थर्ड पार्टी यूपीआय पेमेंटसाठी ट्रान्झॅक्शनची मर्यादा निश्चित करण्यात आल्यास गुगलपे आणि फोनपेची बाजारातील मक्तेदारी संपुष्टात येण्याची शक्यता आहे. थर्ड पार्टी यूपीआय (Third Party UPI Payment) पेमेंटसाठी ट्रान्झॅक्शनची मर्यादा लवकरच निश्चित करण्यात येऊ शकते. एका रिपोर्टनुसार, थर्ड पार्टी यूपीआय पेमेंट्सची एकूण व्यवहार मर्यादा 30 टक्क्यांपर्यंत मर्यादित करण्याच्या निर्णयावर नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI–National Payments Corporation of India) रिझर्व्ह बँकेशी चर्चा करत आहे. NPCI ला 31 डिसेंबर 2022 पर्यंत व्यवहार मर्यादेचा नियम लागू करायचा आहे. हा निर्णय लागू झाल्यास बाजारात 'गुगल पे' आणि 'फोन पे'ची मक्तेदारी संपुष्टात येऊ शकते.
सध्या कोणतीही व्यवहार मर्यादा नाही (There Is No Limit)
सध्या व्यवहारांसाठी कोणतीही मर्यादा नाही, त्यामुळे गुगल पे आणि फोन पेचा हिस्सा ८० टक्क्यांपर्यंत वाढला आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये, 'NPCI'ने या कंपन्यांची मक्तेदारी रोखण्यासाठी थर्ड पार्टी अॅप्सवर 30 टक्के व्यवहार मर्यादा निश्चित करण्यासाठी नियम लागू करण्याची शिफारस केली होती. मात्र, या नियमावर अजूनही चर्चा सुरू आहे. या चर्चेत एनपीसीआय, अर्थ मंत्रालय आणि रिझर्व्ह बँकेचे अधिकारी सहभागी झाले होते.
डिसेंबरपर्यंत निर्णय होऊ शकतो (A Decision can be made by December)
NPCI पुढील महिन्याच्या अखेरीस किंवा या महिन्यापर्यंत यावर निर्णय घेऊ शकते. तो UPI मार्केटमध्ये व्यवहार मर्यादा ठरवू शकतो. मात्र, या मुद्द्यावर अजूनही चर्चा सुरू आहे. हा नियम लागू करण्यासाठी इंडस्ट्री अजूनही अधिक वेळ मागत आहेत.
कोणत्या बँकेची व्यवहार मर्यादा किती आहे? (Transaction Limit Of Various Bank?)
बँक | व्यवहाराची मर्यादा |
भारतीय स्टेट बँक (SBI) | भारताची सर्वात मोठी बँक एसबीआय च्या यूपीआय ट्रान्झॅक्शनची मर्यादा एक लाख रुपये आहे. दररोजच्या व्यवहाराची मर्यादाही एक लाख रुपये आहे. |
आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) | आयसीआयसीआय बँकेच्या यूपीआय ट्रान्झॅक्शनची मर्यादा आणि नेहमी व्यवहारांची मर्यादा 10000 रुपये आहे. गुगल पे युजर्ससाठी दोन्ही मर्यादा 25000 रुपये आहे. |
बँक ऑफ इंडिया (Bank of India) | बँक ऑफ इंडियाचेही यूपीआय ट्रान्झॅक्शन लिमीट आणि डेली लिमीट 1-1 लाख रुपये निर्धारित करण्यात आली आहे. |
पंजाब नॅशनल बँक (PNB) | पंजाब नॅशनल बँकेची मर्यादा 25000 रुपये आहे, पण डेली यूपीआय ट्रान्झॅक्शन मर्यादा 50000 रुपये निश्चित करण्यात आली आहे. |
एचडीएफसी बँक (HDFC Bank) | HDFC बँकेने यूपीआय ट्रान्झॅक्शन आणि डेली लिमीट 1-1 लाख रुपये निश्चित केली आहे. नव्या ग्राहकाला पहिल्या 24 तासांसाठी केवळ 5000 रुपयांचे ट्रान्झॅक्शन करण्याची परवानगी आहे. |