• 06 Jun, 2023 18:09

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Credit Cards : क्रेडिट कार्ड वापरताय? मग त्यातील विविध प्रकारांचा अर्थ काय ते जाणून घ्या

Credit Cards

Credit Card Type : ग्राहकांच्या आर्थिक गरजा आणि व्यवहार पूर्ण करण्यासाठी बँकेकडून ग्राहकांना डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड दिल्या जाते. डेबिट आणि क्रेडिट कार्ड हे वेगवेगळ्या प्रकारचे असते. जसे की, Gold, Platinum, Classic आणि Titanium. परंतु कार्डवर लिहीलेल्या या शब्दांचा अर्थ काय असतो? हे तुम्हाला माहिती आहे का?

Different Types Of Credit Card : सरकारने बँकेचे व्यवहार करण्यास डिजीटल व्यवहारांना प्राधान्य दिले आहे. बँकांमधील गर्दी कमी व्हावी आणि ग्राहकांना सेवा मिळण्यास सुविधा व्हावी, यासाठी ठिकठिकाणी एटीएम मशीन लावण्यात आल्या. आज युवा पिढीसह अनेक लोक आर्थिक व्यवहार करण्यासाठी डिजीटल पेमेंटचा वापर करतात. तसेच एटीएम मशीन मधून ग्राहक 24 तास पाहीजे तेव्हा पैसे काढू शकतात आणि जमा देखील करु शकतात. अशीच अनेक कामे डिजीटल व्यवहारांच्या माध्यमातून क्रेडिट आणि डेबिट कार्ड वापरुन केली जाते.

तुम्ही वापरत असलेले क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड जर नीट बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की, त्यावर Gold, Platinum, Classic  आणि Titanium असे लिहिले असते. यातील कोणतेही कार्ड ग्राहक आपल्या इच्छेनुसार घेऊ शकतात. परंतु, कुठलेही कार्ड चॉईस करण्याआधी तुम्हाला त्यावर लिहिलेल्या शब्दांचा अर्थ काय होतो हे माहिती असणे आवश्यक आहे.

गोल्ड कार्ड म्हणजे काय?

जर तुमच्याकडे व्हिसाचे गोल्ड (Gold Card) कार्ड असेल, तर त्यावर ट्रॅव्हल असिस्टेंस आणि व्हिजाच्या ग्लोबल कस्टमर असिस्टेंस सर्विसेजसह अनेक फायदे मिळतात. हे गोल्ड कार्ड जगभरात कुठेही स्विकारल्या जाते, कारण ते ग्लोबल नेटवर्कशी संबंधित असते. या गोल्ड कार्डवर ग्राहकांना अनेक डिस्काउंट आणि ऑफर मिळतात.

क्लासिक कार्ड म्हणजे काय?

क्लासिक कार्ड (Classic Card) हे एकदम बेसिक कार्ड मानल्या जाते. जगभरात या कार्डच्या ग्राहकांना अनेक सेवा यावर दिल्या जातात. ग्राहक हे कार्ड केव्हाही रिप्लेस करु शकते.

प्लॅटिनम कार्ड म्हणजे काय?

प्लॅटिनम कार्ड (Platinum Card) असलेल्या ग्राहकांना कॅश डिस्बर्समेंटसह ग्लोबल ATM नेटवर्कपर्यंत अनेक सेवा दिल्या जातात. ग्राहकांना मेडिकल आणि लिगल रेफरल आणि असिस्टेंस मिळतात. हे कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना देखील डील, डिस्काउंट आणि अनेक सुविधांचा लाभ मिळतो.

व्हिसा कार्ड म्हणजे काय?

व्हिसा हे जगातील सर्वात मोठे पेमेंट नेटवर्क कार्ड आहे. बँकांच्या भागीदारीत visa ने विविध प्रकारचे कार्ड लाँच केले. अमेरिकन कंपनी असलेल्या  visa Card चे भारतातील अनेक बँकांकडून डेबिट कार्ड जारी केले जातात.

टिटानियम कार्ड म्हणजे काय?

प्लॅटिनम कार्डच्या तुलनेत टिटानियम (Titanium) कार्डमध्ये ग्राहकांना क्रेडिट लिमिट जास्त मिळते. प्लॅटिनम कार्ड हे चांगली क्रेडिट हिस्ट्री आणि जास्त इनकम असलेल्या लोकांना दिले जाते.