UIDAI ने 'आधार मित्र' AI चॅटबॉट लाँच केला आहे. आधार धारकांना उत्तम सेवा देण्याच्या उद्देशाने, AI/ML आधारित चॅटबॉट 'आधार मित्र' सुविधा आता लाँच करण्यात आली आहे. याद्वारे तुम्ही आधार कार्ड संबधीच्या तक्रारींची नोंदणी आणि मागोवा घेऊ शकता.
आधार कार्ड जारी करणारी नोडल एजन्सी असलेली युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) आपल्या सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी सतत प्रयत्नशील असते. याचाच एक भाग म्हणून , AI/ML (Artificial Intelligence and Machine Learning) आधारित चॅटबॉट 'आधार मित्र' UIDAI ने लॉन्च केला आहे.
चॅटबॉटच्या आगमनाने, UIDAI वेबसाइटवर तुमची आधारशी संबंधित माहिती मिळवणे पूर्वीपेक्षा खूपच सोपे झाले आहे. याद्वारे तुम्ही आधार नोंदणी/अपडेट स्थिती तपासू शकता, पीव्हीसी आधार कार्डची सद्यस्थिती जाणून घेऊ शकता, तुमच्या घराजवळचे आधार केंद्र शोधू शकता आणि तुमची तक्रार देखील नोंदवू शकता. यामुळे सामान्य नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. आधार कार्ड जवळजवळ सर्व सरकारी कामांसाठी आता आवश्यक आहे. त्यामुळे आधार कार्डबाबत लोक पहिल्यापेक्षा अधिक सजग झालेले पाहायला मिळतात. गेल्या काही वर्षांपासून आधार केंद्रांची संख्या ग्रामीण आणि शहरी भागात लक्षणीयरित्या वाढली असली तरी अजूनही ऑनलाईन अपडेट करण्यासाठी लोक पुढाकार घेत नाही. नोंदणी करताना काही चुका झाल्यास नसता मनस्ताप सहन करावा लागेल ही भीती सामान्य नागरिकांना असते. परंतु 'आधार मित्र' च्या मदतीने नागरिकांची कामे सोपी होणार आहे आणि चिंता देखील मिटणार आहे.
#ResidentFirst#UIDAI’s New AI/ML based chat support is now available for better resident interaction!
— Aadhaar (@UIDAI) February 14, 2023
Now Residents can track #Aadhaar PVC card status, register & track grievances etc.
To interact with #AadhaarMitra, visit- https://t.co/2J9RTr5HEH@GoI_MeitY @PIB_India pic.twitter.com/fHlVd0rXTv
UIDAI ने ट्विट करून दिली माहिती
UIDAI कडून आधार मित्र चॅटबॉट लाँच झाल्याची माहिती ट्विट करत, असे लिहिले आहे की UIDAI चा AI/ML आधारित चॅटबॉट नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी लाँच करण्यात आला आहे. याद्वारे नागरिक पीव्हीसी आधारची स्थिती, तक्रारींची नोंदणी आणि मागोवा घेऊ शकतात.
तक्रार निवारणात UIDAI आघाडीवर
प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग (DARPG) द्वारे ऑक्टोबर 2022 च्या क्रमवारीत तक्रार निवारणात UIDAI सर्व गट A मंत्रालये, विभाग आणि स्वायत्त संस्थांमध्ये अव्वल आहे. UIDAI ने क्रमवारीत अव्वल स्थान मिळवण्याचा हा सलग तिसरा महिना होता.सामान्य नागरिकांच्या तक्रारी गांभीर्याने घेत UIDAI ने त्यावर वेळेत आवश्यक ती कारवाई केली आहे.
त्याच वेळी, इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकार परिषदेत असे म्हटले आहे की UIDAI कडे एक सक्षम अशी तक्रार निवारण यंत्रणा आहे, ज्यामध्ये मुख्यालय, प्रादेशिक कार्यालये, तंत्रज्ञान केंद्रे आणि आधार केंद्रांचा समावेश आहे. UIDAI हे सामान्य नागरिकांना जगण्याची सुलभता आणि व्यवसाय करण्याची सुलभता या दोन्हींसाठी सुविधा देणारे ठरले आहे. आधार धारकांचा अनुभव सुधारण्यासाठी UIDAI सतत प्रयत्नशील आहे. UIDAI येत्या काळामध्ये Open-Source CRM solution उपलब्ध करून देण्याच्याही विचारामध्ये आहे. यामध्ये Customer Relationship Management solution हे अत्याधुनिक फीचर्स असणार आहे. अशी माहिती देखील Ministry of Electronics & IT ने जारी केलेल्या प्रसिद्धपत्रकात आहे.
नव्या CRM solution मध्ये अनेक चॅनल्स असतील. ज्यात फोन कॉल, इमेल, चॅटबॉट,वेब पोर्टल, सोशल मीडीया,लेटर आणि वॉक इन आदी सुविधा असणार आहेत. म्हणजे तक्रारदार त्यांची तक्रार नोंदवू शकतो, तिचा मागोवा घेऊ शकतो आणि तक्रारीची सद्यस्थिती काय आहे हे घरबसल्या तपासू शकतो. एका आठवड्यामध्ये UIDAI अंदाजे 92% तक्रारी हाताळू शकतात.
चॅटबॉट काय आहे?
चॅटबॉट्स हे तृतीय पक्षांद्वारे (Third Party Host) होस्ट केलेली विशेष सुविधा आहे, जे चॅटररूम नियंत्रित करतात. येथे मानवी हस्तक्षेपाची गरज नसते. म्हणजे तुम्हांला काही प्रश्न किंवा शंका विचारायची असल्यास कस्टमर केयरला फोन करून तासंतास ग्राहक प्रतिनिधी केव्हा बोलेले याची वाट बघावी लागते. परंतु चॅटबॉटमध्ये तुम्ही मशीनला प्रश्न विचारता आणि क्षणाचाही विलंब न करता तुम्हांला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळतात. म्हणजेच, चॅटबॉट एक कॉम्पुटर प्रोग्रॅम आहे,चॅटबॉट ला सामान्य रुपात म्हणायचे झाले तर तो एक रोबोट असतो,ज्याचा वापर आपण संभाषणासाठी करतो. मुख्यत सेवा व उत्पादन देणार्य कंपन्या आणि ग्राहकां दरम्यान संवाद साधण्या साथी चॅटबॉटचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होत आहे ,याला ला ऑटो रिप्लायर देखील म्हणतात.