• 06 Jun, 2023 18:40

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Budget friendly laptops : कॉलेज-ऑफिस कामासाठी स्वस्तात मस्त लॅपटॉप हवाय? पाहा, काही खास पर्याय...

Budget friendly laptops : कॉलेज-ऑफिस कामासाठी स्वस्तात मस्त लॅपटॉप हवाय? पाहा, काही खास पर्याय...

Budget friendly laptops : कॉलेज आणि ऑफिसच्या कामासाठी नवीन लॅपटॉप शोधणाऱ्यांसाठी विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत. किंमत तुलनेनं कमी त्याचबरोबर फीचर्सही योग्य असायला हवेत, जेणेकरून काम करताना ते सहज होईल. असेच काही पर्याय आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. जे बजेटमध्ये असतील आणि फीचर्सही दमदार असतील. पाहूया...

इन्फिनिक्स वाय वन प्लस निओ (Infinix Y1 Plus Neo)

इन्फिनिक्स वाय वन प्लस निओ (Infinix Y1 Plus Neo) हा लॅपटॉप दोन मॉडेल्समध्ये लॉन्च करण्यात आलाय. 8GB रॅम + 256GB स्टोरेज असलेलं पहिलं मॉडेल आहे. याची किंमत सर्वसाधारणपणे 20,990 रुपये इतकी ठेवण्यात आलीय. यात दुसरा प्रकार 8GB RAM + 512GB स्टोरेज असलेला आहे. या मॉडेलची किंमत 22,990 रुपयांपर्यंत जाते. रंगांमध्ये आपल्याला पर्याय मिळतात. या लॅपटॉपमध्ये सिल्व्हर, ग्रे आणि ब्लू कलर असे तीन ऑप्शन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. फीचर्सबद्दल थोडी माहिती घेऊ. या लॅपटॉपचा डिस्प्ले 15.6 इंच फुल एचडी आयपीएस एलसीडी प्रकारातला असणार आहे. 11th जनरेशन इंटेल सेलेरॉन एन 5100 क्वाड कोअर प्रोसेसर (11th-generation Intel Celeron N5100 quad-core processor) देण्यात आलाय. तर 40Wh आणि 45W फास्ट चार्जिंग ही काही इतर फीचर्स देण्यात आलीत.

आसुस व्हिवोबुक गो 14 (Asus VivoBook Go 14)

आसुस व्हिवोबुक गो 14चं बेस मॉडेल 42,990 रुपयांपासून सुरू होतं. हा लॅपटॉप 14-इंचाच्या आयपीएस (IPS) डिस्प्लेसह उपलब्ध आहे. यात AMD Ryzen 7020 प्रोसेसर आहे. 42WHr बॅटरी देण्यात आलीय. ही बॅटरी 45W फास्ट चार्जिंगच्या मदतीनं चार्ज केली जाऊ शकणार आहे. यासोबतच लॅपटॉपमध्ये Wi-Fi 6E, USB 3.2 Gen 1 Type-C, USB 3.2 Gen 1, USB 2.0, HDMI 1.4 पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक यासारखे फीचर्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

लेनोव्हो आयडियापॅड स्लीम 3 (Lenovo IdeaPad Slim 3)

लेनोव्हो आयडियापॅड स्लीम 3 हा लॅपटॉपही 50 हजार रुपयांच्या आतला एक चांगला पर्याय आहे. याची किंमत 41,990 रुपये इतकी ठेवण्यात आलीय. या लॅपटॉपमध्ये तुम्हाला 15.6 इंच फुल एचडी डिस्प्ले मिळणार आहे. 11th जनरेशन इंटेल कोर प्रोसेसर (11th-generation Intel core processor) देण्यात आलाय. स्टोरेजच्या बाबतीत बोलायचं झाल्यास 16GB रॅम आणि 1TBपर्यंत स्टोरेज देण्यात येतंय.

रेडमी बुक 15 (RedmiBook 15)

रेडमी बुक 15 हा 50 हजार रुपयांपेक्षा कमी पैशांत उपलब्ध होणाऱ्या लॅपटॉपमधला आणखी एक चांगला पर्याय आहे. याची किंमत 41,999 रुपये इतकी ठेवण्यात आलीय. फीचर्सही दमदार आहेत. यात 15.6 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले मिळणार आहे. 11th जनरेशन इंटेल कोर आयथ्री प्रोसेसर (11th-generation Intel core i3 processor) देण्यात आलाय. 8GB रॅम, 512GB स्टोरेज यात देण्यात आलंय. 46WHr बॅटरी, 65W पॉवर अॅडॉप्टर यांसारखी इतर वैशिष्ट्ये या लॅपटॉपमध्ये पाहायला मिळतात.

एचपी क्रोमबुक 15.6 (HP Chromebook)

एचपी क्रोमबुक 15.6 हा एक बजेट लॅपटॉपचा उत्तम पर्याय कॉलेज किंवा ऑफिस काम करणाऱ्यांसाठी उपलब्ध झालाय. या लॅपटॉपची किंमत 28,999 रुपये असणार आहे. हा लॅपटॉप भारतात दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलाय. फॉरेस्ट टील आणि मिनरल सिल्व्हर असे दोन रंग मिळणार आहेत. फीचर्सबद्दल सांगायचं तर यात 15.6 इंचाचा डिस्प्ले, N4500 इंटेल सेलेरॉन प्रोसेसर, क्रोमओएस आणि एचपी क्विकड्रॉप यासारखे फीचर्स आहेत.

विविध रंगांत आणि विविध फीचर्सचे हे काही खास ऑप्शन्स आहेत. लेटेस्ट सॉफ्टवेअरसह, चांगल्या स्टोरेजसह हे लॅपटॉप उपलब्ध आहेत. 50,000 रुपयांच्या आत ते चांगला पर्याय आहेत. ऑफरमध्ये घेतल्यास मूळ किंमतीत आणखी सूट मिळू शकते.