Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

US Federal Reserve Rate Hike: अमेरिकेत पुन्हा एकदा कर्जवाढ! व्याजदरात 0.50 टक्क्यांची वाढ!

US Federal Reserve Rate Hike

Image Source : www.aljazeera.com

US Federal Reserve Rate Hike: युएस फेडरल पाठोपाठ बॅंक ऑफ इंग्लंड (Bank of England) आणि युरोपिअन सेंट्रल बॅंक (European Central Bank) ही आपले नवीन व्याजदर जाहीर करणार आहे. या दोन्ही बॅंकांच्या दराबाबत तज्ज्ञांनी 0.50 टक्के दरवाढीचा अंदाज वर्तवला आहे.

US Fed Decision: अमेरिकेची केंद्रीय बॅंक फेडरल रिझर्व्हने (US Federal Reserve) महागाई नियंत्रणात आणण्यासाठी पुन्हा एकदा व्याज दरात वाढ केली. युएस फेडने यावेळी 0.50 टक्के व्याजदरात वाढ केली. गेल्या महिन्यांतील परिस्थितीच्या तुलनेत अमेरिकेतील सध्याची परिस्थिती आटोक्यात असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे युएस फेडने यावेळी फक्त 0.50 टक्क्यांनी व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी युएस फेडने 0.75 टक्क्यांनी वाढ केली होती. त्या तुलनेत सध्या युएस फेडने नरमाईची भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे. येणाऱ्या नवीन वर्षातही युएस फेड महागाईवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशानेच काम करणार असल्याचे बोलले जाते.

नवीन वर्षांतही व्याजदर वाढीची टांगती तलवार!

अमेरिका फेडरल बॅंकेने 2023 वर्ष संपेपर्यंत व्याज दर 5 टक्क्यांपर्यंत आणण्याची योजना आखली आहे. तसेच देशातील बेरोजगारीचा दर कमी करण्यासाठी आणि इकॉनॉमिक ग्रोथ पूर्वपदावर आणण्यासाठी फेडरल बॅंक भर देणार आहे. यापूर्वी अमेरिकन फेडरलने चारवेळा व्याजदरात वाढ केली. प्रत्येकवेळी यूएस फेडने 0.75 टक्क्यांनी दरवाढ घोषित केली आहे. यावेळी फक्त 0.50 टक्क्यांनी वाढ करण्यात आली. 

बॅंक ऑफ इंग्लंड आणि युरोपिअल सेंट्रल बॅंकेची दरवाढ!

बॅंक ऑफ इंग्लंड (Bank of England) आणि युरोपिअन सेंट्रल बॅंक (European Central Bank) गुरूवारी (दि.15 डिसेंबर) आपापले नवीन दर जाहीर करणार आहे. या दोन्ही बॅंकांच्या दराबाबत तज्ज्ञांनी 0.50 टक्के दरवाढीचा अंदाज वर्तवला आहे. या दोन्ही महत्त्वाच्या बॅंका महागाई दर कमी करण्यासाठी कसून प्रयत्न करत आहेत. इथला महागाई दर हा 2 डिजिटवर गेल्यामुळे तो लवकरात लवकर कमी करण्यावर बॅंका भर देणार आहेत. बॅंक ऑफ इंग्लंडने आतापर्यंत 3.5 टक्क्यांनी व्याजदरात वाढ केली. ऑक्टोबर, 2008 पासून हा सर्वाधिक टप्प्यावर पोहोचला आहे. त्यामुळे बॅंक ऑफ इंग्लंडच्या व्याजदरात 0.50 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.

अमेरिकन फेडरलचा व्याजदर 15 वर्षांतील उच्चांकावर!

अमेरिकन फेडरल रिझर्व्हने यावेळी 0.50 टक्क्यांनी व्याजदरात वाढ केली तर यूएस फेडरलचा व्याजदर 4.25 टक्क्यांच्या लक्ष्यावरून 4.50 टक्क्यांवर पोहोचेल. आणि हा दर गेल्या 15 वर्षांतील सर्वाधिक असणार आहे. अमेरिकीची आर्थिक स्थिती अशीच राहिली तर 2023 मध्ये युएस फेडरल पुन्हा एकदा 0.75 टक्क्यांनी व्याजदरात वाढ करेल आणि अमेरिकेचा व्याजदर 5 टक्क्यांपेक्षा अधिक होईल.

युएस फेडरलच्या व्याजदर वाढीच्या बातमीमुळे अमेरिकेच्या शेअर बाजारात 142 अंकांची घसरण होऊन तो 33,966.35 वर बंद झाला. तर S&P 500 इंडेक्समध्ये 0.61 टक्क्यांनी तर Nasdaq Compositeमध्ये 0.76 अंकांनी घसरण झाली.