भारतात IPLच्या प्रत्येक हंगामात क्रिकेटप्रेमींचा उत्साह शिगेला असतो. सुरुवातीपासून पुरुष संघ आयपीएल खेळतांना दिसले मात्र आता महिला संघ देखील आपल्याला या स्पर्धेत खेळतांना दिसणार आहेत. बीसीसीआय व आयपीलच्या संचालक मंडळाने या वृत्ताला दुजोरा दिला होता. लवकरच या स्पर्धेच्या संघांतील खेळाडू निश्चितीसाठी लिलाव होणार आहे.
महिला आयपीएल (WIPL Broadcasting Rights) स्पर्धेचे ब्रॉडकास्टिंग हक्क विक्री करण्यासाठी लिलाव करण्यात आला. अनेक चॅनल्स या लिलावात सहभागी झाले होती. मुकेश अंबानी यांच्या वायकॉम 18 (Viacom18) नेटवर्कने तब्बल 951 कोटी रुपयांची बोली लावत हे हक्क जिंकले. 2023 ते 2027 या स्पर्धेच्या हंगामांसाठी हा लिलाव घेण्यात आला.
बीसीसीआयचे सचिव (BCCI Secretary) जय शहा यांनी ट्विट करत या लिलावाबद्दल माहिती दिली. त्यांनी वायकॉम 18 चे अभिनंदन केले. या स्पर्धेतील प्रत्येक सामन्यासाठी 5 वर्षांसाठी ब्रॉडकास्टिंग कंपनीला 7.9 कोटी रुपये मूल्य मोजावे लागणार आहे.
या महिन्यात महिला आयपीएलचा पहिला हंगाम
महिला आयपीएलचा पहिला हंगाम यावर्षी मार्च महिन्यात खेळवला जाईल. या स्पर्धेचा अंतिम सामना पुरुष आयपीएलच्या (Mens IPL) आधी होईल. या स्पर्धेत 5 संघ सहभागी होणार आहेत. बीसीसीआयने 10 शहरांची यादी केली असून मात्र यातून फक्त 5 संघ निवडले जातील असे बीसीसीआयने जाहीर केले आहे. वायकॉम 18 नेटवर्क यांचे स्पोर्ट्स चॅनल स्पोर्ट्स 18 (Sports 18) या चॅनेलवर सामन्यांचे थेट प्रक्षेपण होईल.
खेळाडूंसाठी कुठलीही बेस प्राइस न ठेवण्याचा निर्णय (No Base Price for Players)
वूमन्स आयपीलच्या लिलावात (WIPL Auction) कुठल्याही खेळाडूची मूळ किंमत (Base Price) ठरवलेली नाही. कारण किंमत ठरविल्यास गुंतवणूकदार आधीच माघार घेतील अशी शक्यता आहे. 31 मार्च 2020 पर्यंत ऑडिटनुसार ज्या कंपन्यांचे बाजारमूल्य 1000 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त आहे. या कंपन्यांनाच या लिलावात सहभाग घेण्याची परवानगी आहे.