वेदांत समुहाचे अध्यक्ष आणि देशातील दिग्गज उद्योगपती अनिल अग्रवाल सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ते अनेकदा प्रेरणादायी गोष्टी किंवा त्यांचे अनुभव शेअर करत असतात. आयुष्याच्या संघर्षाशी निगडीत अनेक गोष्टी ते सांगतात. त्यांचा जीवन प्रवासही अनेक अडथळ्यांनी भरलेला आहे. 9 व्यवसायात अयशस्वी झाल्यानंतरही त्यांनी यशाला गवसणी घातली. भंगार विक्रीच्या व्यवसायापासून त्यांनी कामाची सुरुवात केली होती. आता जगभरातील अनेक देशांमध्ये वेदांत समूहाच्या खाणी आहेत. इतर अनेक क्षेत्रामध्ये पाय रोवला आहे. या लेखात आपण जाणून घेणार आहोत.
Table of contents [Show]
बिहारच्या मुलानं पाहिलं मोठं स्वप्न (Anil agarwal hails from Bihar)
अनिल अग्रवाल यांचा जन्म बिहारमधील पटना येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण पटना येथील मिलर हायस्कूल येथे पूर्ण झाले. त्यांचा वडिलांचा अल्युमिनियम कंडक्टर तयार करण्याचा एक छोटा व्यवसाय होता. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी वडिलांसोबत काम करण्यास सुरुवात केली. मात्र, तीन-चार वर्ष वडिलांसोबत काम केल्यानंतर त्यांनी पटना सोडण्याचा निर्णय घेतला. रोजगाराच्या संधी शोधण्यासाठी त्यांनी मुंबईची वाट धरली. सत्तरच्या दशकात वयाच्या १९ व्या वर्षी त्यांनी मुंबईत पाऊल ठेवलं.
भंगार व्यवसायापासून सुरुवात (started as a scrap merchant)
मुंबईला आल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे 9 व्यवसाय सुरु केले. मात्र, सगळ्यात त्यांना अपयश आले. शेवटी त्यांनी भंगाराचा व्यवसाय सुरू केला. दुसऱ्या राज्यातून विकत घेतलेले भंगार, केबलच्या तारा मुंबईत विकायचं काम त्यांनी सुरू केलं. काही दिवसांतच त्यांना या भंगार विक्रीतून चांगला नफा मिळायला लागला. त्यामुळे त्यांनी धातूच्या केबल तयार करण्यासाठी हालचाली सुरू केल्या. 1976 साली त्यांनी समशेर स्टर्लिंग कॉर्पोरेशन ही कंपनी बँकेकडून कर्ज घेवून विकत घेतली. सुरुवातीला त्यांना केबल निर्मिती व्यवसायातील जास्त माहिती नव्हती. मात्र, या व्यवसायातील सर्व माहिती घेवून त्यांनी हळुहळू जम बसवला. 1986 सालापर्यंत त्यांनी भंगार विक्री आणि केबल निर्मिती असे दोन्ही व्यवसाय चालवले.
तांबे धातू वितळवून त्यापासून उत्पादने निर्मिती करणारा प्रकल्प त्यांनी उभा केला. हा प्रकल्प खासगी तत्वावर उभारणारी स्टर्लिंग ही पहिली खासगी कंपनी होती. साधारण 1991 च्या दरम्यान त्यांनी हा प्रकल्प सुरू केल्यानंतर अवघ्या तीन वर्षात त्यांनी तोट्यातील मद्रास अल्युमिनियम ही कंपनी विकत घेतली.
खाण व्यवसायात पदार्पण - (Entry into mining industry)
तांबे, अल्युमिनियम, लोखंड यापासून विविध उत्पादने तयार करण्यास त्यांनी सुरुवात केली. मात्र, यासाठी त्यांना कच्चा मालाची कमतरता भासायला लागली. कच्ची खनिजे मिळवायची असतील तर त्यासाठी खाण उद्योगात उतरायला हवे याची त्यांना जाणीव झाली. त्यावेळी कच्चा माल मिळवण्यासाठी फक्त सरकारी खाणी हाच पर्याय होता. मात्र, नंतर खासगी क्षेत्रातील कंपन्यांनाही खाणी सुरू करण्याचे परवाने मिळू लागले. वेदांत समुहाने मग खणिकर्म उद्योगात पाऊल ठेवले. 2001 साली सरकारने भारत अल्युमिनियम कंपनीतील गूंतवणूक काढून घेण्याचा निर्णय घेतला. त्यात अग्रवाल यांनी 551 कोटी रुपये देऊन या कंपनीत 51 टक्के भागीदारी मिळवली. पुढच्याच वर्षी त्यांनी हिंदुस्तान झिंक लिमिटेड ही कंपनी ताब्यात घेतली.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश (Overseas mining operation)
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी त्यांनी 2003 साली लंडने येथे वेदांत रिसोर्सेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना केली. लंडन शेअर बाजारामध्ये पहिली भारतीय कंपनी लीस्ट होण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यानंतर त्यांनी झांबिया, आफ्रिका, नामिबिया या देशातील खाण उद्योगातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करुन त्यांना ताब्यात घेतले. कंपनीचे मुख्याल लंडनमध्ये आहे. जागतिक स्तरावर वेदांत कंपनीचे अनेक प्रकल्प सुरु आहेत. त्यातून त्यांनी मोठा नफा कमावला आहे. तसेच वेदांत समुहाने सामाजिक क्षेत्रातही भरीव योगदान दिले आहे.
2 हजार कोटी संपत्ती ( 2 billion crore USD worth)
झिंक, कॉपर, अल्युमिनिअम, सिल्वर, कच्चे लोखंड याच्या जगभरात खाणी सुरू केल्या. सोबतच नैसर्गिक वायू, तेल वीज निर्मिती क्षेत्रातही पदार्पण केले. 2020 साली संडे टाइम्स या मासिकाने श्रींमती व्यक्तींची यादी जाहीर केली होती. त्यानुसार अनिल अग्रवाल यांची संपत्ती 2 हजार कोटी डॉलर आहे. नुकताच कंपनीने गुजरात राज्यात फॉक्सकॉन कंपनीसोबत भागीदारी करत सेमिकंडक्टर निर्मितीचा प्रकल्प सुरू करण्यासाठी गुंतवणूक केली आहे.