वाहनांवर लागू असणार आहे. तसेच, जीएसटी दरातही तुम्हाला सवलत मिळू शकते. त्यामुळे EV खरेदी करताना तुम्ही या सर्व गोष्टींचा फायदा घ्यायला विसरू नका.