Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Twitter deal on hold: इलॉन मस्क यांचं सूचक ‘ट्विट’

Twitter deal on hold: इलॉन मस्क यांचं सूचक ‘ट्विट’

इलॉन मस्कने (Elon Musk) यांनी ट्विटरसोबत केलेला करार तात्पुरता होल्डवर ठेवण्यात आला आहे, असे ट्विट केल्याने ट्विटरच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली.

जगातील श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क (Elon Musk) याने 44 अब्ज डॉलर्समध्ये ट्विटर विकत घेण्यासाठी केलेला करार तात्पुरता होल्डवर (Twitter deal on hold) ठेवला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून इलॉन मस्क ट्विटर खरेदी करणार असल्याची चर्चा सुरू होती. ट्विटरवर काही स्पॅम आणि फेक खात्यांची माहिती घेत असल्याचे सांगत मस्कने हा करार होल्डवर ठेवला आहे.

इलॉन मस्कने याबाबत स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. ट्विटमध्ये त्याने म्हटले आहे की, हा करार तात्पुरता होल्डवर ठेवण्यात आला आहे. मस्क यांच्या या ट्विटमुळे, ट्विटरच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. प्री-मार्केट ट्रेडिंगमध्ये कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांनी घसरले.

मस्क यांनी ट्विटरसोबतचा 44 अब्ज डॉलर्सचा करार पूर्ण करण्यासाठी गेल्या 7 अब्ज डॉलर्स सुरक्षित केले होते. दरम्यान, इलॉन हे ट्विटरवरील फेक खात्यांबद्दल सतत चर्चा करत होते. हा करार झाल्यानंतर ही फेक खाती काढून टाकण्यावर माझा भर राहील, असेही त्यांनी म्हटले होते. इलॉन मस्क आणि ट्विटर यांच्यातील करार पूर्ण झाल्यावर ट्विटरवर पूर्णत: मस्क यांचे नियंत्रण राहील.

काही दिवसांपूर्वी इलॉन मस्क यांनी, ट्विटर प्लॅटफॉर्मचा व्यावसायिक आणि सरकारी खातेधारकांना वापर करण्यासाठी पैसे खर्च करावे लागतील, असे ट्विट केले होते. त्यामुळे या निर्णयाबाबतही व्यावसायिकांचे या डीलकडे लक्ष लागून आहे.

image source - https://bit.ly/3ywYCgg