Toyota MPV and SUV Models: टोयोटा आणि मारुती सुझुकी या दोन कंपन्यांमध्ये झालेल्या करारानंतर भारतीय मार्केटमध्ये दोन्ही कंपन्यांचे एकत्रित मॉडेल बघायला मिळाले. मारुती कंपनीने नुकतेच आपले रिबॅज इनविक्टो मॉडेलला लाँच केले. या गाडीची रचना इनोवा हाइक्रॉस सारखी आहे. तर आता टोयोटा येत्या सप्टेंबर महिन्यात एमपीवी आणि एक एसयूव्ही मॉडेल लाँच करण्याच्या तयारीत आहे.
अर्टिगाची रिबॅज व्हर्जन लॉंच करणार
टोयोटा मारुती सुझुकी अर्टिगाची रिबॅज आवृत्ती देखील मार्केटमध्ये आणणार आहे. रिबॅज अर्टिगा मॉडेल हे रुमियन नावाने दक्षिण आफ्रीकेत विकल्या जात आहे. महत्वाचे म्हणजे मारुती सुझुकी हे मॉडेल भारतात तयार करुन दुसऱ्या देशात निर्यात करते. 2023 या वर्षाचीच सुरुवात एमपीवी आणि एसयूव्ही मॉडेल ने झाली.जानेवारी महिन्यापासून जवळपास सर्वच कंपन्यांनी आपले एमपीव्ही आणि एसयूव्ही मॉडेल भारतात आणले. यात आता टोयोटाचाही समावेश होणार आहे.
अद्ययावत वैशिष्ट्ये
टोयोटा एमपीवी आणि एसयूव्हीमध्ये नॅचरुली एस्पिरेटेड, चार-सिलेंडर पेट्रोल इंजीन मिळणार हे इंजीन 103hp पॉवर आणि 137Nm टार्क जनरेट करते. यामध्ये 5 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड टॉर्क टॉर्क कनवर्टर ऑटोमेटिक गियरबॉक्स चे ऑपशन मिळणार आहे. सोबतच वेंटिलेशन, ऑटोमन लेग रेस्ट सारखे अनेक ऑपशन मिळणार आहेत. टोयोटा रुमियन, टोयोटा एसयूव्ही, टोयोटा एमपीवी, Next-Gen Toyota Fortuner आणि Toyota Electric SUV अशा पाच गाड्या भारतात लाँच करण्याच्या तयारीत टोयोटा कंपनी आहे.