महागाईचा भडका, परराष्ट्र धोरण आणि सेंट्रल बँकेची व्याजदर वाढ या मुद्द्यांवर मागील काही महिने सुरु असलेल्या अमेरिकेतील मिडटर्म इलेक्शनमध्ये रिपब्लिकन पक्षाने मुसंडी मारली आहे. सिनेटच्या एकूण 371 जागांचे निकाल हाती आले आहेत. त्यात 199 जागांवर रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत. यामध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा ओहिओ मतदार संघातून विजय झाला आहे. 172 जागांवर डेमॉक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जिंकले आहेत.
ओहिओचा गड राखण्याच ट्रम्प यांना यश आले असले तरी पेनिनस्लॅवानियामध्ये मात्र ट्रम्प यांचे निकटवर्तीय मेहमेट ओझ यांचा पराभव झाला आहे. मिडटर्म इलेक्शनमध्ये रिपब्लिकन पक्षाने मुसंडी मारली आहे. नेवाडा, विसकॉसिन, अलास्का या राज्यांमध्ये रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार मतमोजणीमध्ये आघाडीवर आहेत. आतापर्यंत सिनेटच्या एकूण 371 जागांपैकी 199 जागांवर रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये रिपब्लिकन पक्षाची ताकद वाढण्याची शक्यता आहे.
डेमोक्रॅटिक पक्षाला मात्र विजयासाठी कसरत करावी लागत आहे. डेमॉक्रॅटिक पक्षाचे उमेदवार अॅरिझोना,जॉर्जिया या राज्यांमध्ये आघाडीवर आहेत. Rhode Island, न्यू हॅम्पशायर येथील सिनेटच्या जागा डेमॉक्रॅटिक पक्षाने जिंकल्या आहेत.
अमेरिकेतील महागाई दर 8.2% इतका आहे. ओहिओमधून माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले आहेत.ट्रम्प यांनी येथे महागाई कमी करणे, ओहिओला मॅन्युफॅक्चरिंग हब तयार करणे अशी अश्वासने मतदारांना दिली होती. 2016 मध्ये आणि 2020 मध्ये ट्रम्प याच मतदार संघातून निवडून आले होते.महागाईने सामान्य अमेरिकेन नागरिकांचे रोजचे जगणे मुश्लिक केले आहे. दैनंदिन खाद्यवस्तूंचे भाव प्रचंड वाढले आहेत. त्यामुळे यंदाच्या मिडटर्म इलेक्शन विद्यमान डेमॉक्रॅटिक पक्षाला फटका बसण्याची शक्यता आहे.
रशिया आणि युक्रेन युद्धाने अमेरिकेत देखील इंधनाचा भडका उडाला आहे. नुकताच राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी बड्या ऑइल कंपन्यांवर विंडफॉल टॅक्स आकरण्याचे संकेत दिले होते. महागाईमुळे बायडेन प्रशासनाला कर महसूल वाढवणे आवश्यक आहे.मात्र इतर कर वाढवले तर मतदारांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. अमेरिकेवरी वाढती कर्जे हा देखील कळीचा मुद्दा आहे. अमेरिकेवर 24 ट्रिलियन डॉलर्सचे कर्ज आहे. ते कमी करण्यासाठी सरकारला उपाययोजना कराव्या लागतील.