Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

UPI Payment: युपीआयद्वारे पेमेंट करताय?,मग 'या' पाच गोष्टी ठेवा ध्यानात

UPI Payment

युपीआयद्वारे कोणतंही बिल भरणं किंवा आर्थिक व्यवहार करणं अत्यंत सोपं झालं आहे. मात्र हे व्यवहार करताना काही गोष्टी ध्यानात ठेवल्या गेल्या पाहिजेत. त्या महत्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत ते आपण पाहाणार आहोत.

सध्या जमाना युपीआय अॅप्सचा आहे. आता खिशात पैसे ठेवणं किंवा चेकबुक ठेवणं या गोष्टी तितक्याश्या महत्वाच्या राहीलेल्या नाहीत. अत्यंत सुलभपणे युपीआयशी आपलं बँक खातं लिंक केल्यावर कोणतेही आणि कितीही मोठे व्यवहार आपण अत्यंत सुलभपणे करू शकतो. हा जमाना आहे युपीआयचा.आपल्या स्मार्ट फोनशी आपलं खातं कनेक्ट केलं की थेट व्यवहार करणं सोप्पं झालं आहे. अगदी साधा चहा प्यायल्यावर त्याचे पैसे देणं असो किंवा बाजारात भाजी घेणं असो, एखाद्याला काही पैसे पाठवणं असो किंवा घरची बिलं भरणं असो, हे व्यवहार चुटकीसरशी करणं युपीआयमुळे शक्य झालं आहे. मात्र हे व्यवहार करताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणही तितकच महत्वाचं आहे. युपीआय पेमेंट करताना पाच गोष्टी अशा आहेत ज्या आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. त्या पाच गोष्टी कोणत्या आहेत हे आपण जाणून घेणार आहोत.

युपीआयद्वारे पेमेंट करताना या पाच गोष्टी ठेवा लक्षात  

युपीआय आयडी बरोबर आहे हे कसं समजावं?

जर आपल्याला एखाद्या व्यक्तीला युपीआयद्वारे पैसे पाठवायचे असल्यास पहिल्यांदा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीचा युपीआय आयडी बरोबर आहे की नाही याची खात्री करणं अत्यंत महत्वाचं असतं. मग त्या व्यक्तीचा युपीआय आयडी बरोबर आहे की नाही याची खात्री करण्याचा सर्वात सुलभ मार्ग म्हणजे त्या व्यक्तीला आपल्या अकाऊंटवरून थेट जास्त पैसे न पाठवणे. त्या व्यक्तीच्या खात्यात व्यवहार करण्याआधी फक्त एक रुपया पाठवणे आणि तो त्या व्यक्तीला मिळाला आहे की नाही याची खात्री करणं अत्यंत महत्वाचं आहे. ती खात्री झाल्यावर मग तुमचा व्यवहार  तुम्ही पूर्ण करू शकता.

युपीआयद्वारे दर दिवशी किती पैसे पाठवू शकतो?

हे समजणं अत्यंत महत्वाचं आहे. युपीआयद्वारे आपण व्यवहार तर करू शकतो. मात्र या व्यवहाराची सीमा किती आहे, हेही लक्षात घेणं तितकंच महत्वाचं आहे. युपीआयद्वारे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला दर दिवशी एक लाख रुपये पाठवू शकते. क्रेडीट कार्ड पेमेंट किंवा शेअर बाजारातल्या पेमेंटसाठी ही मर्यादा दोन लाखांची आहे. तसंच 24 तासात तुम्ही 24 व्यवहारही करू शकता.

क्रेडिट कार्डाचा करा वापर

कोणत्याही आर्थिक देवाणघेवाण करण्यासाठी शक्यतो तुम्ही तुमचं RUPAY क्रेडिट कार्ड वापरू शकता. तुमच्या मोठ्या आर्थिक देवाणघेवाणीसाठी शक्यतो क्रेडिट कार्डाचा वापर करणं अत्यंत सुलभ मानलं जातं.

व्यवहारादरम्यान काही तांत्रिक अडचणी भेडसावल्यास काय कराल?

ही गोष्ट ऑनलाईन पेमेंट करताना सर्वात महत्वाची ठरते. युपीआय पेमेंट करताना तांत्रिक अडचणी आपल्याला भेडसावू शकतात. नेटवर्क फेल होणं किंवा काही तांत्रिक अडचणी येणं ही समस्या थोड्याफार फरकाने आपल्याला भेड़सावू शकते. अशात व्यवहार पूर्ण होत नाही मात्र आपल्या बँक खात्यातून पैसे कापले गेल्याचा आपल्याला मेसेज येतो. मग अशात गोंधळून न जाता आपलं मन शांत ठेवलं पाहिजे. अशा प्रकारे आपल्या खात्यातून कापले गेलेले पैसे तीन ते पाच दिवसात आपल्याला परत मिळतात. पाच दिवसात पैसे परत खात्यात जमा न झाल्यास आपण आपल्या बँकेकडे तक्रार करू शकतो.

अनोळखी व्यक्तीने पैसे खात्यात जमा करण्याचा मेसेज पाठवल्यावर काय करावं?

ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. अनेकदा आपल्याला आपल्या अकाऊंटमध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज येतो. तुम्हाला एखाद्या लिंकवर क्लिक करायला सांगितलं जातं. अनेकदा उत्सुकतेपोटी त्यावर क्लिक केलं जातं आणि क्षणात आपल्या अकाऊंटमधनं पैसे गायब होतात. हा एक फसवणुकीचा प्रकार आहे. त्यामुळे अशा अनोळखी मेसेजकडे दुर्लक्ष केलेलं सर्वात उत्तम.