शेअर बाजारात तेजी परतल्याने गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आज सोमवारी 26 डि सेंबर 2022 रोजी सेन्सेक्स 721 अंकांच्या वाढीसह 60566 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 207 अंकांच्या वाढीसह 18014 अंकांवर स्थिरावला. चालू आठवड्यात अडवानी हॉटेल्स आणि सार्थक मेटल्स या कंपन्या जाहीर करणार डिव्हीडंड जाहीर करणार आहेत.
स्मॉल कॅप गटातील अडवानी हॉटेल्स या कंपनीने 29 डिसेंबर 2022 ही डिव्हीडंडसाठी रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे.अडवानी हॉटेल्सकडून प्रति शेअर 2 रुपये लाभांश देणार आहे. मागील सहा महिन्यात अडवानी हॉटेल्सच्या शेअरमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे.एनएसईवर अडवानी हॉटेल्सच्या किंमतीत सहा महिन्यात 16.37% वाढ झाली. अडवानी हॉटेल्सच्या शेअरने 52 आठवड्यात 109.50 रुपयांचा उच्चांक गाठला होता तर 60.55 रुपयांच्या नीचांकी पातळीपर्यंत खाली घसरला होता. अडवानी हॉटेल्सकडून 15 जानेवारी 2023 रोजी डिव्हीडंडचे वाटप केले जाणार आहे.
मेटल उद्योगाती समर्थ मेटल्स या कंपनीने डिव्हीडंडची घोषणा केली आहे. समर्थ मेटल्सकडून प्रती शेअर 1 रुपया लाभांश दिला जाणार आहे. कंपनीकडून 30 डिसेंबर 2022 ही डिव्हीडंडसाठी रेकॉर्ड डेट घोषित करण्यात आली आहे. 19 जानेवारी 2023 रोजी समर्थ मेटल्सकडून डिव्हीडंडचे वाटप केले जाईल.
मागील सहा महिन्यात समर्थ मेटल्सच्या शेअरमध्ये 42.31% तेजी दिसून आली आहे.मात्र मागील एक महिना शेअरसाठी संघर्षाचा ठरला. महिनाभरात समर्थ मेटल्सचा शेअर 5% घसरण झाली. 52 आठवड्यांमध्ये समर्थ मेटल्सचा भाव 169 रुपयांच्या उच्चांकावर होता तर 81.50 रुपयांचा नीचांकी स्तर गाठलाह होता.