Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Upcoming IPO: या आठवड्यात दोन आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची संधी; जाणून घ्या इत्यंभूत माहिती

Upcoming IPO in Next Week

Image Source : www.business-standard.com

Upcoming IPO: आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी या आठवड्यात चांगली संधी चालून आली आहे. IKIO Lighting कंपनीचा नियमित आयपीओ आणि Sonalis Consumer Products कंपनीचा एसएमई आयपीओ अनुक्रमे उद्या आणि परवापासून गुंतवणुकीसाठी ओपन होणार आहे.

Upcoming IPO: या आठवड्यात दोन आयपीओ ओपन होणार आहेत. गुंतवणूकदारांसाठी एक चांगली संधी आहे. मंगळवारपासून (दि. 5 जून) IKIO Lighting कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होत आहे. तर बुधवारी (दि. 7 जून) Sonalis Consumer Products कंपनीचा SME IPO ओपन होणार आहे.

IKIO Lighting IPO

IKIO Lighting कंपनीमध्ये उद्यापासून गुंतवणूक करता येणार असून, तो 8 जूनपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे. कंपनीने आयपीओच्या माध्यमातून 607 कोटी रुपये उभारण्याचा मानस व्यक्त केला आहे. यातून 350 कोटी रुपयांचे फ्रेश इक्विटी शेअर्स इश्यू केले जाणार आहेत. तर 90 लाख इक्विटी शेअर्सची विक्री ही ऑफर फॉर सेल (Offer for Sale-OFS)च्या माध्यमातून केली जाणार आहे. या आयपीओमधील प्रत्येक शेअर्सची किंमत 270-285 रुपये या दरम्यान असणार आहे. अँकर गुंतवणूकदारांसाठी IKIO Lighting ची बोली आजपासून ओपन झाली आहे.

IPO म्हणजे काय?

निधी उभारण्यासाठी आयपीओ प्रक्रिया कंपन्यांना फायदेशीर असतं. शिवाय यात पारदर्शकताही अधिक असते. शेअर बाजारात नोंदणी नसलेली म्हणजेच असूचीबद्ध कंपनी जेव्हा ती प्रथमच लोकांसाठी सिक्युरिटीज किंवा शेअरच्या विक्रीद्वारे निधी उभारण्याचा निर्णय घेते तेव्हा प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (Initial Public Offering -IPO) जाहीर करते. स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध झाल्यानंतर, कंपनी सार्वजनिकरित्या व्यापार करणारी कंपनी बनते आणि कंपनीचे शेअर्स खुल्या बाजारात मुक्तपणे व्यवहार करता येतात.

Sonalis Consumer Products IPO

सोनालिस कन्झ्युमर्स प्रोडक्ट कंपनीचा आयपीओ हा एक एसएमई आयपीओ (SME IPO) आहे. तो 7 जूनला ओपन होणार असून 9 जूनपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असणार  आहे. या आयपीओ अंतर्गत कंपनी 9.44 लाख फ्रेश शेअर्स इश्यू करणार आहे. याच्या प्रत्येक शेअर्सची किंमत 30 रुपये असणार असून त्याची फेस व्हॅल्यू 10 रुपये प्रति शेअर आहे.

SME IPO म्हणजे काय? 

100 कोटी रुपयांपेक्षा कमी उलाढाल असलेल्या ज्या कंपन्या बाजारातून भांडवल उभे करण्यासाठी आयपीओ आणतात. या कंपन्यांच्या आयपीओला SME IPO असे म्हटले जाते. या कंपन्यांसाठी नॅशनल स्टॉक एक्सचेंज (National Stock Exchange-NSE) आणि बीएसई (Bombay Stock Exchange-BSE)वर 2012 मध्ये  दोन एक्सचेंज सुरू करण्यात आली आहेत. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर BSE SME आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर NSE EMERGE असे प्लॅटफॉर्म आहेत. या प्लॅटफॉर्मवर SME IPOचे लिस्टिंग होते.

सोनालिस कन्झ्युमर्स कंपनी न्यूट्रिशन बार आणि पौष्टिक खाद्यपदार्थांच्या निर्मितीत आहे. कंपनीने 31 डिसेंबर 2022 मध्ये महाराष्ट्रासह गुजरात आणि गोव्यामध्ये आपल्या उत्पादनांचे डिस्ट्रिब्युशन केले आहे.

सोनालिस कन्झ्युमर्स प्रोडक्ट कंपनीच्या आयपीओची लॉट साईज 4000 शेअर्स आहे. यामध्ये किमान एका लॉटसाठी 1,20,000 रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. 14 जूनला शेअर्स अलॉटमेंट होणार असून, ज्यांना लॉट लागला नाही त्या गुंतवणूकदारांच्या खात्यात 15 जूनला पैसे जमा होतील. बीएसई एसएमई (BSE SME) निर्देशांकावर 19 जूनला याचे लिस्टिंग होणार आहे.

India Renewable Energy Development Agency (IREDA) IPO

इंडिया रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजेन्सी ही एक सरकारी कंपनी असून, या कंपनीचा आयपीओ आणण्याचा सरकारी पातळीवर विचार सुरू आहे. मागील महिन्यात कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स (Cabinet Committee on Economic Affairs-CCEA) संस्थेने कंपनीला आपल्यातील काही हिस्सा विकण्यास आणि नवीन इक्विटी शेअर्स इश्यू करून निधी जमा करण्याची परवानगी दिली आहे. मिनिस्ट्री ऑफ न्यू एंड रिन्यूएबल एनर्जी (MNRE) अंतर्गत इंडिया रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजेन्सी ही रिन्यूएबल एनर्जी आणि एनर्जी प्रोजेक्टसला आर्थिक मदत पुरवण्याचे काम करते.