• 06 Jun, 2023 17:35

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Vedanta Dividend : वेदांतानं जाहीर केला आर्थिक वर्ष 2024चा पहिला लाभांश, प्रति शेअर 1850 टक्के नफा

Vedanta Dividend : वेदांतानं जाहीर केला आर्थिक वर्ष 2024चा पहिला लाभांश, प्रति शेअर 1850 टक्के नफा

Vedanta Dividend : पोलाद क्षेत्रातली दिग्गज कंपनी असलेल्या वेदांतानं नवीन आर्थिक वर्षासाठी आपला पहिला लाभांश जाहीर केलाय. दरवर्षी मोठा लाभांश देणाऱ्या या कंपनीनं यावेळीही गुंतवणूकदारांना खूश केलंय. कंपनीनं 1 रुपया दर्शनी मूल्यावर 1850 टक्के लाभांश मंजूर केलाय.

वेदांताचा (Vedanta) लाभांश दरवर्षीप्रमाणं यंदाही जाहीर झालाय. यासाठी रेकॉर्ड डेटही जाहीर करण्यात आलीय. पोलाद कंपनी वेदांतानं मे 2020पासून प्रति शेअर 174.5 रुपये लाभांश मंजूर केलाय. 22 मेला बीएसईवर (Bombay Stock Exchange) शेअरची किंमत 287.35 रुपयांवर बंद झाली होती. वेदांतानं आर्थिक वर्ष 2024साठी पहिला अंतरिम लाभांश जाहीर केलाय. या अंतर्गत 18.5/शेअर लाभांश मंजूर करण्यात आलेला आहे. हा लाभांश कंपनीनं 1 रुपया दर्शनी मूल्यावर जारी केलाय. याचाच अर्थ गुंतवणूकदारांना (Investors) प्रत्येक शेअरवर 1850 टक्के नफा मिळणार आहे. कंपनीच्या बोर्डाने लाभांशाची रेकॉर्ड डेट 30 मे निश्चित केलीय.

डिलिस्टिंगच्या घोषणेपासून लाभांश

मे 2020मध्ये कंपनीनं डिलिस्टिंग ऑफरची घोषणा केली होती
डिलिस्टिंगसाठी कंपनीनं 87.5 रुपये किंमत ठेवली होती.
मे 2020पासून कंपनीनं 174.5चा लाभांश दिलाय.

वेदांताचा लाभांश

वर्ष आणि लाभांश

आर्थिक वर्ष 2021 - 9.5

आर्थिक वर्ष 2022 - 45

आर्थिक वर्ष 2023 - 101.5

आर्थिक वर्ष 2024 (आतापर्यंत) - 18.5

एकूण - 174.5

वेदांतानं दिला मोठा लाभांश

  • 174.5 रुपयानुसार सुमारे 65 हजार कोटींचा लाभांश
  • आर्थिक वर्ष 2023मध्ये कंपनीचं स्वतंत्र उत्पन्न सुमारे 68 हजार कोटी इतकं आहे
  • मागच्या तीन वर्षात कंपनीचा स्टँडअलोन नफा सुमारे 55 हजार कोटी इतका आहे.

वेदांताचा नफा

वर्ष आणि स्वतंत्र नफा (कोटींमध्ये)

  • आर्थिक वर्ष 2023 - 27356
  • आर्थिक वर्ष 2022 - 17245
  • आर्थिक वर्ष 2021 - 10503
  • एकूण - 55104

वेदांताविषयी...

वेदांता कंपनीची स्थापना डी. पी. अग्रवाल यांनी 1979/80 साली केली. त्यावेळी स्टरलाइट इंडस्ट्रीज म्हणून ती ओळखली जात होती. अग्रवाल यांनी मुंबईत स्टरलाइट इंडस्ट्रीज (इंडिया) लिमिटेडची स्थापना केली. देशातल्या विविध राज्यांमध्ये खाण सवलती त्यांनी सुरुवातीला मिळवल्या. सध्या ते त्यांची दोन मुलं नवीन अग्रवाल आणि सुनील अग्रवाल यांच्यासोबत आपली कंपनी चालवतात. डी. पी. अग्रवाल यांचा बिहारच्या पटना याठिकाणी एक छोटा अॅल्युमिनियम कंडक्टरचा व्यवसाय होता. त्यांचा मुलगा अनिल अग्रवाल व्यवसायानिमित्त मुंबईत आला. त्यानंतर आपला व्यवसायविस्तार केला.

मायनिंग, ऑइल अँड गॅस, इलेक्ट्रिक युटिलिटी

साधारणपणे 1990च्या दशकात भारत सरकारनं नॉन परफॉर्मिंग कंपन्यांची विक्री करण्याचं जाहीर केलं. त्यावेळी स्टरलाइटनं म्हणजेच आताच्या वेदांतानं अशा कंपन्यांसाठी बोली लावण्यास सुरुवात केली. बाल्को (BALCO) आणि हिंदुस्तान झिंक लिमिटेड अशा कंपन्यांसाठी यशस्वी बोलीदेखील लावली. या दोन कंपन्या 4 वर्षांपासून बंद होत्या. जानेवारी 1993मध्ये अग्रवाल यांनी मॉरिशसमध्ये ट्विनस्टार होल्डिंग्सची स्थापना केली. दरम्यान, कंपनी सध्या मायनिंग, ऑइल अँड गॅस, इलेक्ट्रिक युटिलिटी अशा प्रमुख क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. झिंक, क्रुड ऑइल, स्टील, अ‍ॅल्युमिनिअम, कॉपर, इलेक्ट्रिक पॉवर, लोखंड खनिज अशी विविध उत्पादन कंपनीमार्फत होतात. मुंबई या ठिकाणी कंपनीचं मुख्यालय आहे. तर गोवा, कर्नाटक, राजस्थान, ओडिशा अशा विविध राज्यांत लोहखनिज, सोनं आणि अ‍ॅल्युमिनियमच्या खाणी आहेत.