Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Upcoming IPO in July 2022 | जुलै महिन्यात येणारे संभाव्य आयपीओ!

Upcoming IPO July 2022

तुम्हाला जर IPO मध्ये गुंतवणूक करायची असेल तर आम्ही तुमच्यासाठी जुलै महिन्यात आयपीओ आणणाऱ्या कंपन्यांची माहिती घेऊन आलो आहोत.

नवीन आर्थिक वर्षात पहिल्या सहा महिन्यात आयपीओ मार्केट (IPO Market) तेजीत होते. पहिल्या तिमाहीत तब्बल सोळा कंपन्यांनी त्यांचे आयपीओ (Initial Public Offering-IPO) काढले. ज्यात सर्वाधिक चर्चा झाली ती LIC IPO बद्दलची. आतापर्यंतचा सर्वांत मोठा आयपीओ म्हणून त्याचा जितका गाजावाजा झाला. तेवढाच एलआयसीचा शेअर खालच्या दराने लिस्टिंग झाल्यानंतर झाला होता.

IPO ही गुंतवणूकदारांना सुरुवातीच्या टप्प्यात एका चांगल्या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याची उत्तम संधी असते. आयपीद्वारे काही वेळेस कंपनीचे शेअर्स स्वस्तात मिळण्याची शक्यता असते. एका चांगल्या कंपनीचा IPO तुमचा पोर्टफोलिओला स्थिर ठेवू शकतो आणि भविष्यात त्यातून तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. तुम्हाला जर IPO मध्ये गुंतवणूक करायची असेल तर आम्ही तुमच्यासाठी जुलै महिन्यात आयपीओ आणणाऱ्या कंपन्यांची माहिती घेऊन आलो आहोत.


ड्रूम टेक्नॉलॉजी (Droom Technology)

ड्रूम टेक्नॉलॉजी ही डिजिटल मार्केटप्लेस आणि डेटा सायन्स कंपनी आहे. ही कंपनी वापरलेली वाहने खरेदी आणि विक्री करणाऱ्या क्षेत्रात कार्यरत आहे. कंपनीने या वर्षाच्या सुरुवातीला सेबीकडे (SEBI) 3000 कोटी रुपयांचा आयपीओ आणण्यासाठी अर्ज दाखल केला होता. नवीन शेअर्स विक्रीतून मिळालेल्या निधीचा वापर कंपनीच्या नैसर्गिक वाढीसाठी आणि नियमित व्यावसायिक हेतू पूर्ण करण्यासाठी वापरणार आहे. ड्रूम टेक्नॉलॉजी कंपनीचा इश्यू जुलै 2022 मध्ये येण्याची शक्यता आहे. दरम्यान, कंपनीने अजून तारखा जाहीर केलेल्या नाहीत.

एमक्योर फार्मास्युटिकल (Emcure Pharmaceutical)

एमक्योर फार्मास्युटिकल ही भारतातील सर्वांत मोठ्या कंपन्यांच्या यादीत 12 क्रमांकावर असलेली पुणे स्थित कंपनी आहे. या कंपनीला जागतिक पातळीवरील खाजगी इक्विटी फर्म बेन कॅपिटलचा पाठिंबा आहे.

एमक्योर फार्मास्युटिकल कंपनीने डिसेंबर, 2021 मध्ये SEBI कडे 4 ते 5 हजार कोटी रुपयांच्या IPO साठी अर्ज केला होता. कंपनीच्या इश्यूमध्ये 1100 कोटी रुपयांच्या नवीन शेअर्सचा समावेश असणार आहे. या शेअर्सच्या विक्रीतून कंपनी 947 कोटी रुपयांचे कर्ज फेडणार असल्याचे समजते.

टीव्हीएस सप्लाय चेन सोल्युशन्स (TVS Supply Chain Solutions)

TVS सप्लाय चेन सोल्युशन्सच्या आयपीओला सेबीकडून मंजुरी मिळाली आहे. कंपनी आयपीओमधून 2 हजार कोटी रुपयांचे ताजे इश्यू आणि 595 लाख रूपयांचे इक्विटी शेअर्स विक्रीसाठी आणणार आहे. कंपनीने सेबीकडे दाखल केलेल्या कागदपत्रांमध्ये नमूद केले आहे की, यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा एक मोठा भाग कर्जाची परतफेड करण्यासाठी आणि प्री-पेईंगसाठी वापरणार आहे.

जे एम फायनान्शिअल लिमिटेड (JM Financial Ltd.), अक्सिस कॅपिटल लिमिटेड (Axis Capital Ltd.), जे पी मॉर्गन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (JP Morgan India Pvt. Ltd.), बीएनपी परिबास (BNP Paribas), एडलवाईस फायनान्शियल सर्व्हिसेस लि. (Edelweis Financial Services Ltd.), आणि इक्विरस कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड (Equirus Capital Pvt. Ltd.) या कंपन्या टीव्हीसी साठी प्रमुख बुक रनिंग मॅनेजर म्हणून काम पाहणार आहेत. सध्या ही कंपनी 25 देशांमध्ये कार्यरत आहे.

फार्मइझी (PharmEasy)

PharmEasy ही एक ई-फार्मसी किंवा डिजिटल हेल्थकेअर युनिकॉर्न म्हणून ओळखली जाते. ही कंपनी सर्व प्रकारच्या सुविधा जसे की, ऑनलाईन वैद्यकीय सल्ला, औषधे आणि वैद्यकीय उपकरणांची घरापर्यंत डिलिव्हरी देते. फार्मइझी कंपनीने फेब्रुवारी, 2022 मध्ये IPO साठी अर्ज दाखल केला होता. बाजारातील गंभीर स्थिती पाहता कंपनीने आयपीओ ओपनिंगची योजना पुढे ढकलली.

PharmEasy कंपनीला 6,250 कोटी रूपयांच्या IPO साठी मंजूरी मिळाली आहे. यातून कंपनी प्रामुख्याने 2,494.7 कोटी रुपयांचे कर्ज फेडणार आहे. फार्मइझी कंपनीचा IPO जुलै 2022 मध्ये येण्याची शक्यता आहे. पण तरीही कंपनीने अजून तारखा जाहीर केलेल्या नाहीत.

बिकाजी फूड इंटरनॅशनल (Bikaji Food International)

बिकाजी फूड्स इंटरनॅशनल ही एक भारतातील एक प्रसिद्ध अशी स्नॅक्स कंपनी आहे. जिला SEBI कडून IPO लॉण्च करण्यासाठी ग्रीन सिग्नल मिळाला आहे. कंपनीचे सर्व शेअर्स हे विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. यातून कंपनीला कोणतेही उत्पन्न मिळणार नाही. कंपनी एकूण 2,9373,984 इक्विटी शेअर्स आणणार असून याची किंमत 1 हजार कोटी रूपयांच्या आसपास आहे.

बाजारातील सध्याची स्थिती ही कंपन्यांसाठी आणि त्यांच्या IPO साठी चिंताजनक ठरू शकते. 2020 आणि 2021 या दोनवर्षांच्या तुलनेत सध्याचे मार्केट चॉपी आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर मार्केटमधून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक काढून घेतली. दरम्यान, अमेरिकेने वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी व्याजदरात वाढ केली. याचा वाईट परिणाम शेअर मार्केटवर दिसून आला. त्यामुळे आयपीओमध्ये गुंतवणूक करताना सेबी अधिकृत वित्तीय सल्लागाराची मदत घ्या.