Unemployment Figures OF US: अमेरिकी लेबर डिपार्टमेंटच्या रोजगार अहवालानुसार, एप्रिल आणि मे महिन्यात 1,10,000 नोकर भरती केल्या गेली नाही. या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे की,अमेरिकेतील महागड्या कर्जामुळे आणि आर्थिक मंदीमुळे कंपन्या सध्या नोकऱ्या देण्यास टाळाटाळ करत आहेत. जून महिन्यात आर्थिक कारणांमुळे अर्धवेळ नोकरी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. कारण सध्याच्या व्यावसायिक स्थितीमुळे त्यांचे कामाचे तास कमी झाले आहेत. परंतु, नोकरीच्या वाढीचा वेग मजबूत राहिला. यावरून असे दिसून येते की,अमेरिकेतील मंदीने सध्या उच्च स्तर गाठलेला नाही.
तर आर्थिक मंदी सुरु असतांना वेतनवाढ करण्यात आल्याने सेंट्रल बँक फेड रिझर्व्ह व्याजदर वाढवण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू करू शकते,अशी भीती कंपन्यांकडून व्यक्त केली जात आहे.
2020 नंतरची ही सर्वात कमी वाढ
आकडेवारीनुसार, जून महिन्यात नॉन-फॉर्म पेरोलमध्ये 2,09,000 ची वाढ झाली आहे. ही डिसेंबर 2020 नंतरची ही सर्वात कमी वाढ आहे. अमेरिकन अर्थव्यवस्थेत लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आणि विकासाचा वेग कायम ठेवण्यासाठी दर महिन्याला 70,000 ते 1,00,000 नोकऱ्या निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. आर्थिक संकटामुळे तंत्रज्ञान आणि वित्त क्षेत्रात सर्वाधिक पगार देणाऱ्या कंपन्यांमध्ये ले-ऑफ दिसून येत आहे.
शेअर बाजारात संमिश्र प्रतिसाद
हाऊसहोल्ड सर्वे करुन बेरोजगारीचा दर निश्चित करण्यात आला आहे, त्या सर्वेक्षणात रोजगाराच्या संधी वाढल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जूनमध्ये बेरोजगारीचा दर 3.6 टक्क्यांवर आला आहे. परंतु अर्धवेळ नोकरीत गुंतलेल्या लोकांची संख्या 4,52,000 ने वाढून 4.2 दशलक्ष झाली. नोकरीची आकडेवारी समोर आल्यानंतर अमेरिकन शेअर बाजारात संमिश्र प्रतिसाद
पाहायला मिळत आहे.