पैशाच्या कमतरतेमुळे , अनेक वेळ लोक वाहन खरेदीसाठी बँक किंवा वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतात. परंतु , कर्ज घेण्यापूर्वी , काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे जेणेकरून एखाद्याला वाहन खरेदीनंतर ईएमआय भरताना कोणत्याही समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. चला तर मग जाणून घेऊया वाहन कर्ज घेण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
Table of contents [Show]
तुमची कर्ज पात्रता जाणून घ्या
दुचाकीसाठी कर्ज घेण्यापूर्वी तुम्ही या कर्जासाठी पात्र आहात की नाही याची खात्री करा. कर्ज देताना बँकेचे काही पात्रता निकष असतात, त्यानुसार ग्राहकाला कर्ज दिले जाते. किमान एकूण उत्पन्न , वयोमर्यादा , क्रेडिट स्कोअर ही काही पात्रता निकष आहेत. अनेकवेळा असे दिसून आले आहे की लोक दुचाकी खरेदीसाठी शोरूमपर्यंत पोहोचतात आणि नंतर ते कर्जासाठी पात्र न सल्याचे कळल्यास त्यांना निराश व्हावे लागते. तेव्हा , सर्व प्रथम आपली कर्ज घेण्यासाठीचे पात्रता निकष तपासा.
सर्वोत्तम पर्याय निवडा
दुचाकी वाहनांसाठी कोणतेही कर्ज घेण्यापूर्वी , तुमच्या स्तरावर , विविध बँकांकडून उपलब्ध असलेले कर्ज आणि त्यांचे व्याज जाणून घ्या. तुमच्या गरजा पूर्ण करणाऱ्या आणि तुमच्यासाठी फायदेशीर असलेल्या चांगल्या अटींसह कोणती बँक किंवा वित्तीय संस्था कर्ज ऑफर कर ते हे तुम्ही तपासू शकता. याशिवाय सणासुदीच्या काळात किंवा कोणत्याही खास प्रसंगी विशेष ऑफरही दिल्या जातात . त्यादरम्यान खरेदी केल्यास तुमची बचत होऊ शकते.
कर्जाची रक्कम तपासा
कोणतेही कर्ज घेण्यापूर्वी , बँकेने देऊ केलेली कर्जाची रक्कम तुमच्या आवडीची दुचाकी घेण्यासाठी आणि तुमच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेशी आहे की नाही याची खात्री करा. त्यामध्ये ऑफर केलेले डाउन पेमेंट (Down Payment) , ईएमआय (EMI) , कर्जाचा कालावधी (Loan Tenure) , प्रीपेमेंट (Prepayment Option) पर्याय याबद्दल देखील जाणून घ्या.
क्रेडिट स्कोअर तपासायला विसरू नका
केवळ वाहन कर्जच नाही तर कोणतेही कर्ज घेण्यासाठी क्रेडिट स्कोअर (Credit Score) हा घटक तुम्हाला कर्ज मिळावे की नाही हे ठरवते. कर्ज घेण्यासाठी चांगला क्रेडिट स्कोअर असणे आवश्यक आहे. चांगला क्रेडिट स्कोअर तुम्हाला चांगले कर्ज मिळण्यास मदत करेल. तसेच, दिलेल्या कर्जाची ईएमआय वेळेवर दिली जाण्याची शक्यता देखील क्रेडिट स्कोअर बँकांना दर्शवते.
सुलभ कर्ज प्रक्रिया
दुचाकीसाठी कर्ज घेण्यापूर्वी , कर्ज प्रक्रिया जास्त वेळ लागणार नाही याची खात्री करा. आजकाल बहुतेक बँक कर्जदारांना त्यांच्या घरापर्यंत बँकिंग सुविधा ऑफर करतात, या पूर्णपणे डिजीटल प्रक्रिया आहेत, त्यामुळे वेळ देखील वाचतो .
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            