• 05 Feb, 2023 13:36

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Virat Kohli and Anushka Sharma : विराट कोहली, अनुष्का शर्माच्या बॉडीगार्डचा पगार जाणून तुम्ही थक्क व्हाल

Virat Kohli and Anushka Sharma

Image Source : www.mid-day.com

तरुणाचे फेव्हरेट कपल असणाऱ्या अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli and Anushka Sharma) यांच्या सुरक्षा रक्षकाला ते किती फी देतात, ते समोर आले आहे. जाणून घेऊया त्याबद्दल.

बॉलीवूड स्टार्स सुरक्षेसाठी मोठा खर्च करतात, आणि जेव्हा क्रिकेट स्टार आणि बॉलीवूड स्टार्सचा विचार केला जातो, तेव्हा सुरक्षेची जबाबदारी वाढते.  अलीकडेच विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या बॉडीगार्ड्सच्या पगाराचा मुद्दा समोर आला आहे. बॉलीवूड स्टार अनुष्का शर्माने स्टार क्रिकेटर विराट कोहलीशी लग्न केले आहे आणि अभिनेत्रीचा पर्सनल बॉडीगार्ड प्रकाश सिंग उर्फ सोनू आहे. अनुष्का सोनूला त्याच्या सेवेची मोठी किंमत देते.

प्रकाश सिंह उर्फ सोनूचा पगार

झूम डॉट कॉमनुसार, प्रकाश सिंह उर्फ सोनूचा वार्षिक पगार सुमारे 1.2 कोटी रुपये आहे. याचा अर्थ सोनूचा पगार अनेक कंपन्यांच्या सीईओंच्या सीटीसीपेक्षा जास्त आहे. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्यासाठी सोनू त्यांच्या कुटुंबाचा एक भाग आहे. दरवर्षी अनुष्का सोनूचा वाढदिवस साजरा करते.

सोनू विराट कोहलीला पुरवतो सुरक्षा 

केवळ अनुष्काच नाही तर सोनू विराट कोहलीला सुद्धा अनेक वेळा संरक्षण देतो, अनेक वेळा माजी कर्णधाराचा सुरक्षा रक्षक नसतानाही सोनू कोहलीला सुरक्षा पुरवताना दिसतो. रिपोर्ट्सनुसार, जेव्हा अभिनेत्री अनुष्का शर्मा आई होणार होती, तेव्हा सोनूने अभिनेत्रीचे सर्वोत्तम प्रकारे संरक्षण केले आणि कोविडचा काळ चालू असताना सोनू अनुष्कासोबत पीपीई किट घातलेला दिसायचा.

विराट आणि अनुष्काचे 2017 मध्ये लग्न झाले 

अनेक दिवस एकमेकांना डेट केल्यानंतर विराट कोहली आणि अनुष्का शर्माने 2017 मध्ये लग्न केले. विराट आणि अनुष्काला मुलगी झाली, जिचे नाव वामिका ठेवले. नुकतीच वामिका एक वर्षाची झाली. यावेळी विराट आणि अनुष्का दोघांनीही आपल्या मुलीसोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला होता.