सरकारनं काही दिवसांपूर्वी फेम-2 योजनेतून मिळणारी सबसिडी कमी करून अनुदानाची रक्कम कमी केली आहे. टीव्हीएस भारतीय बाजारपेठेत मायलेज बाइक्ससाठी ओळखली जाते. कंपनीची अपाची तरुणांच्या सर्वात आवडत्या बाइक्सपैकी एक आहे. आता कंपनीनं इलेक्ट्रिक मार्केटमध्येही नाव कमावलं आहे. आयक्यूब (TVS iQube) लाँच करून कंपनीनं ग्राहकांसमोर एक उत्तम पर्याय ठेवला आहे. फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सच्या बाबतीत ही इलेक्ट्रिक स्कूटर अनेकांच्या पुढे आहे.
Table of contents [Show]
टीव्हीएस आयक्यूब फीचर्स
या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 1,61,000 रुपये आहे. आधी अनुदानामुळे त्याची किंमत कमी असायची. पण आता सबसिडी कमी केल्यामुळे ती महाग झाली आहे. तुम्ही अजूनही ती 1,41,000मध्ये खरेदी करू शकता. या किंमतीत तुम्हाला 4400 वॅटची मोटर मिळेल. ही 4.4 kWh बॅटरी पॅकसह जोडलेली आहे. ही मोटर 3 किलोवॅट पॉवर निर्माण करते.
By the time someone asks, "Is that a TVS iQube?", the Smartly Simple ride would already have vanished ?! That's the power you wield with the 4.4kW motor by your side.#SmartlySimple #TVSiQubeElectric #TVSiQube #TVSMotorCompany pic.twitter.com/cg7TvXqdAM
— TVS iQube (@tvsiqube) July 21, 2023
अवघ्या 4 सेकंदात 40 किलोमीटरचा वेग
जर तुम्ही ही स्कूटर दररोज 30 किमीपर्यंत चालवली तर चार दिवसांत चार्ज करावी लागणार आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर 145 किमीची रेंज देते. तिचा टॉप स्पीड 80 किमी प्रति तास आहे. विशेष म्हणजे तिचा पिकअप रेट कोणत्याही इलेक्ट्रिक स्कूटरपेक्षा खूप जास्त आहे. तो अवघ्या 4 सेकंदात ताशी 40 किलोमीटरचा वेग पकडते. भारतीय बाजारपेठेत ही इलेक्ट्रिक स्कूटर ओला एस वन प्रो (Ola S1 Pro), एथर 450X (Ather 450X) आणि सिंपल वनशी (Simple One) स्पर्धा करणार आहे.
टीव्हीएस क्रेऑन
टीव्हीएसची ही शून्य-उत्सर्जन स्कूटर 23 ऑगस्ट 2023 रोजी दुबईमध्ये लॉन्च केली जाणार आहे. एथर 450X, हिरो व्हिडा व्ही वन तसंच ओला एस वन प्रो या स्कूटर्सशी क्रेऑनची स्पर्धा असणार आहे. स्पोर्टी लूकमध्ये ही स्कूटर ग्राहकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. एका चार्जमध्ये 150 किमीपेक्षा जास्त रेंज ही स्कूटर देईल. टीव्हीएसच्या आयसीई रेंजप्रमाणे ती कनेक्टिव्हिटी तंत्रज्ञानानं सुसज्ज असू शकणार आहे.
टीव्हीएस अपाची आरटीएक्स 310
अपाची बाइकची नवी आवृत्ती ऑगस्ट किंवा सप्टेंबर 2023मध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे. अपाची आरआर 310 सुपरफास्टच्या (Apache RR 310 SuperSport) तुलनेत टेल डिपार्टमेंट अद्ययावत करण्यात आला आहे. टेस्टिंग प्रोटोटाइपमधून स्पष्ट होतं की अँगुलर बॉडी पॅनेलसह एक परफेक्ट डिझाइन देण्यात आलं आहे. तर ट्विन व्हर्टिकल एलईडी टेल लॅम्पदेखील यात दिसू शकतात. या दुचाकीला 312cc सिंगल-सिलेंडर लिक्विड-कूल्ड फ्युएल-इंजेक्टेड इंजिन असणार आहे. जास्तीत जास्त 34PS पॉवर आणि 27.3Nm पीक टॉर्क यातून निर्माण होईल.