Blue Tick Charge : आजकाल मायक्रोब्लॉगिंग साइट्सवर पडताळणीसाठी शुल्क आकारण्याचा ट्रेंड आहे. ट्विटर यासाठी दरमहा आठ डॉलर्स आकारते. ट्विटर भारतीय ग्राहकांकडून दरमहा 719 रुपये आकारते. पण देसी मायक्रोब्लॉग, कू अॅपने सेलिब्रिटींना लाईफ टाईम निशुल्क ब्लू टिक देण्याची घोषणा केली आहे. कू अॅपने म्हटले आहे की, ते केवळ प्रसिध्द (Famous) सेलिब्रिटींनाच आयुष्यभर मोफत पडताळणी प्रदान करेल. विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणारे, कर्तृत्व किंवा व्यावसायिक पराक्रम सिध्द करणारे व्यक्ती ओळखुन, कू अॅप वापरकर्त्याच्या प्रोफाइलवर एक पिवळा टिक देते.
कोणाला निशुल्क ब्लू टिक मिळेल ?
Koo अॅपच्या माहितीनुसार, जगभरातील सर्व सेलिब्रिटी आणि निर्मात्यांना लाईफ टाईम करीता निशुल्क ब्लू टिक उपलब्ध असेल. Koo अॅपचे सह-संस्थापक मयंक बिदावतका म्हणाले की, 'Koo अॅपवर, आम्ही प्रत्येकाला विचार आणि कृतीने जोडण्याची काळजी घेतो. आम्ही ओळख चिन्हासाठी पात्र असलेल्या सर्व सेलिब्रिटींना लाईफ टाईम करीता निशुल्क ब्लू टिक प्रदान करतो आणि त्यांना योग्य ती ओळख देतो, तसेच सुरक्षितता देतो. साहित्याची चोरी करणाऱ्यांविरोधात आम्ही आहे. त्यामुळे अश्या व्यक्ती ज्या खरोखरचं समाजासाठी कार्य करतात. त्या अगदी ठाम विश्वासाने ते त्यांचे कार्य त्यांच्या फॉलोअर्स सोबत शेअर करु शकतील. कारण आम्ही कुठलेही शुल्क न आकारता एक पारदर्शक आणि गुणवत्तेवर आधारित प्लॅटफॉर्म देत आहोत. Ku Eminence Tick A Distinguished Mark ही डिजिटल मालमत्ता आहे आणि आम्ही सर्व सेलिब्रिटींसाठी या डिजिटल अधिकाराचे संरक्षण करण्याचा निर्धार केला आहे'.
100 देशांमध्ये 60 दशलक्षाहून अधिक युजर्स
कू अॅप 100 पेक्षा जास्त देशांमध्ये 60 दशलक्ष युजर्ससह जगातील दुसरा सर्वात मोठा मायक्रोब्लॉग बनला आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, ते अशा फीचरसाठी कधीही शुल्क आकारणार नाही, जे इंटरनेटवर विनामूल्य प्रदान केले जायला हवे. Koo अॅपमध्ये निशुल्क संपादन कार्य, 500- प्रकारच्या पोस्ट, लांबलचक व्हिडिओ, एकाच वेळी 20 हून अधिक जागतिक भाषांमध्ये पोस्ट करण्याची क्षमता, ChatGPT, पोस्ट शेड्युलिंग, ड्राफ्ट तयार करणे, निर्मात्यांसाठी कमाईची साधने, वापरकर्त्यांसाठी लॉयल्टी प्रोग्राम आणि सक्रिय सामग्री नियंत्रण, इत्यादी गोष्टींचा समावेश आहे.
भारतात कोरोनाच्या काळात झाली सुरुवात
मार्च 2020 मध्ये Koo अॅप भारतात लाँच करण्यात आले. कंपनीचा दावा आहे की, सध्या 20 पेक्षा जास्त जागतिक भाषांमध्ये हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे बहुभाषिक मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे. अॅपला टायगर ग्लोबल आणि एक्सेल पार्टनर्स सारख्या जागतिक गुंतवणूकदारांचा पाठिंबा आहे.