युनिपार्ट्स इंडिया या कंपनीचा IPO शुक्रवारी 2 डिसेंबर रोजी 4.14 पटीने सबस्क्राईब झाला. (Uniparts India IPO Subscribed 4.14 times on 2nd Dec 2022) कंपनीला 4.19 कोटी शेअर्सची मागणी प्राप्त झाली आहे. IPO मधून कंपनी 835 कोटींचे भांडवल उभारणार असून याकरिता 1.01 कोटी शेअर्स इश्यू केले जाणार आहेत.
कंपनीने आयपीओसाठी प्रती शेअर 548 ते 577 रुपयांचा दर निश्चित केला आहे. या IPO साठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस आहे.आतापर्यंत IPO ला गुंतवणूकदारांचा दमदार प्रतिसाद मिळाला आहे. किरकोळ गुंतवणुकीचा हिस्सा 2.93 पट, उच्च उत्पन्न असणाऱ्या गुंतवणूकदारांचा (HNI) राखीव हिस्सा 7.56 पटीने सबस्क्राईब झाला आहे. त्याचबरोबर पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांचा हिस्सा 3.68 पटीने सबस्काईब झाला आहे.
कंपनीची आर्थिक कामगिरी पाहता अनेक ब्रोकरेज कंपन्यांनी IPO मध्ये गुंतवणूक करण्याची शिफारस केली आहे. IPO च्या निमित्ताने शेअर इश्यू होणार असल्याने अशोका इन्व्हेस्टमेंट आणि अंबादेवी मॉरिशस होल्डिंग या कपन्यांकडून सर्वच शेअर्सची विक्री केली जाणार आहे. तसेच IPO नंतर कंपनीच्या प्रवर्तकांचा हिस्सा 66% इतका खाली येणार आहे.
Uniparts India IPO वर ब्रोकर्सचा सल्ला
Uniparts India ची बिझनेस प्रोफाईल पाहता कंपनीच्या उत्पादनांना भविष्याता चांगली मागणी असेल. त्याचबरोबर या क्षेत्रातील इतर कंपन्यांचे मूल्यांकन पाहता IPO मध्ये प्रती शेअरसाठी निश्चित केलेली किंमत तुलनेने कमी आहे.त्यामुळे दीर्घकाळ गुंतवणुकीसाठी हा IPO चांगला पर्याय असल्याची शिफारस आनंद राठी या ब्रोकर कंपनीने केली आहे. रिलायन्स सिक्युरिटीज या ब्रोकरेज हाऊसने देखील Uniparts India IPO साठी खरेदीचा सल्ला दिला आहे. भक्कम आर्थिक बाजू, ग्लोबल मार्केटमधील प्रेझेंस ही कंपनीची जमेची बाजू आहे. जपान आणि युरोपसारख्या प्रमुख बाजारपेठेत नजीकच्या काळात मोठी वृद्धी अपेक्षित आहे.
ग्रे मार्केटमध्ये प्रिमीयम वाढला (GMP Rise)
कंपनीच्या आयपीओला मिळत असलेला प्रतिसाद पाहता ग्रे मार्केटमध्ये प्रति शेअर प्रिमीयम वाढला आहे. आज शुक्रवारी कंपनीचा ग्रे मार्केटमधील प्रिमीयम प्रति शेअर 45 रुपयांवर गेला आहे. येत्या 12 डिसेंबर 2022 रोजी युनिपार्ट्स इंडियाचा शेअर बीएसई आणि एनएसईवर सूचीबद्ध होणार आहे.
मागील दोन वर्षात 15% ने वाढतेय कंपनी
- युनिपार्ट्स इंडिया'कृषी, रिअल इस्टेट, वने आणि खनिज या क्षेत्रातील लागणाऱ्या यंत्रसामुग्री आणि मशीनरीसाठी आवश्यक सुट्टे (a leading supplier of systems and components) भाग तयार करते.
- प्रिसिजन मशीनच्या सुट्या भागांना प्रचंड मागणी आहे.'युनिपार्ट्स इंडिया'कडून प्रसिजन मशीन पार्ट्सची निर्मिती केली जाते.
- कंपनीचे भारतात पाच आणि अमेरिकेत एक प्रकल्प आहे. जवळपास 25 देशांमध्ये कंपनीचा व्यवसाय आहे.
- आर्थिक वर्ष 2020-2022 या काळात कंपनीने 15% दराने वृद्धी केली आहे. तर याच काळात कंपनीच्या नफ्यात वार्षिक 67% वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
- कंपनीचा एकूण महसूल 30 जून 2022 अखेर 347.76 कोटी असून 50.52 कोटींचा नफा झाला आहे.