Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Upcoming Top SUV: कार घ्यायचा विचार करताय? धीर धरा...10 लाखांच्या आत मिळतील या SUV

Top SUV

तुम्ही जर कार घ्यायचा विचार करत असाल आणि नक्की कोणती SUV तुमच्या बजेटमध्ये बसेल आणि पर्सनॅलिटीला सूट होईल हे समजत नसेल तर काळजी करू नका. 10 लाखांच्या आतील टॉप एसयूव्ही कोणत्या याची माहिती आम्ही घेऊन आलो आहोत. मात्र, या SUV गाड्या घेण्यासाठी तुम्हाला थोडी वाट पाहावी लागेल.

Upcoming Top SUV: तुम्ही जर कार घ्यायचा विचार करत असाल आणि नक्की कोणती SUV तुमच्या बजेटमध्ये बसेल आणि पर्सनॅलिटीला सूट होईल हे समजत नसेल तर काळजी करू नका. 10 लाखांच्या आतील टॉप एसयूव्ही कोणत्या ते पाहा. मात्र, या SUV गाड्या घेण्यासाठी तुम्हाला थोडी वाट पाहावी लागेल. 

या गाड्या मार्केटमध्ये विक्रीस उपलब्ध झाल्या नाहीत. यातील काही गाड्या नव्या रुपात कंपनी ग्राहकांसमोर आणणार आहे. सध्या भारतात एसयुव्ही गाड्यांचा ट्रेंड आला असून नागरिकांकडून या गाड्यांना पसंती मिळत आहे. दमदार, जास्त स्पेस आणि कच्च्या रस्त्यावर चालण्याची क्षमता असल्यामुळे एसयुव्ही कार प्रसिद्ध होत आहेत. पाहूया Upcoming Top SUV कार्स कोणत्या आहेत.

ह्युंदाई एक्स्टर  (Hyundai Exter)

hyundai-exter.jpg

www.carandbike.com

ह्युंदाई कॉम्पॅक्ट एसयुव्ही श्रेणीमध्ये एक्स्टर ही गाडी लवकरच लाँच करणार आहे. ही गाडी चालू वर्षी ऑगस्ट पर्यंत विक्रीस उपलब्ध होऊ शकेल. या गाडीची बुकिंग सुरू झाली आहे. ह्युंदाईच्या वेन्यू गाडीच्या खालोखाल ही एसयुव्ही असेल. या गाडीला 82 bhp 1.2- लिटर पेट्रोल इंजिन आणि 5 मॅन्युअल गिअर असतील. कंपनी सीएनजी मॉडेलही आणणार आहे. या गाडीची किंमत 6 ते 10 लाखांच्या दरम्यान असेल.

टाटा पंच (Tata Punch iCNG)

tata-punch-icng.jpg

www.timesnownews.com

टाटा पंच गाडी लवकरच सीएनजी व्हर्जनमध्ये लाँच होणार आहे. अद्याप ही गाडी फक्त पेट्रोल, डिझेल व्हेरियंटमध्ये उपलब्ध होती. टाटा पंच ही एक सब कॉम्पॅक्ट एसयुव्ही गाडी आहे. टियागो, टिगॉर, टियागो एनआरजी आणि अल्ट्रॉझनंतरची ही टाटाची पाचवी सीएनजी कार आहे. 76 bhp 1.2-लिटर क्षमतेचे इंजिन आणि पाच मॅन्युअल गिअर असतील. या गाडीची किंमतही दहा लाखांच्या दरम्यान असणार आहे.

किया सोनेट (Kia Sonet- facelift)

kia-sonet-facelift.jpg

www.cardekho.com

किया कंपनी सोनेट हे मॉडेल नव्या रुपात ग्राहकांसमोर आणत आहे. कोणतीही गाडी जेव्हा नव्या रुपात पुन्हा लाँच होत असते त्याला  facelift असे म्हटले जाते. सध्या या गाडीची चाचणी सुरू आहे. बाहेरील डिझाइन आणि इंटिरिअरमध्ये बदल पाहायला मिळतील. यावर्षीच्या शेवटपर्यंत हे नवे मॉडेल लाँच होऊ शकते. या गाडीची किंमतही 10 लाखांच्या आत असू शकते. 1.2 लिटर क्षमतेचे इंजिन गाडीला असणार आहे. टेस्टिंग सुरू असताना रस्त्यावर ही गाडी सध्या पाहायला मिळत आहे. संपूर्ण डिझाईन कव्हर्ड असले तरी बाहेरील डिझाईनमधील चेंजेस दिसून येत आहेत.

टाटा नेक्सॉन (Tata Nexon- facelift)

tata-nexon-facelift.jpg

www.cartrade.com

टाटा कंपनीची नेक्सॉन ही गाडी ग्राहकांच्या पसंतीस उतरली असून रस्त्यांवर अनेक गाड्या दिसतात. त्यामुळे आता टाटा कंपनी नेक्सॉन नव्या रुपात ग्राहकांपुढे घेऊन येत आहे. ऑगस्ट 2023 पर्यंत ही गाडी लाँच होऊ शकते. आकर्षक डिझाईन, नवीन फिचर्स आणि इंजिन श्रेणीतील जास्त पर्यायांसह ही गाडी बाजारात दाखल होईल. पेट्रोल, डिझेल व्हेरियंटमध्ये नवे मॉडेल उपलब्ध असेल. मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक असे दोन्ही गिअर श्रेणीतील गाड्या उपलब्ध असतील. इलेक्ट्रिक मॉडेल नेक्सॉनचे आधीपासूनच बाजारात उपलब्ध आहे.

मारुती सुझुकी जिम्मी (Maruti Suzuki Jimny)

maruti-suzuki-jimny-1.jpg

 www.cardekho.com

दिल्ली ऑटो एक्स्पोमध्ये ही गाडी पहिल्यांदा पाहायला मिळाली होती. ही 5 डोअर एसयुव्ही आहे. पुढील महिन्यात या गाडीची किंमत जाहीर होईल. दहा लाख रुपयांपासून पुढे गाडीची किंमत असू शकते. महिंद्रा थार गाडीला टक्कर देण्यासाठी टाटाने जिम्मी बाजारात आणली आहे. या गाडीला 103 bhp 1.5-लिटर पेट्रोल इंजिन असेल. कोणत्याही रस्त्यावर धावण्यासाठी AllGrip Pro 4X4 ने सुसज्ज असेल.