Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

IFSC आणि MICR कोडमध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या

Difference between IFSC & MICR Code

Image Source : www.paisabazaar.com

IFSC vs MICR Code: बँकिंग व्यवहार करताना आपल्याला IFSC आणि MICR कोडची आवश्यकता असते. या कोडचा वापर केल्यानंतरच खातेधारकाला पैशांचे हस्तांतरण (Transaction) करता येते. बँकिंग व्यवहारात महत्वाचे मानले जाणारे हे दोन कोड नक्की काय आहेत? जाणून घेऊयात.

सध्याच्या घडीला आपण ऑनलाईन बँकिंगचा (Online Banking) वापर मोठ्या प्रमाणावर करत आहोत. असे असले तरीही, काही कागदपत्रं बँक आपल्याला आपल्या सोयीसाठी देते. ज्यामध्ये बँक पासबुक आणि चेकबुकचा समावेश करण्यात आलेला असतो. आपल्याला नेहमी बँकेच्या पासबुक किंवा चेकबुकवर IFSC आणि MICR Code पाहायला मिळतो. या दोन्ही कोडचा वापर करून खातेधारकांना NEFT, IMPS आणि RTGS पद्धतीचे आर्थिक व्यवहार करता येतात. पण तुम्ही कधी विचार केलाय का, की हे कोड नक्की कशासाठी वापरले जातात? यामध्ये नेमका फरक काय? चला तर याबद्दल माहिती जाणून घेऊयात.

IFSC आणि MICR कोडमधील फरक तक्त्याच्या मदतीने समजून घ्या

understand-the-difference-between-ifsc-and-micr-codes-1.jpg

IFSC कोड नक्की काय आहे?

रिझर्व्ह बँकेने (RBI) देशातील प्रत्येक बँकेच्या शाखेला एक स्वतंत्र कोड देऊ केला आहे, ज्याच्या मदतीने पैसे हस्तांतर करण्याची प्रक्रिया करता येते. आयएफएसी कोडचा (IFSC Code) फुल फॉर्म Indian Financial System Code असा आहे. हा कोड इंग्रजी अक्षरं आणि अंकांचा वापर करून 11 कॅरेक्टरचा तयार करण्यात आला आहे, म्हणूनच त्याला अल्फान्यूमरिक कोड (Alphanumeric Code) असंही म्हणतात.

या कोडवरून प्रत्येक बँकेची स्वतंत्र ओळख तयार होते. या कोडमधील पहिली चार अक्षरं ही बँकेच्या नावाची असतात, तर पाचवा क्रमांक हा शून्य असतो ज्यामुळे बँकेच्या किती शाखा आहेत हे समजते. तर शेवटचे सहा अंक हे बँकेचे स्थान कुठे आहे हे दर्शवतात. हा कोड बँकेच्या पासबुक आणि चेकबुकवर लिहिण्यात आलेला असतो. IFSC कोडचा वापर करून खातेधारकांना NEFT, IMPS आणि RTGS पद्धतीचे आर्थिक व्यवहार करता येतात.

MICR कोड नक्की काय आहे?

एमआयसीआर कोड (MICR Code) ही एक बँकिंग संज्ञा असून Magnetic Ink Character Recognition असा त्याचा फुल फॉर्म आहे. हा नऊ अंकांचा युनिक कोड आहे, जो चेकवर नोंदवण्यात आलेला असतो.  MICR कोडमधील पहिले तीन अंक शहराचे प्रतिनिधित्त्व करतात. त्यानंतरचे तीन अंक हे बँकेची ओळख दर्शवतात, तर शेवटचे तीन अंक हे बँकेच्या शाखेचा कोड असतो.

कोणताही चेक ट्रान्सफर करण्यासाठी या कोडचा वापर केला जातो. महत्त्वाचं म्हणजे चेक क्लिअरन्स प्रक्रिया (Check Clearance Process) सुरक्षित आणि जलद व्हावी यासाठी या कोडला स्कॅन करण्यात येते. माणसांकडून हा चेक हाताळताना चूक होऊ नये म्हणून मशिनच्या मदतीने हा कोड स्कॅन करण्यात येतो. प्रत्येक बँकेच्या शाखेनुसार त्याचा MICR कोड बदलतो. 

MICR कोडबद्दल खालील व्हिडीओच्या माध्यमातून माहिती जाणून घ्या.